Monday 10 June 2019

राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात साजरा

                           


विज्ञान विषयात विद्यार्थ्यानी रुची निर्माण करून आपले भविष्य घडवावे. - प्राचार्य संजीव भारद्वाज
हिंगोली, दि : 28-2-2019
 येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. सी. व्ही.  रमण यांचा हा शोध २८ फेब्रुवारी १९३० रोजी प्रकाशित झाला. ह्या कारणाने २८ फेब्रुवारीराष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून मानला जाते. विद्यार्थ्यांच्या दैनिक जीवनात विज्ञानाचे महत्व कळण्यासाठी दर वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. तसेच विद्यार्थांना विज्ञान विषयाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या विज्ञान विषयातील ज्ञान वाढवण्यासाठी विज्ञान दिवसाच्या निमिताने विविध वैज्ञानिक उपक्रम राबवत असते.
  शाळेचे प्राचार्य संजीव भारद्वाज यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात म्हणाले की ,  21 वे शतक हे विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे मानले जाते . नवनवीन यंत्रेतंत्रज्ञान हे बदल सर्व विज्ञानामुळे होत आहेत . आतापर्यंत विज्ञानामध्ये झालेल्या प्रगतीमुळे मानव जातीला तसेच संपूर्ण सृष्टीला चांगला फायदा झाला आहे.  नवनवीन ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि जीवन जगण्याचेउदरनिर्वाह करण्याचे एक प्रगतीशिल साधन मिळाले आहे . अश्या विज्ञान विषयात विद्यार्थ्यानी रुची निर्माण करून आपले भविष्य घडवावे. ”
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा . संतोष पांडे  आणि प्रा. डॉ . सत्यजित चव्हाण हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच शाळेचे प्रशासकीय व्यवस्थापक व्यंकट हरीदास रेड्डी आणि पोदार जुंबो किड्स च्या मुख्याधिपिका संध्या तोमर ह्या उपस्थित होत्या . “ धन्य है वैज्ञानिक जो , परहित में काम करे ”  हे वैज्ञानिक गीत निकेश यरमल आणी त्यांच्या संगीत मंचच्या विद्यार्थ्यानी सादर करून पालक आणि विद्यार्थ्याना मध्ये वैज्ञानमय वातावरण   निर्माण केला.  तसेच संतोष दीपके यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यानी विज्ञानावर आधारीत नृत्यमय नाटीकेच्या माध्यमातून विज्ञानाचे आजच्या 21 व्या युगातील महत्व सादर केले.
  या कार्यक्रमात विद्यार्थ्यानी विज्ञान विषयक विविध प्रोजेक्ट सादर केले होते. त्यामध्ये हिंगोली मधील विविध शाळेतील विद्यार्थ्यानी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात विज्ञानावर  आधारीत प्रश्न मंजूषाचे आयोजन करण्यात आले होते. प्रश्न मंजूषा मध्ये सेक्रेट हार्ट हाय इंग्लिश स्कूल हिंगोली आणि विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल हिंगोली यांचे संघ विजयी झाले. मॉडेल मेकिंग स्पर्धे मध्ये  पोदार इंटरनॅशनल स्कूल  वाशिम ,  सेक्रेट हार्ट हाय इंग्लिश स्कूल हिंगोली आणि  कै. माणिक पोदार लर्न स्कूल रिसोड  या शाळेतील प्रतियोगी विद्यार्थी विजयी झाले.  मिस मॅच खेळा मध्ये कै. माणिक पोदार लर्न स्कूल रिसोड आणि पोदार इंटरनॅशनल स्कूल  वाशिम या शाळेतील विद्यार्थी विजयी झाले. विज्ञानावर आधारीत ट्रेजर हंट खेळामध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल  वाशिम आणि ए.बी.एम. इंग्लिश स्कूल  हिंगोली वाशिम या शाळेतील सहभागी  विद्यार्थी विजयी झाले. 
  या कार्यक्रमास शाळेतील विद्यार्थी आणि पालक यांच्यासह अन्य शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचलन पंकज संघई आणि सलेहा शैख यांनी केले तर आभार शिक्षिका अनिता मॅडम यांनी मानले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुकुंद हुंबे , सिद्धार्थ जमधाडे , कपील जमधाडे , अमोल शेष , मुकेश डहाळे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले












No comments:

Post a Comment