Friday 13 August 2021

विद्यार्थ्यांनी अधिक अधिक पुस्तकाचे वाचन करून आपले जीवन समृद्ध करावे

 विद्यार्थ्यांनी अधिक अधिक पुस्तकाचे वाचन करून आपले जीवन समृद्ध करावे


 - प्राचार्य मा. संजीव कुमार भरद्वाज


हिंगोली, दिनांक  : 12-8-2021


    येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये डॉ. एस.आर. रंगनाथन यांची जयंती “ग्रंथपाल दिन ” म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी शाळेचे प्राचार्य मा. संजीव कुमार भरद्वाज यांनी आपल्या मार्गदर्शनपर  भाषणातुन  सांगीतले की, “विद्यार्थ्यांनी अधिक अधिक पुस्तकाचे वाचन करून आपले जीवन समृद्ध करावे,  तसेच सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षणाची सुद्धा अत्यंत आवश्यकता आहे आणि त्याकरिता ग्रंथालयांचा सुदृढ पायावर विकास, प्रसार होऊन सर्वसामान्य भारतीयाला ज्ञानाची द्वारे विनामूल्य उघडी ठेवली पाहिजे, सर्वांना वाचन करण्याकरिता प्रवृत्त केले पाहिजे हा विचार भारतामध्ये डॉ. एस.आर.रंगनाथन यांनीच सर्वप्रथम रुजविला, जोपासला, वाढविला आणि केवळ त्या करीताच आपले आयुष्य झिजविले.’


 या प्रसंगी शाळेतील ग्रंथपाल चंद्रकांत नांगरे यांनी आपल्या भाषणातून ‘डॉ. एस.आर. रंगनाथन याचे “जीवन चरित्र सांगून  स्फूर्तिदायक मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांची वाचन अभिरुची वाढावी यासाठी विविध उपक्रम घेण्यात आले.

  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  देवेंद्र खरटमळ याने केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य मुकुंदराज हुंबे, अमोल शेष, मा.संतोष दीपके, संतोष सुरेशकांबळे, प्रतीक बोळारकर यांनी प्रयत्न केले तसेच या कार्यक्रमास  शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

























































































No comments:

Post a Comment