Sunday 5 September 2021

Teachers day news 2021

' थँक्स अ टीचर्स ' या थिम नुसार शिक्षक दिवस डिजिटल पद्धतीने साजरा 


शिक्षक देशाची उज्वल, सर्जनशील आणि चैतन्यमयी नवी पिढी घडवण्याचे कार्य करत असतात -  प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज 

 

हिंगोली, दिनांक : 5-9-2021

 

 येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये “थँक्स अ टीचर्स ' या उपक्रमाने विद्यार्थ्यानी ऑनलाइन शिक्षक दिवस साजरा केला.यावेळी प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज यांचा सर्व शिक्षकांच्या वतीने भव्यदिव्य सत्कार करण्यात आला. तर सर्वोत्कृष्ट शिक्षक म्हणून शाळेतील सर्व शिक्षकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच एसओएफ ओलंपियाड कडून देखील गुणवत्तापूर्ण शिक्षक म्हणून शिक्षकांना प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

कोरोना विषाणू संसर्गामुळे यावर्षी  विद्यार्थी शाळेत येऊन  शिक्षण घेऊ शकत नाहीत . पण विद्यार्थ्यांचे  ऑनलाइन शिक्षण यशस्वीपणे सुरू आहे . शिक्षक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण सहज आणि समजण्यास सोप्या पद्धतीने शिकवीत आहेत . त्यामुळे विद्यार्थ्यीची ज्ञान ग्रहण करण्याची रुची वाढत आहे. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यानी थँक्स अ टीचर्स या उपक्रमाने शिक्षक दिवस ऑनलाइन पद्धतीने साजरा केला .

प्राचार्य मा.संजीवजी भारद्वाज यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्याना संदेश देताना म्हणाले की “ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आजन्म शिक्षण क्षेत्रात आणि शिक्षण विषयांत लक्ष घालून दिलेले विचारधन लक्षात घेऊनच त्यांचा जन्मदिन हा’शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम म्हणतात की ' शिक्षणाने माणसात सर्जनशीलता येते. सर्जनशीलतेने तुमच्यात प्रगल्भ विचार येतात. विचाराने ज्ञान वाढते, आणि ज्ञानाने माणूस महान बनतो.'
महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सारख्या महान शिक्षकांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल केले. शिक्षक देशाचे भविष्य घडवण्याचे कार्य करत असतात.  शिक्षक आपल्या शिकवणीतून भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारी सामर्थ्यवान पिढी घडवत असतात.

निकेश यरमळ आणि त्यांच्या संगीत मंच्यातील विद्यार्थ्यांनी ' गुरु बिन ज्ञान नही ' हे गीत सादर केले. तर विद्यार्थिनी भार्गवी ऋषी हिने ' लड़खड़ाते है हम I थांम लेते है हात वोI हे गीत सादर केले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी लघुनाटिका सादर करून त्यामधून लॉकडाऊन काळातील ऑनलाईन क्लास आणि त्यामध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची भूमिका उत्तमपद्धतीने सादर करून शिक्षकांचे महत्व सांगितले.

या भव्यदिव्य शिक्षक दिनांचे सूत्रसंचालन सेलहा शेख, अक्षय नायक, आर्या निलावार आणि अर्थव भट्ट यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केले.
 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य मुकुंदराज हुंबे,  संतोष दीपके, मुकेश डहाळे ,  किरण जोगी, चंद्रकांत नांगरे आणि मोहिनी दिक्षित यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले .

No comments:

Post a Comment