Wednesday 4 August 2021

पोदार इंटरनॅशनल स्कुलचा शंभर टक्के निकाल

 

















पोदार इंटरनॅशनल स्कुलचा शंभर टक्के निकाल :

 पोदार शाळेचा दक्ष भारद्वाज जिह्यातून पहिला तर  जय करडे, ऋषिकेश जाधव दुसरा…!



येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल इयत्ता दहावीचा सीबीएसई बोर्डाचा  निकाल  मंगळवारी जाहीर झाला असून,  बोर्डच्या शैक्षणिक मूल्याकंन धोरणा नुसार दक्ष भारद्वाज जिल्ह्यात पहिला आला तर जय करडे आणि ऋषिकेश जाधव याने दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारली.दरवर्षीप्रमाणे यंदाही पोदरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे.


पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या दहावीच्या बॅच मध्ये एकूण ६५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणित उज्वल असे यश संपादन केले.सीबीएसई दहावीच्या निकालामध्ये पोदार शाळेतून दक्ष भारद्वाज ९६.६०, जय करडे ९६.४०, ऋषिकेश जाधव ९६.४०,रमन उपाध्याय ९४.८०, सुदर्शन क्षीरसागर ९४.८०, राजुल सकतेपार ९४.६०, धनश्री हेडा ९४.४०, प्रथमेश तुपकरी ९४.६०, संस्कृती बियाणी ९४.४०, वेदांत कावरखे ९३.८०, प्रतीक्षा वानखेडे ९३.६०, अनिशा जावळे ९३.६०, महेश पाटील ९३.६०

वंशिका कयाल ९३.४० वैष्णवी कांगणे ९३.२९, शैली दमकोंडवार ९३.००, वेदांत माने ९२.००, आकांक्षा नायक ९१.६० यांनी ९० पेक्षा अधिक टक्केवारी मिळवून बाजी मारली आहे. तर दक्ष भारद्वाज आणि अनिशा जावळे या विद्यार्थ्यांनी गणित विषयामध्ये १०० पैकी १०० गुण प्राप्त करून घवघवीत यश प्राप्त केले.


शालेय जीवनात विद्यार्थ्यांचे खरे आयुष्य घडत असते. विद्यार्थ्यांसाठी दहावीचे वर्ष शैक्षणिक जीवनातील आधारस्तंभ असतो.  दहावीच्या निकालावर विद्यार्थ्यांचे भविष्यातील स्वप्न ठरत असतात. पोदार इंटरनॅशनल स्कूल  मधील दहावीच्या विद्यार्थ्यांनी  उत्तुंग असे यश संपादन केले आहे.  त्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस  प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज यांनी कौतुक केले.


यावेळी उपप्राचार्य मुकुंदराज हुंबे  सिद्धार्थ जमधाडे, अमोल शेष, देवेंद्र खरटमळ, कपील जमधाडे , सालेहा शेख यांचे मार्गदर्शन लाभले . शाळेच्या पालक व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्य, शाळेचे प्राचार्य आणि शिक्षक यांनी दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment