Thursday 7 May 2020

' हैप्पी मुव्हमेन्ट ' कार्यक्रमातून लॉकडाऊन कालावधीत आनंदी जीवन जगण्याचा मुलमंत्र........





' हैप्पी मुव्हमेन्ट ' कार्यक्रमातून लॉकडाऊन  कालावधीत आनंदी जीवन जगण्याचा मुळमंत्र........

हिंगोली, दि. 6-5-2020

येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये ऑनलाईन '' हैप्पी मुव्हमेन्ट ' कार्यक्रमातून लॉकडाऊन  कालावधीत शिक्षकांना आनंदी जीवन जगण्याचा मुळमंत्र देण्यात आला.
प्राचार्य संजीवकुमार  भारद्वाज यांनी आजच्या नव्या जगात यशस्वी होण्यासाठी सात सॉफ्ट स्किल सांगितले. 
1. संवाद कौशल्य 
2. वेळ व्यवस्थापन 
3.ताण व्यवस्थापन 
4.सकारात्मक दृष्टिकोन 
5.स्व: प्रेरणा 
6.सृजनशील विचार 
7.जीवन ध्येय 
हे सात सॉफ्ट स्किल विकसित करून यशस्वी जीवन जगण्याचे सांगितले.
 आजच्या बदलत्या जगात यशस्वी  होण्यासाठी सॉफ्ट स्किल आवश्यक आहेत. आजच्या ताण - तणाव आणि बदलत्या जीवन 
शैलीमुळे बुद्धिमान आणि गुणी मानस केवळ सॉफ्ट स्किल नाहीत म्हणून अयशस्वी होतांना दिसत आहेत. म्हूणन सॉफ्ट स्किल शिकून आपले जीवन आनंदमय करावे.  
सॉफ्ट स्किल सोबत काही टिप्स देण्यात आल्या. त्या अश्या 
1. योगासने करणे 
2. पुस्तक वाचने 
3. हस्तकला शिकणे 
4. लेखन करणे 
5. विद्यार्थ्यांशी संवाद साधने 
6.विद्यार्थ्यांचे बर्थडे साजरे करणे 
या टिप्सचा उपयोग करून शिक्षकांनी स्वतः सह विद्यार्थीना देखील लॉकडाऊन कालावधीत आनंदी जीवन जगण्याचा मूळमंत्र देण्यात आला.
कोरोनावर जनजागृती करण्याच्या उद्देशाने कोरोना व्हायरसवर ऑनलाईन प्रश्नवली घेण्यात आली. तसेच हास्य विनोदी प्रश्न विचारून सर्वांनी खळखळून हसवण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment