Sunday 2 August 2020

राखीचा धागा बहीण -भावाच्या प्रेमाच्या नात्याचे अतूट बंधन






राखीचा धागा बहीण -भावाच्या प्रेमाच्या नात्याचे  अतूट बंधन      ---प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज 
शाळेतील विद्यार्थींनी आपल्या भावासाठी बनवल्या होममेड राख्या : त्यावर लावला आपल्या लाडक्या भावाचा फोटो 



भार्गवी ने रक्षाबंधन के अवसरपर अपने प्यारे भाईयों (सर्वेश, सर्वज्ञ और गुणेश) के लिए गाया हुआ सुंदर गीत...तेरी खुशीयां

Video link





हिंगोली, दि. 3-8-2020

येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये होममेड राखी बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला शाळेतील विद्यार्थींनी मोठया प्रमाणात प्रतिसाद देऊन अनेक विद्यार्थींनी आपल्या लाडक्या भावासाठी होममेड राख्या बनवून बांधल्या आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे लॉकडाऊन वाढत आहे.  
हिंगोली शहरातही कोरोनाचा प्रकोप वाढत आहे.  त्यामुळे शाळा -महाविद्यालय बंद आहेत.  घराबाहेर जाने कठीण होत आहे.अश्या बंदिस्त वातावरणात शाळेतील विद्यार्थ्यांसाठी  विविध उपक्रम राबवून त्यांना कलाकुशल  बनवणे  आणि ताण तणावमुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरीत करण्यात येते. त्यासाठीच रक्षाबंधनदिनानिमित्त होममेड राखी बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
राखीचा धागा बहीण भावाच्या प्रेमाच्या नात्याचा अतूट बंध असतो.  बहीण भावाच्या प्रेमाचे बंधन म्हणजे रक्षाबंधन. असे प्रतिपादन प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज यांनी रक्षाबंधनच्या ऑनलाईन क्लासमध्ये  केले. 
कला शिक्षक मुकेश डहाळे यांनी विद्यार्थ्यांना होममेड  राखी बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले.  राखी कशी बनवावी याबद्दल बोलतांना ते म्हणाले की,  राखी पर्यावरणपूरक आणि होममेड बनवावी. घरच्या घरीच उपलब्ध साहित्यपासून राखी बनवावी आणि आपल्या लाडक्या भावाला  बांधावी.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.

1 comment: