Saturday 11 April 2020

Stay at Home, Stay Safe and Stay Healthy







Stay Home, stay safe आणि stay Healthy चा मंत्र देतात ऑनलाईन.. 




घरी राहा, सुरक्षित राहा आणि निरोगी राहा चा मंत्र देतात ऑनलाईन 

हिंगोली, दि:

येथील पोदार जंबो किड्स ने आपल्या मुलांसाठी घरीच बसून EYFS चे मूलभूत शिक्षण शिकवायला सुरुवात केली आहे.
आजच्या लॉक डाऊन  च्या परिस्थिती मध्ये सर्वच शाळा बंद पडल्या आहेत.  मुलांना शाळेत जाता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरीच बसून शिक्षण देण्यासह विविध उपक्रम देखील ऑनलाईन शिकवण्यात येतात.

मुख्याध्यापिका संध्या तोमर बोलतांना म्हणाल्या की,  'आम्ही मुलांना शालेय अभ्यासक्रमासह पाच मूलभूत कौशल्य शिकवीत असतो, त्या मध्ये शारीरिक, सामाजिक, भावनिक, भाषिक आणि ज्ञाना संबंधी कौशल्य हे पाच कौशल्य शिकवीत असतो.
 तीन H च्या माध्यमातून म्हणजे Head, Heart आणि Hand ची काळजी कशी घ्यावी हे ऑनलाईन शिकवीत असतो.Stay Home, Stay safe and  Stay Healthy (घरीच राहा, सुरक्षित राहा आणि निरोगी राहा )चा मंत्र मुलांना ऑनलाईन देण्यात येत असतो.'

       (मुलांना ऑनलाईन शिक्षण देतांना शिक्षिका)

शाळेतील शिक्षिका फेसबुक अँप वरून मुलांना शिक्षणा सह विविध उपक्रम ऑनलाईन शिकवीत असतात.  त्या उपक्रम मध्ये मुलांसाठी योगा करणे, लिंबू  शरबत करणे, चित्र काढणे, गाणे म्हणणे, राष्ट्रगीत म्हणणे, झाडाला पाणी देणे, पक्ष्यासाठी झाडावर पाणी ठेवणे, गोर -गरिबाला अन्न दान देणे या सह विविध उपक्रम मुलांना नियमितपणे शिकवले जातात.  पालक आणि मुले सोबतच असल्यामुळे मुले  ते उपक्रम उत्तम पद्धतीने करतात आणि त्याचे फोटो शाळेला पाठवतात.

(झाडाला पाणी देतांना उपक्रम करतांना शाळेचा विद्यार्थी)




(चित्र कलेचे ऑनलाईन शिक्षण घेतांना विद्यार्थी)


(निंबू शरबत चा उपक्रम करतांना विद्यार्थी)



(पेपर चा वापर करून विविध उपक्रम करतांना विद्यार्थी)

(ऑनलाईन योगा शिकतांना शाळेचा विद्यार्थी)

No comments:

Post a Comment