Thursday 22 July 2021

Guru Purnima 2021





आदर्श गुरु पोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

गुरु म्हणजे ज्ञानाची प्रकाशमय वाट…. प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज 



हिंगोली, दिनांक : 23-7-2021

  येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुरु पोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमात प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज यांनी शाळेतील सर्व शिक्षकांचा आदर्श गुरु म्हणून पुष्पगुच्छ शाल  श्रीफळ  देऊन सत्कार केला.

  भारतीय समाजात जीवनात गुरुचे स्थान हे सर्वोच्च असल्याचं समजलं जाते. एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार द्यावा अशा पद्धतीने गुरु आपल्या शिष्याच्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न करतो.आणि शिष्याचे जीवन हजारो आनंदाने फुलवत असतो. त्यामुळे गुरुचे आभार मानण्यासाठी म्हणून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते.

 प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून संदेश देतांना म्हणाले की, “ आज पर्यंत यशस्वी आणि लोकप्रिय झालेल्या प्रत्येक व्यक्तीला गुरुच्या मार्गदर्शनाखाली यश प्राप्त झालेले आहे. गुरूंचा आदर्श घेऊन आजच्या विद्यार्थ्यानी आपल्या जीवनात देखील यशस्वी आणि मोठे व्हावे. ”असे मत व्यक्त केले.

शाळेतील संगीत शिक्षक निकेश यरमळ यांनी गुरुप्रती आदरभाव व्यक्त करणारे स्वागत गीत सादर केले.'तुम्ही हो माता.. पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो ' मुकेश डहाळे यांनी प्रस्तुत करून आदर्श गुरुच्या चरणाप्रति शब्दसुमन अर्पण केले.
मराठी शिक्षक किरण जोगी यांनी गुरु आपल्याला अज्ञान अंधःकारातून प्रकाशमय वाट दाखवून जीवन यशस्वी करतात याबद्दल  'हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा
जब भी खुलेगी चमकेगा तारा
कभी ना ढले जो, वो ही सितारा
दिशा जिस से पहचाने संसार सारा' हे गीत सादर केले. देवेंद्र खरटमळ यांनी आपल्या कवितेतून गुरुच्या अपार महिमाचे गुणगान सादर केले.

मुख्याध्यापिका संध्या तोमर यांनी आपल्या कवितेतून ' जीवन के घोर अंधेरे में प्रकाश लाता है.. सागर से ज्ञान जो देता है वही गुरु कहलाता है..असी सुंदर विचार प्रस्तुत केले.

प्रतीक जैन यांनी गुरुशुभ्राय शुभरत्नाय, रत्नत्रयी कारिणे हे गीत सादर केले. पूजा पारीख यांनी कबीर दोहे सादर करून गुरुची महिमा वर्णन केली.संतोष सुरेशकांबळे यांनी आपल्या गोष्टीतून गुरु आणि शिष्ययाच्यातील प्रेमळ नातेबंधावर भाष्य केले.
प्रणाली दाभाडे यांनी आपल्या सुंदर अश्या विचारातून गुरुच्या भक्तीवर भाष्य केले. ज्ञानदा रोकडे यांनी कुसुमाग्रज यांची ' पाठीवरती हात ठेवूनी नुसते लढ म्हणा ' ही कविता सादर केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिंगबर पुयड यांनी केले

 कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन उपप्राचार्य मुकुंदराज हुंबे, अमोल शेष आणि संतोष दिपके यांच्यासह शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.









 

No comments:

Post a Comment