विद्यार्थ्यानी आनंददायी
जीवन जगण्यासाठी आणि
मनाच्या शांततेसाठी योगासने करावीत. - प्राचार्य मा. संजीव भारद्वाज
हिंगोली, दि: 21/06/2019
येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात
साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य मा. संजीव
भारद्वाज , योग शिक्षक गणेश
जोशी आणि वैशाली मॅडम यांनी सर्वप्रथम माता
सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन केले.
या कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य
मा. संजीव भारद्वाज हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
करताना म्हणाले की, “ विद्यार्थ्यांनी आनंददायी जीवन जगण्यासाठी नियमित योगासने करावीत. योगासनामुळे मनावर, शरीरावर नियंत्रण मिळवता येते. दिव्य ज्ञान, प्रेम, करुणा,वात्सल्य
आणि सामर्थ्य हे सारे गुण योगातून विद्यार्थ्याना प्राप्त करता येतात. म्हणून विद्यार्थ्यानी आनंददायी जीवन जगण्यासाठी आणि मनाच्या शांततेसाठी योगासने करावीत ”
योग
शिक्षक गणेश जोशी नांदेड यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यानी आणि शिक्षकांनी योगासने
आणि प्राणायाम केले.
शाळेतील शिक्षिका सुमती रत्नपारखी आणि शाळेचे क्रिडा शिक्षक शैख सर कार्यक्रमाचे आयोजन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक बालाजी सर यांनी केले. या कार्यक्रमास शाळेचे
प्रशासकीय व्यवस्थापक व्यंकट हरीदास रेड्डी , पोदार जुंबो किड्स च्या मुख्याधिपिका संध्या तोमर आणि शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी
उपस्थित होते.
आषाढी एकादशी चा
कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा
हिंगोली, दिनांक
: 12-7-2019
येथील
पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये आषाढी एकादशी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा
करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष प्राचार्य संजीवजी भारद्वाज हे
उपस्थित होते.
शाळेच्या शिक्षिका अश्विनी
सिरसाठ यांनी आपल्या भाषणातून आषाढी एकादशी चे महत्व विद्यार्थ्यांना समजाऊन
सांगितले. तसेच संगीत शिक्षक निकेश यरमळ यांनी संत तुकाराम महाराजचे अभंग गाऊन
भक्तीमय संदेश दिला.
या
कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी विठ्ठल , रूक्मिणी
आणि वारकार्याच्या वेशभूषा परिधान करून सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक
शुभेच्या दिल्या . तसेच विद्यार्थ्यानी शाळेच्या परिसरात विठ्ठल – रुक्मिणी याची आध्यात्मिक दिंडी काढून शाळेचे
वातावरण भक्तीमय केले.
तसेच या कार्यक्रमात
प्राचार्य संजीवजी भारद्वाज यांच्या हस्ते शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
करून प्रमाणपत्र देण्यात आले.
या
कार्यक्रमा चे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सलेहा शैख यांनी केले तर आभार शाळेचे
शिक्षक मुकुंद हुंबे यांनी मानले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका
मोहिनी दिक्षित , ज्ञानदा रोकडे, शीतल देशपांडे, विजया इंगोले, फोजिया शैख ,शाळेचे शिक्षक पंकज संघई , सिद्धार्थ जमधाडे , एन. के. शर्मा ,संतोष दिपके आणि मुकेश डहाळे
यांनी प्रयत्न केले.
SOF चा सर्वात्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने संजीवजी भारद्वाज
सन्मानित
हिंगोली, दिनांक : 15-7-2019
येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मधील प्राचार्य
संजीवजी भारद्वाज यांना सायन्स ओल्यम्पियाड फाऊंडेशन ( SOF ) यांच्या कडून दिला
जाणारा हिंगोली जिल्हा स्तरीय सर्वात्कृष्ट प्रिन्सिपल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्राचार्य संजीवजी भारद्वाज यांना सायन्स ओल्यम्पियाड
फाऊंडेशन ( SOF ) हिंगोली जिल्हा स्तरीय सर्वात्कृष्ट प्रिन्सिपल पुरस्काराने
मा. संदीप
कुलकर्णी (SOF अकोला जिल्हा समन्वयक ) यांच्या
हस्ते प्रदान करण्यात आला.
सायन्स ओल्यम्पियाड फाऊंडेशन ( SOF ) या संस्थे कडून विज्ञान , गणित आणि सामान्य ज्ञान या
स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. त्या स्पर्धा परीक्षा नियमित उत्कृष्टपणे आयोजित
करून शाळेतील विद्यार्थ्याची सर्वात्कृष्ट गुणवता सिध्द केल्याबद्दल त्यांना
हिंगोली जिल्हा स्तरीय सर्वात्कृष्ट प्रिन्सिपल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सायन्स ओल्यम्पियाड फाऊंडेशन (
SOF ) या संस्थे कडून विज्ञान , गणित आणि सामान्य ज्ञान या
स्पर्धा परीक्षे मध्ये पोदार शाळेतील अनेक विद्यार्थ्यानी गुणवत्ता सिध्द करून
विविध पुरस्कार आणि मेडल मिळवले आहेत. हिंगोली
जिल्हयातून सायन्स ओल्यम्पियाड फाऊंडेशन ( SOF ) या संस्थे कडून घेण्यात येणार्या विज्ञान , गणित आणि सामान्य ज्ञान या
स्पर्धा परीक्षा पोदार इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात पास होतात
आणि गोल्ड मेडल , सिल्व्हर
मेडल यासह अनेक पुरस्कार प्राप्त करतात. तसेच 2018-2019 या
वर्षी हिंगोली जिल्ह्यातून सर्वात्कृष्ट गणित शिक्षक पुरस्कार मा. सिध्दार्थ जमधाडे यांना प्राप्त झाला होता.
प्राचार्य संजीवजी भारद्वाज यांना सायन्स
ओल्यम्पियाड फाऊंडेशन ( SOF ) यांच्या कडून दिला
जाणारा हिंगोली जिल्हा स्तरीय
सर्वात्कृष्ट प्रिन्सिपल पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल शाळेचे
प्रशासकीय व्यवस्थापक व्यंकट हरीदास रेड्डी, जुंबो किड्स च्या मुख्याधिपका संध्या तोमर , शाळेचे विद्यार्थी , शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी हार्दीक शुभेच्या
दिल्या.
आपत्ताकालीन आग व्यवस्थापनाचे प्रशिक्षण विद्यार्थ्याना देण्यात आले.
हिंगोली, Date : 18-7-2019
येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये आपत्ताकालीन आग व्यवस्थापनाचे प्रशिक्षण विद्यार्थ्याना देण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षप्राचार्य मा.संजीवजी भारद्वाज यांनी ‘आग सर्वासाठी जेवढी आवश्यक आहे तेवढीच ती घातकही ठरू शकते. आपण घरी संव्यपाककरत असू किंव्हा शाळा , कंपनी मध्ये कार्य करत असू आपणाला आगी पासून सावधान राहिले पाहिजे. तसेच आपत्ताकालीनआगीवर अग्निशमन यंत्राद्वारे नियत्रन मिळवून सुरक्षित कसे राहिले पाहिजे या बद्दल मार्गदर्शन केले. ’
तसेच शाळेत अग्निशमन यंत्राद्वारे आग विझवण्याचे प्रत्याशिक दाखवून विद्यार्थ्याना अग्निशमन यंत्र हाताळण्याचे प्रक्षिशन देण्यातआले. पॉवर पॉइंट प्रेझेंटशन आणि विडियो दाखवूनही विद्यार्थ्याना आगीवर कसे नियत्रन मिळवून सुरक्षित कसे राहिले पाहिजे याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच अग्निशामक दल हिंगोली यांच्या सौजन्याने शाळेतील विद्यार्थ्यासाठी आग व्यवस्थापनप्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये आग लागल्यानंतर त्वरीत मोकळ्या जागेत जावे. आग पाण्याने वीझवण्याचा प्रयत्न करावा .अग्निशामक दलाला फोन करावा . तसेच आपण सुरक्षित मोकळ्या जागेत कसे जावे. या वर प्रशिक्षण देण्यात आले. तसेचअग्निशामक दल कश्या तत्परेतेने आग विजवण्याचा प्रयत्न करते . याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले .या प्रशिक्षांनामुळेविद्यार्थ्यांना आगीवर कसे नियंत्रण मिळावे याचे मार्गदर्शन मिळाले.
तसेच या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे प्रशासकीय व्यवस्थापक व्यंकट हरीदास रेड्डी, शाळेचे विद्यार्थी , शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.
गुरु पोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
हिंगोली, दिनांक : 16-7-2019
येथील
पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुरु पोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज हे होते. तर
कार्यक्रमास शाळेचे प्रशासकीय व्यवस्थापक व्यंकट हरीदास रेड्डी हे उपस्थित होते.
या कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
या कार्यक्रमात वैभव सरकटे या विद्यार्थ्याने
गुरु पोर्णिमा या विषयावर माहिती दिली. पार्थ झंवर यांने आपल्या भाषणातून आजच्या
युगातील शिक्षकांचे महत्व सांगितले. शाळेतील वरिष्ठ शिक्षक मुकुंद हुंबे यांनी आपल्या
मनोगतातून गुरुचे आजच्या आपल्या जीवनातील महत्व सांगितले. तसेच शाळेतील शिक्षिका
सुमती रत्नपारखी यांनी “ गुरु बिन कैसे गुण गावे ” हे गीत सादर करून गुरूचे महत्व
सांगितले.
प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज यांनी आपल्या
मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्याना संदेश देतांना म्हणाले की, “ आज पर्यंत यशस्वी आणि लोकप्रिय
झालेल्या प्रत्येक व्यक्तीला गुरुच्या मार्गदर्शनाखाली यश प्राप्त झालेले आहे.
गुरूंचा आदर्श घेऊन आजच्या विद्यार्थ्यानी आपल्या जीवनात देखील यशस्वी आणि मोठे
व्हावे. ”असे मत व्यक्त केले.
या
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राशी बियाले हिने केले. तर अमोल शेष यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी
यांनी प्रयत्न केले.
“In to the
wild” हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा
हिंगोली, दिनांक:
येथील
पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये In to the wild या कार्यक्रम मोठ्या
उत्साहात साजरा करण्यात आला. या
कार्यक्रमाचेउद्घाटन शाळेचे प्राचार्य संजीव भारद्वाज , माधवीताई पाटील गोरेगांकर, राधिका देशमुख, नितीन कुमार घुगे, डॉ. अमोल अवचार यांनी केले.
In to the wild या
कार्यक्रमात जगातील बारामहिने पाऊस पडणार्या अति दुर्गम स्थळी राहणार्या आदिवासी
जमातीच्या लोकांचे सांस्कृतिक जीवनाचेप्रत्यक्ष देखाव्याद्वारे दर्शन घडवण्यात आले. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यानी त्या दुर्गम स्थळी राहणार्या लोकांची वेशभूषा पोषाख परिधान करून
प्रत्यक्ष त्या लोकांचे जीवन जगून आनंद घेतला.
शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यानी दुर्गम दुर्गम
भागातील आदिवासी जमात , भागातील
डोंगर दर्या, त्यांची घरे , पाळीव प्राणी , वनस्पती , त्यांचे
दाग – दागिने
आणि तेथळ लोकांचे राहणीमान यांचे भव्यदिव्य देखावे सादर करण्यात आले होते. त्या देखाव्याच्या माध्यमातून तेथील लोकांचे प्रत्यक्ष जीवन
राहणीमान दाखवण्यात आले होते.
त्या
भ्गतील आदिवासी आदिवासी लोकांची वेशभूषा , पोषाख परिधान करून विद्यार्थ्यानीतेथील लोकांचे जीवन जगून
पाहतांनाच तेथील लोकांच्या संस्कृतीची माहिती करून घेतली. या
कार्यक्रमात शाळेतील सर्व उत्साहात आणि आनंदाने सहभाग घेतला होता.
त्यामुळे शाळेतील वातावरणच एक
आनंद आणि उत्साहाची नगरी असे झाले होते. सर्व विद्यार्थी आनंदाने आदिवासी लोकांची संस्कृती आणि
त्याची राहणीमान या बद्दल शिक्षण घेत
होते. अश्या आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातूनच शाळेतील विद्यार्थी
विविध सांस्कृतिक मूल्य आणि परंपरासह देशभक्तीचे शिक्षण घेत आहेत.
कार्यक्रम
यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका मोहिनी
दीक्षित , प्रणाली
दाभाडे, मनीषा पाटील , सुमती रत्नपारखी , कल्याणी देशमुख
यांच्यासह शाळेतील शिक्षक मुकुंद हुंबे , संतोष दीपके, पंकज संघई , कपील जमधाडे, देवेंद्र खरटमल, नितिन इंगोले, संतोष सुरकांबळे, नरेंद्र शर्मा, बालाजी सर, अमोल शेष , सिद्धार्थ जमधाडे, निकेश यरमळ, अश्फाक अख्तर , चंद्र्कांत नांगरे , मुकेश डहाळे आणि आनंद देऊळगांवकर यांच्यासह शाळेतील सर्व विद्यार्थी यांनी
मोठ्या आनंदाने प्रयत्न केले.
विद्यार्थ्यांनी अधिक अधिक पुस्तकाचे वाचन करून आपले जीवन
समृद्ध करावे
--- प्राचार्य मा. संजीवजीभरद्वाज
हिंगोली, दिनांक : 13-8-2019
येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये डॉ. एस.आर. रंगनाथन
याची जयंती “ग्रंथपाल दिन ” म्हणून मोठ्या उत्साहात साजरा
करण्यात आली. यावेळी शाळेचे प्राचार्य
मा. संजीवजी
भरद्वाज यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातुन
विद्द्यार्थ्यांना सांगीतले की, “विद्यार्थ्यांनी अधिक अधिक
पुस्तकाचे वाचन करून आपले जीवन समृद्ध करावे, तसेच सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर
शिक्षणाची सुद्धा अत्यंत आवश्यकता आहे आणि त्याकरिता ग्रंथालयांचा सुदृढ पायावर
विकास, प्रसार होऊन सर्वसामान्य
भारतीयाला ज्ञानाची द्वारे विनामूल्य उघडी ठेवली पाहिजे, सर्वांना वाचन करण्याकरिता
प्रवृत्त केले पाहिजे हा विचार भारतामध्ये डॉ. एस.आर.रंगनाथन यांनीच सर्वप्रथम
रुजविला, जोपासला, वाढविला आणि केवळ त्याकरिताच
आपले आयुष्य झिजविले.’
या प्रसंगी शाळेतील ग्रंथपाल चंद्रकांत नांगरे यांनी आपल्या भाषणातून ‘डॉ.
एस.आर. रंगनाथन
याचे “जीवन
चरित्र सांगून विध्यर्थ्याना
स्फूर्तिदायक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात डॉ. एस.आर. रंगनाथन
यांच्या मार्गदर्शन विचाराचे पोस्टर सर्व विध्यार्थ्यना लावून भारतीय मूल्य आपल्या जीवनात रुजवावीत
असे सांगितले. तसेच सर्व वर्गात वाचन
विषयक उपक्रम घेण्यात आला. त्यामध्ये ऑनलाइन बुक्स दाखवून त्याचे वाचन
विद्यार्थ्यानी केले. आणि त्या पुस्तकांवर संवाद घेण्यात आला. तसेच
काही विद्यार्थ्यानी ग्रंथालयातील पुस्तके वाचून ग्रंथपाल दिन साजरा केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैली दमकोंडवार हीने केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक मुकुंद हुंबे , पंकज संघई , सलेहा शैख मा.संतोष दीपके, निकेश यरमळ यांनी प्रयत्न केले तसेच या
कार्यक्रमास शाळेतील शिक्षक आणि
शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .
स्वातंत्र्य दिवस मोठ्या
उत्साहात साजरा
हिंगोली, दिनांक : 15-8-2019
येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल
मध्ये स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात
साजरा करण्यात आला. कार्यक्रमास
प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य संजीव भारद्वाज , प्रविन भारद्वाज मॅडम , रूपालीताई गोरेगांकर , संध्या सिंग तोमर , शाळेचे प्रशासकीय व्यवस्थापक व्यंकट हरीदास रेड्डी हे
उपस्थित होते.
निकेश यरमळ आणि त्यांच्या
संगीत मंचातील विद्यार्थ्यानी देशभक्तीपर स्वागत गीत सादर करून देशभक्तीचा संदेश
दिला. नृत्य शिक्षक संतोष दिपके यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यानी देशावर असीम प्रेम
करणार्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या
जीवनावर आधारीत चित्त थरारक नाटिका सादर करून शौर्य आणि पराक्रमाचे दर्शन दाखवून
दिले.
प्राचार्य संजीव भारद्वाज
यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात म्हणाले की, ‘ स्वच्छ आणि सुंदर भारत बनवण्यासाठी विद्यार्थ्यानी प्रयत्न
केले पाहिजे. भारताच्या
सर्वांगीण विकासासाठी आजचे विद्यार्थी हे
पुढच्या पिढीचे आधार स्तंभ आहेत. त्यामुळे
विद्यार्थ्यांनी आपल्या देशाच्या सर्वांगीन विकासाची जबाबदारी आपल्या खांद्यावर
घेतली पाहिजे. ’
रूपालीताई गोरेगांकर मॅडम
आपल्या मनोगतात म्हणाल्या की ‘
विद्यार्थ्यानी आपल्या भारत देशाला जगातील सर्वात्तम देश बनवण्यासाठी प्रयत्न केले
पाहिजेत.’शाळेतील विद्यार्थिनी
गंगोत्री वायचाळ ही “ स्वातंत्र्यानंतरचा
भारत ” या
विषयावरील आपल्या भाषणात म्हणाली की , ‘ स्वातंत्र्यानंतर भारताने सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात
विकास केला आहे. त्यामुळे मी भारतीय असण्याचा मला गर्व आहे आणि तो सर्वांनीच बाळगला पाहिजे. ’
विद्यार्थ्यांचा पदग्रहण
सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . प्राचार्य
मा.संजीवजी
भारद्वाज आणि विद्यार्थ्यांचे पालक यांच्या हस्ते विद्यार्थ्याना बॅचेस आणि सशे
देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या प्रसंगी
शाळेचे प्राचार्य मा.संजीवजी
भारद्वाज यांनी विदद्यार्थ्यांना अनुशासन आणि शिस्त पालनाची शपथ देण्यात आली.
भारत मातेची रक्षा करणार्या
सैन्यातील जवान भावाला राखी बांधून देश सेवेसाठी पाठवणार्या बहिणीची व्याकुळता
गीताच्या माध्यमाने दाखवून दिली. या कार्यक्रमात
शाळेतील तालुका स्तरीय बॅडमिंटन स्पर्धेतील मधील विजेत्या विद्यार्थ्याना
पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.मधुश्री
शहाणे हिची राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सत्कार
करण्यात आला.
कलाशिक्षक मुकेश डहाळे यांना
कार्यक्रम स्थळी सुंदर आणि विलोभनीय सजावट केल्या बद्दल प्रमाण पत्र देऊन
गौरविण्यात आले. या
कार्यक्रमाचे सूत्र संचलन शाळेतील पहिल्या वर्गात शिकणारी विद्यार्थीनी अनघा
गुठ्ठे आणि तर सहावी वर्गातील विद्यार्थी शिवम सातपुते , साक्षी लोंढे, आणि पूर्वा पेकमवार यांनी केले. तर आभार
शाळेचे विद्यार्थी देवांग साकळे आणि विद्यार्थीनी सानिया शिराडकर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
शाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
श्रीकृष्ण जन्मअष्टमी मोठ्या उत्साहात साजरी.
हिंगोली. दि: 23-8
-2019
येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्मअष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य संजीव भारद्वाज हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून
माधवी पाटील गोरेगांकर , ममता सूर्यवंशी आणि शाळेचे प्रशासकीय व्यवस्थापक मा. व्यंकट हरीदास रेड्डी कार्यक्रमास उपस्थित होते.
मा. प्राचार्य संजीव भारद्वाज विद्यार्थ्यांना दिलेल्या मार्गदर्शन भाषणात म्हणाले की ,
“ भारत हा प्राचीन संस्कृती – परंपरा लाभलेला देश आहे. आपल्या देशात श्रीकृष्ण भगवान सर्वांचाच लाडका असून त्यातही बाल गोपालांचा अत्यंत लाडका मित्र , सवंगडी आणि मार्गदर्शक गुरु आहे . श्रीकृष्ण यांची महानता , शीलता , मानवता आणि सर्व प्राणीमात्रावर असणारी त्यांची करुणा आंगीकरून विद्यार्थ्यानी आपले जीवन यशस्वी करावे.
शाळेच्या पहिली ते दुसरी च्या विद्यार्थ्यानी राधा – श्रीकृष्ण यांच्या रूपातील वेशभूषा परिधान करून सर्वांना श्रीकृष्ण जन्मअष्टमी च्या शुभेच्या दिल्या. तसेच शाळेतील सर्वच विद्यार्थ्यानी श्रीकृष्णच्या गीतावर सुंदर असे सामुदायिक नृत्य सादर करून श्रीकृष्ण जन्मअष्टमी मोठ्या आनंददायक , प्रसन्नमाय वातावरणात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात कृष्णजन्माष्टमी निमित्त कृष्ण जन्माची कथा, नटखटपणामध्ये सुंदर माखण चोरीचे दृश्य ,आणि कालिया मर्दन
मध्ये कालिया नागाचे मर्दन करण्यात आले. या
नाटीकेच्या माध्यमातून कृष्णाच्या विविध गुणांचे दर्शन दाखवून ते गुण
विद्यार्थ्यांनी अंगिकारावेत असे सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार सोवितकर आणि राशी
साबू यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका सुमती रत्नपारखी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका प्रणाली धाभाडे , मोहिनी दीक्षित , ज्ञानदा रोकडे , विजया इंगोले, शीतल देशपांडे , फौजिया शैख यांनी प्रयत्न केले.
‘फिट इंडिया’ चळवळीचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात
आले
हिंगोली, दिनांक : 29-8-2019
येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये
राष्ट्रीय क्रिडा दिवस मोठ्या उत्साहात
साजरा करण्यात आला.
मा . नरेंद्र मोदी राष्ट्रीय
दिनांचे औचित्य साधून ‘ फिट इंडिया ’ चळवळीचा शुभारंभ केला
त्याचे थेट प्रक्षेपण शाळेतील
विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. पहिली ते आठवी च्या वर्गात फिट इंडिया ’ चळवळीच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले . पंतप्रधान मा .
नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. विद्यार्थ्यी
मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने मा . नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकत होती. त्यांच्या
भाषणातील सारावर चर्चा करत होती.
भारतीय
क्रिडा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी
युवराज नायक याने बोलतांना म्हणाला की, ‘ हॉकी विश्वातील सर्वात महान खेळाडू म्हणून आजही मेजर
ध्यानचंद यांचे नाव आदराने घेतले जाते. हॉकीतील
जादूगार अशीच त्यांची जगभरात ओळख आहेअश्या महान खेळाडूचा आपण
आदर्श घेऊन खेळा मध्ये प्राविण्य मिळवले पाहिजे. ’
शाळेतील विद्यार्थिनी राजनंदनी आखरे हिने आपल्या
भाषणात म्हणाली की ‘ ध्यानचंद याच्या सारखे खेळत रहावे आणि आपल्या देशाचे नाव
उज्ज्वल करावे .’
नितिन
इंगोले यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवन आणि कार्यावर भाषण देतांना म्हणाले की , विद्यार्थ्यानी शाळेतील जीवनात अभ्यासा
सोबतच खेळत राहावे आणि विविध खेळत विजयी होऊन देशाचे नाव उज्वल करावे. ’
मा. प्राचार्य संजीव भारद्वाज यांनी आपल्या मार्गदर्शनमय
भाषणात प्रतिपादन केले की, “ मेजर ध्यान चंद , पि . व्ही . सिंधु , सचिन तेंडुलकर यासारख्या महान
खेळाडूचा आदर्श विद्यार्थ्यानी घेतला पाहिजे. त्या खेळाडूंनी आपल्या – आपल्या
क्रिडा क्षेत्रात महान अशी कामगिरी केली त्या प्रमाणे विद्यार्थ्यानी विविध खेळात
प्राविण्य मिळवले पाहिजे. आजच्या काळात शरीर फिट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी
विद्यार्थ्यानी खेळत राहिले पाहिजे . ”
यावेळी शासनाच्या क्रिडा व युवक सेवा संचालनालय मंडळ
पुणे आणि जिल्हा क्रिडा कार्यालय हिंगोली अंतर्गत आदर्श महाविद्यालय येथे संपन्न
झालेल्या जिल्हा स्तरीय शालेय फूटबॉल स्पर्धेत
पोदार इंटरनॅशनल स्कूल हिंगोली च्या 17 वर्षा खालील कर्णधार देवांग साकळे याच्या
नेतृत्वाखाली मुलांच्या फूटबॉल संघाने
प्रथम क्रमांक मिळवला त्या फूटबॉल संघाचा मा. प्राचार्य संजीव भारद्वाज यांच्या हस्ते पुष्पगुच्छ
देऊन सत्कार करण्यात आला.
या
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेतील विद्यार्थिनी लहर अग्रवाल हिने केले तर आभार
श्रेया देशमुख हिने मानले . यावेळी राष्ट्रीय क्रिडा दिवसा निमित्त शाळेतील
विद्यार्थ्यां मोठ्या उत्साहात फूटबॉल मॅच खळले .
‘पर्यावरणपूरक
गणेशाची मूर्ती साकारण्यावर कार्यशाळा ’
हिंगोली : पोदार
इंटरनॅशनल स्कूलचा उपक्रम येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये वर्तमानपत्र आणि माती
पासून पर्यावरणपूरक गणेशाची मूर्ती साकारण्यावर कार्यशाळा घेण्यात आली. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक
ठरतात . पर्यावरण संवर्धंनासाठी शाडू मातीपासून बनविलेल्या मृर्ती हितावाह ठरतात .
विद्यार्थ्यांमध्ये
पर्यावरण संवर्धन जाणिवा व संस्काराची रुजवन शालेय वयातच व्हावी या उद्देशाने सदर
कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यशाळेचे इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी
आयोजन करण्यात आले होते. यावेळी जवळ – जवळ
600 विद्यार्थ्यानी मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते कार्यशाळेत सहभागी
विद्यार्थ्यानी अतिशय सुंदर सुबक व आकर्षक अश्या 430 गणेश मूर्ती सकारल्या . विद्यार्थ्यानी पर्यावरण पूरक श्री. गणरायची
नितांत सुंदर आणि विलोभनीय अश्या स्वनिर्मित केलेल्या मूत्यांना रंगवून आणी इतर
साहित्या पासून सजवून आकर्षक मूर्त्या
बनवून आपला आनंद द्विगुणित केला .
यावेळी प्राचार्य संजीव भारद्वाज यांनी आपल्या
मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना सांगितले की, ‘ आजच्या काळात
पर्यावरण पूरक गणपती उत्सवाची खरी गरज आहे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन
जाणिवा व संस्काराची रुजवन शालेय वयातच होते त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या
पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे आणि पर्यावरणाचे संवर्धन केले पाहिजे . ”
या नंतर विद्यार्थ्यांना कलाशिक्षक मुकेश डहाळे
यांनी वर्तमानपत्र व धाग्या पासून श्री .
गणेशाची मूर्ती कशी बनवितात याचे
प्रात्येक्षिक दाखवले व नंतर पर्यावरणपूरक
गणेश मूर्ती कश्या बनवाव्यात याविषयी
मार्गदर्शन केले . ते बोलतांना म्हणाले की, ‘ गणेश मूर्ती ही मातीची किंवा वर्तमान पेपरांपसून बनवावी. गणेश मूर्तीला
चकचक्कीत किंवा रासायनिक रंग देऊ नका त्या एवजी पाण्यात सहज विरघळणारे जलरंग
द्यावेत त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही .
कार्यक्रम यशस्वी
करण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले .
खेळाच्या माध्यमातूनच एकाग्रता , संघशक्ती आणि मैत्रीभावना यासारखे विविध भारतीय मूल्यांचे जतन
होते
प्राचार्य संजीवकुमार
भारद्वाज
हिंगोली : दिनांक 18-10-2019
येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये वार्षिक (उमंग ) क्रिडा महोत्सव मोठ्या
उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज आणि कलमुद्दीन
फारुकी यांच्या सह उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी देवी सरस्वती यांच्या प्रतिमेचे
पूजन व क्रिडा ज्योतीचे दीप प्रज्वलन करून क्रिडा महोत्सवास प्रारंभ केला. शाळेतील
विद्यार्थ्यानी मार्च पास्ट सादर करून अनुशासन आणि शिस्तीचे प्रद्रशन दाखवून दिले.
‘भारत की लक्ष्मी’ म्हणून शाळेतील महिला शिक्षकांचा सत्कार प्राचार्य
संजीवकुमार भरद्वाज आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या वेळी “ocean
of knowledge” या न्यूजलेटर चे उद्घाटन करण्यात आले.
या क्रिडा महोत्सवास कलमुद्दीन फारुकी (जिल्हा क्रिडा अधिकारी, हिंगोली), संदीप कुमार (प्राचार्य ,पोदार स्कूल नांदेड), चंद्रकांत सूर्यवंशी ( उपजिल्हाधिकारी
साहेब ,हिंगोली) प्रा. आनंद भट्ट ( क्रिडा प्रशिक्षक ,आदर्श कॉलेज, हिंगोली), रूपाली
ताई गोरेगांकर ( जि.प.सदस्या, हिंगोली ) एन.जि. कांबळे सर , व्यंटक हरीदास रेड्डी ( प्रशासकीय व्यवस्थापक ,
पोदार स्कूल, हिंगोली ) आणि संध्या तोमर ( मुख्याधिपिका, पोदार जुंबो किड्स हिंगोली), हे प्रामुख्याने
उपस्थित होते
प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात म्हणाले की, “ विद्यार्थ्यानी शारीरिक ,मानसिक आणि बौध्दिक विकास होण्यासाठी खेळत
राहावे. विद्यार्थ्यांमध्ये असलेली इच्छाशक्ती , उत्साह आणी मेहनत यामुळे शालेय जीवनात प्रगती साधता येते . त्याचप्रमाणे
अंगी शिस्त लावल्यामुळे खेळामध्ये देखील प्रगती साधता येते . खेळाच्या माध्यमातून
विविध नितीमूल्य जपले जातात . खेळाच्या माध्यमातूनच एकाग्रता , संघशक्ती , मैत्रीभावना यासारखे विविध भारतीय
मूल्याचे जतन होते. त्यामुळे विद्यार्थ्यानी सतत खेळत राहावे. ”
कलमुद्दीन फारुकी यावेळी बोलतांना म्हणाले की, “ शालेय
विद्यार्थ्यानी आपल्या पालकांना सकाळी उठून मॉर्निंग वॉक साठी घेऊन जावे तरच भारत
देश फिट होण्यास मोठ्या मदत होईल ”
क्रिडा महोत्सवात विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते . त्यामध्ये प्राचीन काळापासून भारतात खेळले जाणारे विठू – दांडू
, कबड्डी, खो-खो, लंगडी आणि कंचा यासारखे शरीराला व्यायाम आणि चित्त
एकाग्र करणारे खेळ क्रिडा ड्रिल च्या माध्यमातून खेळण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या फिट इंडिया चळवळ
निरोगी भारत घडवण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे, हे ‘फिट इंडिया’
या क्रिडा ड्रिल च्या माध्यमातून दाखवण्यात आले. फिट इंडिया’
या क्रिडा ड्रिल मध्ये शालेय विद्यार्थ्यानी भारतात खळल्या जाणार्या विविध खेळ
खेळून विविध खेळ खेळत राहावे तरच भारत फिट होईल असा संदेश दिला .
फ्लाग ड्रिल , मास पिटि
, काठी ड्रिल , जिम्नॅस्टिक्स
ड्रिल या सारख्या विविध ड्रिलच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यानी आपल्या
शारीरिक कसरती आणि क्रिडा कला गुणांचे प्रदर्शन दाखवून दीले.
तसेच या क्रिडा महोत्सवास क्रिकेट , फूटबॉल , बास्केटबॉल, धावण्याच्या स्पर्धा या सारख्या विविध
स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये विजेत्या खेळांडूस प्राचार्य संजीवकुमार
भारद्वाज आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पारितोषिक प्रदान
करण्यात आले. शाळेतील क्रिडा शिक्षक शैख वहीद यांनी यशस्वीपणे क्रिडा महोत्सवाचे
आयोजन करून शाळेतील विद्यार्थ्यांच्या क्रिडा गुणांना चालना दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका मोहिनी दीक्षित , प्रणाली दाभाडे , सुरभी अग्रवाल , फौजिया शैख , मनीषा पाटील ,
सुमती रत्नपारखी , शीतल
देशपांडे , तसेच शिक्षक संतोष दिपके , मुकुंद हुबे , सिद्धार्थ जमधाडे , निकेश यरमळ, चंद्रकांत नांगरे आणि कलाशिक्षक मुकेश
डहाळे यांच्या सह शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment