Saturday 1 August 2020

मुलांना आजी आजोबाच्या कथांची आवड

आजी आजोबाच्या कथा स्पर्धाचे मुलांसाठी आयोजन 

मुलांना आजी आजोबाच्या कथांची आवड 

हिंगोली, दि : 1-8-2020



आजी आजोबाच्या कथा स्पर्धाचे मुलांसाठी आयोजन येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने करण्यात आले होते. 
शाळेतील विद्यार्थ्यांच्या आजी आजोबाच्या कथा स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते.  त्यामध्ये आजी आजोबा आपल्या लाडक्या नातू नातीला देवी - देवता, मानवी मूल्य, बोधकथा अश्या विविध विषयावर कथा सांगून मानवी जीवनात विविध संकट येतात त्या संकटावर मात  करून विजयी जीवन जगावे असा संदेश देतात. 
आजी आजोबा ही अनेक पावसाळे पाहिलेली जेष्ठ व्यक्ती असे मानतात. त्यानी आपल्यापेक्षा अनेक संकटे पाहिलेली असतात. त्यावर मात करण्याच्या प्रसंगी धीर देण्याच्या कला त्यांच्याकडे असतात. 

पूर्वीच्या काळी आजी आजोबा आपल्या नातवंडांना एकत्र बसवून छान छान गोष्टी सांगत असत त्या पद्धतीने आजही आजी आजोबा आपल्या नातवंडांना छान छान गोष्टी सांगून संस्कार मूल्य देण्याचा प्रयत्न करतात.  पण आजच्या धावपळीत ह्या साऱ्या गोष्टी आपण विसरत आहोत. त्या आजी आजोबांच्या छान गोष्टी पुन्हा एकदा ऐकण्याची संधी मुलांना या उपक्रमाच्या माध्यमातून मिळत आहे.  
आपल्या सर्वांच्या घरातील आजी आजोबा ही दोन संस्कार केंद्रे आहेत. कधी गोष्टीच्या माध्यमातून तर कधी प्रत्यक्ष कृतीतून ती मुलांवर नकळत संस्कार करीत असतात.
नातवंडाला आजी प्रेमाने बघत असते. आजोबा त्यांचे लाड पुरवतात.  लहान मुलांच्या दृष्टीने आजी -आजोबा परमेश्वराच्या ठिकाणी असतात.
असे प्रतिपादन  प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज यांनी केले.

या स्पर्धेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. आजी आजोबा आपल्या नातवंडांना आपल्या शेजारी बसवून छान छान गोष्टी सांगतात आणि त्याचा व्हिडीओ बनवून शाळेला पाठवतात. त्यामुळे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आजी आजोबाच्या छान छान गोष्टी ऐकण्यास मिळत आहेत. 
 या उपक्रमात आजी आजोबांनी मोठया प्रमाणात प्रतिसाद दिला होता.

2 comments: