Tuesday 23 March 2021

शहीद दिवस

पोदार मध्ये शहीद दिवस साजरा 

भगत सिंह , राजगुरू आणि सुखदेव यांना शहीद दिवसानिमित्त भावपूर्ण आदरांजली अर्पण


हिंगोली ,
दि: 23  मार्च 2021

  येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये भगत सिंह , राजगुरू आणि सुखदेव यांना शहीद दिवसानिमित्त भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली . 
प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज आदरांजली अर्पण करतांना म्हणाले की , ‘ आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या जिवाची बाजी लावणारे भगत सिंह , राजगुरू आणि सुखदेव महान क्रांतीकारी होते . त्यांच्या सारख्या अनेक शूर विरांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत बलिदान दिल आहे .  या शूर विरांच्या कार्यापसून प्रेरणा घेऊन आजच्या तरुणांनी देशकार्यात सहभाग घेतला पाहिजे .’ 

 शाळेतील शिक्षक प्रदीप निमकर आणि दिंगबर काळे यांनी आपल्या भाषणातून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवर प्रकाश टाकतांना भगत सिंह , राजगुरू आणि सुखदेव या क्रांतीविरा बद्दल माहिती दिली . 

शाळेतील संगीत शिक्षक निकेश यरमळ आणि अक्षय नायक यांनी


 ‘ सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है 
देखना है ज़ोर कितना बाज़ु-ए-कातिल में है’  हे क्रांतिकारी गीत सादर करून देशभक्तीमय वातावरण निर्माण केले .

कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन संतोष दिपके , मुकेश डहाळे आणि सब्बिला शैख यांच्या सह शाळेतील शिक्षक यांनी प्रयत्न केले .

No comments:

Post a Comment