Tuesday 23 March 2021

Moral Story

*आजची बोधकथा*
 ११ नोव्हेंबर २०२०

             *गैरसमज!*

*सॉक्रेटिस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता. एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला व त्याला सांगू लागला, "अहो...  तुमच्या मित्राबद्दल मी आताच काय ऐकले ? तुम्हास माहीत आहे की नाही ? "*
  *"भल्या माणसा , थोडा वेळ थांब ,"*
      *साॅक्रेटिसने त्याला थांबवले.* 
*"कोणतीही गोष्ट ऐकण्यापूर्वी मी ती माझ्या तीन गाळण्यातून गाळून घेतो व नंतर ऐकतो."*
     *"तीन गाळण्या...?*
*काय, आहेत तरी काय त्या?"*
    *" हे पहा, माझे पहिले गाळणे आहे , माहितीची सत्यता ! तुम्ही जे मला सांगणार आहात ते स्वत: पाहिले आहे काय ? "*
  *"नाही , मी ऐकले आहे ."*
*तो माणूस बोलला.*
   *" ठीक आहे ." सॉक्रेटिस म्हणाला.* 
   *" आता दुसरे गाळणे. मला असे सांगा की ते माझ्या मित्राबद्दल चांगले आहे की वाईट आहे ?"*
   *"ओ ... खरे तर ते चांगले नाही !"*
*तो माणूस बोलला.*
   *" म्हणजे तुम्ही अशी गोष्ट सांगणार आहात जी माझ्या मित्राबद्दल वाईट आहे , मात्र तिच्या सत्यतेबद्दल तुम्हाला कांही माहीत नाही ! बरोबर ? " साॅक्रेटिसने विचारले.* 
*" ठीक आहे . आता आपण तिसरे गाळणे लावूया. कदाचित त्यातुन तुम्ही खरे उतराल ."*
   *" तिसरे गाळणे आहे उपयुक्ततेचे ! तुम्ही जे मला सांगणार आहात ते माझ्यासाठी फायद्याचे आहे का ? "*       *"खरे तर नाही !"*
*तो माणूस बोलला.*
     *"हे पहा ," सॉक्रेटिस म्हणाला ,*
    *"जी गोष्ट माझ्या फायद्याची नाही... माझ्या मित्राबद्दल चांगले सांगत नाही... आणि जी खरी किंवा खोटी हे माहीत नाही, अशी गोष्ट ऐकून मी काय करणार? म्हणून तुम्ही ही मला अजिबात सांगु नका. बाय ! "आणि..*
*साॅक्रेटिसने आपले काम पुढे चालू केले.*

*तात्पर्य :* 
*कोणाबद्दल ऐकण्यापूर्वी या तीन गाळण्या अवश्य वापरा. तुमचा बहुमोल वेळ वाचेल आणि मित्रांबद्दलचा गैरसमज होणार नाही. आयुष्य सुखी होईल !!*
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
श्रीम. सोनवणी पी.एस.



Moral Story 


एकदा *एका उंदराने हिरा* गिळला. हिऱ्याच्या मालकाने त्या *उंदिराला मारण्यासाठी* एका शिकाऱ्याला कंत्राट दिले. शिकारी जेव्हा त्या उंदिराला मारण्यास पोहचला तेव्हा *सगळे उंदिर एक घोळका* करून एका दुसऱ्यावर *चढून दाटीवाटीने बसले होते, पण एक उंदिर त्यांच्यापासून वेगळा बसला* होता.
शिकाऱ्याने सरळ जाऊन त्या वेगळ्या बसलेल्या त्याच *उंदिराला पकडले ज्याने हिरा गिळला होता.*
हिरामालक आश्चर्यचकित झाला त्याने शिकाऱ्यास विचारले, तुम्ही हजारो उंदरातून ज्याने हिरा गिळलाय त्याच *उंदराला कसे काय ओळखले?*
शिकाऱ्याने उत्तर दिले खूप सोपं काम होत, *जेव्हा मूर्ख धनवान बनतो तेव्हा तो इतरांशी संपर्क तोडतो..!*
आयुष्यात *धन, दौलत, ऐश्वर्य, संपत्ती,नाव आणि सगळं काही कमवा* पण *आपण ज्या समाजात वाढलो, जगलो, मोठे झालो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो.* आपण ह्या *समाजामुळेच मोठे झालो हे कधीच विसरू नका..* नाहीतर त्या *मूर्ख उंदिरामध्ये* आणि *आपल्यात* काहीच *फरक* उरणार नाही..!🙏🏻😌
            
*माणसे जोडा*
*मानवता हाच धर्म*

No comments:

Post a Comment