Monday 1 June 2020

Dance kids Dance



विद्यार्थ्यांनी विविध कला आणि छंद जोपासून आनंदी जीवन जगण्याचा मार्ग शोधावा 
 -- प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज 

डान्स किड्स डान्स ऑनलाईन  नृत्य स्पर्धेस विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद 

नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून कोरोना  संकटात आंनदी जीवन जगण्याचा संदेश 

हिंगोली, दि : 30-5-2020
  
येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल ने    डान्स किड्स डान्स ऑनलाईन नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 
नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून कोरोना संकटात आनंदी जीवन जगण्याचा संदेश देण्यात आला. 

संपूर्ण जगात कोरोना व्हायरस ने हाहाकार उठवला आहे.  भारतातही गेल्या दोन महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे. ज्ञानदान करणाऱ्या शाळा, कॉलेज आणि विद्यापीठ बंद आहेत. विद्यार्थ्यांना घराबाहेर जाता येत नाही त्यामुळे चार भिंतीच्या बंदिस्त वातावरणात बंद आहेत. घरा बाहेरचे वातावरण अस्वस्थ करणारे आहे.  कोरोनाचा धुमाकूळ सुरु आहे.  मन हेलावून टाकत आहे.  त्यामुळे घरीच सुरक्षित राहणे आवश्यक आहे.
मन अस्वस्थ करणाऱ्या  परिस्थितीत  आणि संघर्षमय कालावधीत पोदार इंटरनॅशनल स्कूलने विद्यार्थ्यांना जीवन जगण्याची नवी प्रेरणा, नवी उमेद आणि नवे विचार मिळावेत.  तसेच संघर्षमय वातावरणातही रडत न बसता स्वतःच्या आत्मविश्वासाने संकटावर मात करावी.  संघर्ष करावा.  संकटाचा सामना करावा. लॉक डाऊन कालावधीत   विविध सृजनशील उपक्रम सुरु केले होते.  त्यामध्ये चित्रकला, संगीत, नृत्य, पुस्तक वाचन आणि क्रिडा या सारखे विविध उपक्रम सुरु केले होते.

प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज बोलतांना म्हणाले की,  " विद्यार्थ्यांनी विविध कला आणि छंद जोपासून आनंदी जीवन जगण्याचा मार्ग शोधावा.
डान्स किड्स डान्स ऑनलाईन  नृत्य स्पर्धेस विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांनी कोरोना  संकटात आंनदी जीवन जगण्याचा संदेश दिला. नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बालगीत, देशभक्ती, धार्मिक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या गीतावर मनमोहक आणि सुंदर नृत्य केले.   "
प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज नृत्याबद्दल बोलतांना म्हणाले की, " नृत्य करत असताना शारीरिक क्रियाकल्प होत असतात त्या सोबतच नृत्य केल्याने आत्मविश्वास वाढतो,  रक्त अभिसरण प्रक्रिया सुधारते, मांसपेशी मजबूत होतात, वजन वाढते.  नृत्यामधून मन:शांती, एकाग्रता, चपळता, तंदुरुस्ती आणि निरोगी राहण्यास मदत होते.  त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोरोना व्हायरस लॉकडाऊन काळात घरीच राहून व्यायाम, योगासने आणि नृत्य करावे.  तसेच सकारात्मक संगीत ऐकावे.

डान्स किड्स डान्स या ऑनलाईन  नृत्य स्पर्धेत जवळ जवळ 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.  विविध गीतावर सुंदर आणि मनमोहक नृत्य करून त्याचे डान्स व्हिडिओ शाळेला पाठवले होते.  
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेतील नृत्यशिक्षक संतोष दिपके, मोहिनी दीक्षित या सह शाळेतील सर्व शिक्षक यांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment