Saturday 12 October 2019

PODAR NEWS 2019-20
















































खेळाच्या माध्यमातूनच एकाग्रता , संघशक्ती आणि मैत्रीभावना यासारखे विविध भारतीय मूल्यांचे जतन होते             
                                                    प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज
हिंगोली : दिनांक  18-10-2019
येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये वार्षिक (उमंग ) क्रिडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज आणि कलमुद्दीन फारुकी यांच्या सह उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी देवी सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व क्रिडा ज्योतीचे दीप प्रज्वलन करून क्रिडा महोत्सवास प्रारंभ केला. शाळेतील विद्यार्थ्यानी मार्च पास्ट सादर करून अनुशासन आणि शिस्तीचे प्रद्रशन दाखवून दिले.
भारत की लक्ष्मी’ म्हणून शाळेतील महिला शिक्षकांचा सत्कार प्राचार्य संजीवकुमार भरद्वाज आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या वेळी “ocean of knowledge” या न्यूजलेटर चे उद्घाटन करण्यात आले.
या क्रिडा महोत्सवास कलमुद्दीन फारुकी (जिल्हा क्रिडा अधिकारी, हिंगोली), संदीप कुमार (प्राचार्य ,पोदार स्कूल नांदेड), चंद्रकांत सूर्यवंशी ( उपजिल्हाधिकारी साहेब ,हिंगोली) प्रा. आनंद भट्ट ( क्रिडा प्रशिक्षक ,आदर्श कॉलेज, हिंगोली), रूपाली ताई गोरेगांकर ( जि.प.सदस्या, हिंगोली ) एन.जि. कांबळे सर , व्यंटक हरीदास रेड्डी ( प्रशासकीय व्यवस्थापक , पोदार स्कूल, हिंगोली ) आणि संध्या तोमर ( मुख्याधिपिका, पोदार जुंबो किड्स हिंगोली), हे प्रामुख्याने उपस्थित होते
प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात म्हणाले की,विद्यार्थ्यानी शारीरिक ,मानसिक आणि बौध्दिक विकास होण्यासाठी खेळत राहावे. विद्यार्थ्यांमध्ये असलेली इच्छाशक्ती , उत्साह आणी मेहनत यामुळे शालेय जीवनात प्रगती साधता येते . त्याचप्रमाणे अंगी शिस्त लावल्यामुळे खेळामध्ये देखील प्रगती साधता येते . खेळाच्या माध्यमातून विविध नितीमूल्य जपले जातात . खेळाच्या माध्यमातूनच एकाग्रता , संघशक्ती , मैत्रीभावना यासारखे विविध भारतीय मूल्याचे जतन होते. त्यामुळे विद्यार्थ्यानी सतत खेळत राहावे.
कलमुद्दीन फारुकी यावेळी बोलतांना म्हणाले की,  “ शालेय विद्यार्थ्यानी आपल्या पालकांना सकाळी उठून मॉर्निंग वॉक साठी घेऊन जावे तरच भारत देश फिट होण्यास मोठ्या मदत होईल
क्रिडा महोत्सवात विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते . त्यामध्ये प्राचीन काळापासून भारतात खेळले जाणारे विठू – दांडू ,  कबड्डी, खो-खो,  लंगडी  आणि कंचा यासारखे शरीराला व्यायाम आणि चित्त एकाग्र करणारे खेळ क्रिडा ड्रिल च्या माध्यमातून खेळण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या फिट इंडिया चळवळ निरोगी भारत घडवण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे, हे फिट इंडिया या क्रिडा ड्रिल च्या माध्यमातून दाखवण्यात आले. फिट इंडिया या क्रिडा ड्रिल मध्ये शालेय विद्यार्थ्यानी भारतात खळल्या जाणार्‍या विविध खेळ खेळून विविध खेळ खेळत राहावे तरच भारत फिट होईल असा संदेश दिला .
फ्लाग ड्रिल , मास पिटि  , काठी ड्रिल , जिम्नॅस्टिक्स ड्रिल या सारख्या विविध ड्रिलच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यानी आपल्या शारीरिक कसरती आणि क्रिडा कला गुणांचे प्रदर्शन दाखवून दीले.

तसेच या क्रिडा महोत्सवास क्रिकेट , फूटबॉल , बास्केटबॉल, धावण्याच्या स्पर्धा या सारख्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये विजेत्या खेळांडूस प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पारितोषिक प्रदान करण्यात आले. शाळेतील क्रिडा शिक्षक शैख वहीद यांनी यशस्वीपणे क्रिडा महोत्सवाचे आयोजन करून शाळेतील विद्यार्थ्यांच्या क्रिडा गुणांना चालना दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका मोहिनी दीक्षित , प्रणाली दाभाडे , सुरभी अग्रवाल , फौजिया शैख , मनीषा पाटील , सुमती रत्नपारखी , शीतल  देशपांडे , तसेच शिक्षक संतोष दिपके , मुकुंद हुबे , सिद्धार्थ जमधाडे , निकेश यरमळ, चंद्रकांत नांगरे आणि कलाशिक्षक मुकेश डहाळे यांच्या सह शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांनी प्रयत्न केले.  


















विद्यार्थ्यानी पुस्तकांचे वाचन करून जागतिक विद्यार्थी दिवस आणि वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला

हिंगोलीदिनांक  : 15-10-2019
    येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम याची जयंती “वाचन प्रेरणा दिन ” म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतांना विद्यार्थ्यानी पुस्तकांचे वाचन केले.
 डॉ. कलाम याचे वाचना वर अपार प्रेम होते ते आपल्या बालवयापासून विविध पुस्तकांचे वाचन करत असत . त्या प्रमाणे शाळेतील मुलांना आपल्या बालवयापासून वाचनाची आवड लागावी म्हणून त्यांच्या जयंती निम्मीत विद्यार्थ्यानी पुस्तकांचे वाचन केले .
यावेळी शाळेचे प्राचार्य मा. संजीवजी भरद्वाज यांनी आपल्या मार्गदर्शनपर  भाषणातुन विद्द्यार्थ्यांना सांगीतले की, “आजच्या विद्यार्थ्यांना जवळ असणारे ज्ञान ही त्यांची फार मोठी शक्ती आहे .या शक्तीच्या सहाय्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतोच परंतु त्याचा कार्यशक्ती देखील प्रभाव पडतो. पुस्तकाचे वाचन जेवढे कराल तेवढे ज्ञान वाढत जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिक पुस्तकाचे वाचन करून आपले जीवन समृद्ध करावे.  ”


तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका मोहिनी दीक्षित,  मुकुंद हुंम्बे , पंकज संघई , संतोष दीपके, , सिद्धार्थ जमधाडे , मुकेश डहाळे , निकेश यरमल , चंद्र्कांत नांगरे ,कपिल जमधाडे आणि  अमोल शेष यांनी प्रयत्न केले तसेच या कार्यक्रमास  शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .














No comments:

Post a Comment