Sunday 4 April 2021

व्हर्च्युअली काँन्व्हेकेशन डे

पोदार जम्बो किड्स शाळेत व्हर्च्युअली काँन्व्हेकेशन डे उत्साहात 
हिंगोली. 
दि : 
येथील पोदार जम्बो किड्स शाळेत व्हर्च्युअली काँन्व्हेकेशन डे उत्साहात  साजरा करण्यात आला.  या दिवशी विद्यार्थ्यांना प्रगती पत्रक देऊन सन्मानीत करण्यात आले.


यावेळी पालकांनी आपल्या  मुलांना ग्रॅज्यूएशन कॅप आणि स्वैशे देऊन आनंद द्विगुणित केला. या व्हर्च्युअली काँन्व्हेकेशन डे च्या निमित्ताने शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

व्हर्च्युअली काँन्व्हेकेशन डे च्या अनुषंगाने बाय बाय किंडर गार्डन मध्ये बालकांसाठी विविध उपक्रमाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 
डू इट ऑन माय ओन, सेटिंग माय टाईम टेबल मेमरी गेम, आय एम कोरोना वॅरियर या विषयावर काही प्रश्न मुलांना विचारण्यात आले.

शाळेचे प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की,  कोरोनाच्या जागतिक महामारीच्या पृष्ठभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षात ऑनलाईन शिक्षण देण्यात आले पण या ऑनलाईन गुणवत्तापूर्ण शिक्षणातून मुलांनी सर्वोत्तम प्रगती साध्य केली. शाळेत घेण्यात आलेल्या विविध उपक्रमास विद्यार्थीसह त्यांच्या पालकांनी देखील महत्वपूर्ण असे सहकार्य केले. 
कार्यक्रमात मुलांचा प्रतिसाद वाखाणन्यासारखा होता. या संपूर्ण कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका संध्या सिंग तोमर यांच्या सह शिक्षिका तृप्ती जाधव आणि भावना वडतकर यांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment