Friday 31 July 2020

कारगिल विजय दिवस साजरा

सैनिकांच्या शौर्यापासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन आजच्या कोरोना व्हायरस ने निर्माण केलेल्या प्रतिकूल परिस्थितीमध्येही विजय मिळवला पाहिजे.-- प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज 

कारगिल विजय दिवस साजरा 

हिंगोली, दि 26-7-2020

येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये डिजिटल माध्यमातून साजरा करण्यात आला.  प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज आणि शाळेतील शिक्षकांनी कारगिल विजय युद्धात शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. 
प्रतिकूल अश्या परिस्थितीतही शत्रूवर विजय मिळवणाऱ्या भारतीय वीर जवानांच्या अतुलनीय शौर्याची आठवण म्हणून कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो.  या वर्षी कारगिल विजय दिवस ऑनलाईन साजरा करण्यात आला . 
प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कारगिल विजय दिवसाबद्दल बोलतांना म्हणाले की, " कारगिल विजय दिवस सर्व भारतीयांच्या ह्रदयावर अभिमानाने कोरला गेलेला विजय  आहे. कारगिल युद्धात देशाच्या संरक्षणासाठी स्वतः च्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या भारतीय वीर जवानांचे विद्यार्थ्यांनी स्मरण करावे आणि त्याच्या पासून प्रेरणा घेऊन आजच्या कोरोना व्हायरस ने निर्माण केलेल्या प्रतिकूल परिस्थितीमध्येही विजय मिळवला पाहिजे.  "


कारगिल विजय दिवसाचा ऑनलाईन कार्यक्रमात   गौरव जगताप याने देशभक्तीवरील  सुविचाराच्या घोषणा दिल्या.   तसेच आर्या निलावार हिने सैनिकांच्या जीवनावर भाषण दिले. तसेच गंगोत्री वायचळ हिने आपल्या कवितेच्या माध्यमातून देशभक्तीचा संदेश दिला .
तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया देशमुख हिने केले.

तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  मोहिनी दीक्षित, मनीषा पाटील, नरेंद्रकुमार शर्मा महेश गौरखेडे, संतोष दिपके यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment