Tuesday 7 April 2020

ऑनलाईन क्लास

व्हर्च्युअल  क्लासच्या  माध्यमातून विद्यार्थ्यांचे  ज्ञानार्जन

ऑनलाईन क्लासरूम द्वारे  घरीच  भरतात शाळेतील तास : शिक्षकां सह वर्गमित्रास संवाद साधण्याची उत्तम सोय 

News on news express 



व्हर्च्युअल  क्लासच्या  माध्यमातून विद्यार्थ्यांचे  ज्ञानार्जन 

हिंगोली.  दि.  8-4-2020

येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल च्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना साठी  व्हर्च्यूअल क्लास सुरु करण्यात आले आहेत. 
पोदार व्हिजनरी मॅनेजमेन्ट, पोदार इनोव्हेशन सेंटर आणि आय टि  डिपार्टमेंट यांनी विद्यार्थ्यांना लॉकडाऊन कालावधीत घरूनच अभ्यासक्रम पूर्ण करता यावा यासाठी व्हर्च्युअल स्कूल प्लॅनचे आयोजन करण्यात आले आहे.

 त्या अनुषंगाने पोदार शाळेच्या वतीने हिंगोली शहरासह औंढा, जवळा बाजार, कळमनुरी आणि गोरेगाव येथील शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी घरीच अभ्यासक्रम पूर्ण करता यावा म्हणून ऑनलाईन व्हर्च्युअल क्लास सुरु केले आहेत.

शिक्षण ही आजची आणि उद्याची  एकमेव अद्वितीय अशी गुंतवणूक आहे.  जीवन व्यवस्थितपणे जगण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी शिक्षण घेतले पाहिजे. याची जाणीव सर्वांनाच झाली आहे. सध्याच्या लॉक डाऊनच्या काळात शाळा बंद आहेत. पण विद्यार्थ्यांचे शिक्षण नियमित चालू ठेवण्यासाठी पोदार स्कूलने ऑनलाईन क्लास सुरु केले आहेत.

ज्ञान देणाऱ्या शाळाच ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या घरीच आल्या आहेत. आजच्या प्रगत माहिती आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत.  ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून  मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ज्ञानार्जन करतांना दिसत आहेत. त्यास पालक वर्गही आपल्या पाल्यास मोठ्या प्रमाणात साथ देतांना दिसत आहेत.

 विद्यार्थी घरी बसूनच मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि टॅबच्या  माध्यमातून ऑनलाईन क्लासमध्ये सहभागी होत आहेत. शाळेतील प्रत्यक्ष क्लास मध्ये बसून शिक्षण घेण्याचा आनंद विद्यार्थी घेत आहेत. विद्यार्थी  आपल्या वर्ग आणि शिक्षकांशी मन मोकळे पणाने संवाद साधतांना दिसत आहेत.

ऑनलाईन क्लास चे विशेष :
1.शिक्षक विद्यार्थीना ऑनलाईन शिक्षण देतात. 
2.विद्यार्थ्यांची ज्ञानार्जनाची वृत्ती वाढीस लागते. 
3.विद्यार्थ्यांना शिक्षक प्रत्यक्ष शाळेत शिकवत असल्याचा अनुभव
4.विद्यार्थ्यांचा शिक्षकांशी थेट संवाद
5. विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण होतो 
6. विद्यार्थी मन लावून अभ्यास करत आहेत. 
7.लॉक डाऊन काळातील ताण- तणाव कमी होण्यास मदत 
8.घरात अभ्यास मय वातावरण निर्मिती होत आहे. 
9.विद्यार्थी नव -नवीन ज्ञान ग्रहन करत आहेत.  

माहिती तंत्रज्ञान अँप :
गूगल हँगआऊट अँप चा वापर करून शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. व्हाट्स अँपवरही शिक्षक विद्यार्थ्यांशी अभ्यासक्रमाची चर्चा करत आहेत.
बिटविनअस 'Between us ' अँपवर विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासक्रमाचे शैक्षणिक साहित्य उपलध करून देण्यात आले आहे.  शैक्षणिक साहित्यमध्ये अभ्यासक्रमाचे पीडीएफ, वर्कबुक, पीपीटी आणि विडिओ यासारख्या साहित्याचा समावेश आहे.
बिन्सटॉक   'Beanstolk'  अँपवर  विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची ऑनलाईन ई - बुक्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याचा मोठया प्रमाणात विद्यार्थी लाभ घेतांना दिसत आहेत.

शाळेचे प्राचार्य संजीवकुमार  भारद्वाज शिक्षकांशी विडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधतांना... 
शाळेचे प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज बोलतांना म्हणाले की,  'पोदार इंटरनॅशनल स्कूलने शिक्षक आणि विद्यार्थी यांचा माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून थेट संवाद साधत व्हर्च्युअल क्लास सुरु करण्यात आले आहेत.  याला विद्यार्थ्यांनाचा मोठया प्रमाणात उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
 पहिली ते दहावी पर्यंतचे सर्वच क्लास ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून घेण्यात येत आहेत.  पहिली ते पाचवीच्या वर्गाचे  दिवसातून किमान तीन क्लास घेण्यात येतात.  तर सहावी ते दहावीच्या वर्गाचे दिवसातून किमान पाच क्लास घेण्यात नियमित पणे घेण्यात येतात.
ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून दररोज किमान सातशे शाळेचे  विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
या क्लासमध्ये गणित, विज्ञान, इंग्रजी, मराठी, हिंदी आणि संस्कृत विषयाचा अभ्यासक्रम  शिकवला जात आहे.  शिक्षकांनी शिकवलेला अभ्यास, होमवर्क, प्रश्न-उत्तर विद्यार्थी पूर्ण करून व्हाट्सअँपद्वारे शिक्षकांना पाठवतात आणि शिक्षक ते तपासून मार्क देऊन विद्यार्थ्यांना परत पाठवतात त्यामुळे विदयार्थ्यांनी अभ्यास करण्यात अधिकच रुची निर्माण होत आहे.


पुढे बोलतांना म्हणाले की,  विद्यार्थ्यांनी नेहमी अभ्यासूवृत्ती ठेवावी आणि नवीन  ज्ञान मिळवाळे.  आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी स्मार्ट फोनचा वापर करावा.


विद्यार्थ्यांशी विडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद करतांना शिक्षक 







शिक्षक विर्च्यूअल क्लास मध्ये शिकवितांना 




शिक्षकांच्या प्रतिक्रिया :

ऑनलाईन क्लासचे विद्यार्थ्यांना एक नवीनच कौतुक वाटत आहे.  नवीन ज्ञान शिकायला मिळत असल्यामुळे विद्यार्थी क्लास मध्ये सहभागी होतात आणि शिक्षकांनी शिकवलेले मनपूर्वक ऐकतात.  विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ही पूर्ण होत आहे.  त्यामुळे विद्यार्थी खूपच आनंदी आहेत.  लॉकडाऊन च्या काळात विद्यार्थ्यांसाठी नवीन ज्ञान ग्रहन करण्याची संधी मिळाली आहे.

विर्च्यूअल क्लास मध्ये शिक्षण घेतांना विद्यार्थी. 










पालकांच्या प्रतिक्रिया :

पोदार स्कूलने आयोजित केलेले व्हर्च्यूअल क्लास अतिशय उत्तम आहेत.  त्या क्लास मुळे मुले खूपच आनंदी आहेत.  लॉक डाऊन च्या काळात मुले नुसते टीव्ही पाहून कंटाळाली होती.  या लॉक डाऊन काळात घरीच ऑनलाईन क्लास सुरु झाल्यामुळे मुले आनंदी आहेत.  घरात बसून क्लास मध्ये सहभागी होतात.  अभ्यास करतात.  शिक्षकांनी दिलेला होमवर्क पूर्ण करतात.  त्यामुळे आम्हालाही  आनंद वाटत आहे.  

लॉकडाऊन च्या काळात शाळेकडून ऑनलाईन क्लास सुरु झाल्यामुळे  मुलाचे ताण -तणाव कमी होताना दिसत आहे. मुले अभ्यासात व्यस्त आहेत.  नव नवीन ज्ञान ग्रहन करीत आहेत.  त्यामुळे मुलांचा दिवस अगदी मजेशीर आणि आनंदात जात आहेत.
पालकांच्या विर्च्यूअल क्लास बद्दल प्रतिक्रिया :




No comments:

Post a Comment