Monday 10 June 2019

शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी



हिंगोली. दि : 18-2-2019
 येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य संजीवजी  भारद्वाज यांनी प्रथम शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. शाळेचे संगीत शिक्षक निकेश यरमल आणि त्यांच्या संगीतमंचच्या विद्यार्थ्यानी शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील सुंदर असे गीत सादर करून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि नवचैतन्यचे वातावरण निर्माण केले.
 शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजूषाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मनीषा पाटील यांनी शाळेतील सर्व विद्यार्थांना शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील प्रश्न विचारले. शाळेच्या शिक्षिका प्रणाली दाभाडे यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवन आणि कार्य यावर भाष्य करणारे भाषण दिले. त्यामध्ये त्या म्हणाल्या की, शिवाजी महाराज यांनी स्त्री ला मते समान मानून स्त्रियांचा आदर केला त्याप्रमाणे आपणही स्त्रीचा आदर आणी सन्मान करावा. ”
 शिवाजी महाराज यांच्या प्रेरक जीवनावर आधारित नाटिका सादर करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिवाजी महाराज यांच्या कार्याची ओळख करून देण्यात आली. या नाटीकेमध्ये विद्यार्थ्यानी शिवाजी महाराज , राजमाता जिजाऊमाता , शिवाजी यांचे मावळे तसेच औरंगजेब आणि त्यांचे सैन्य यांच्या वेशभूषा परिधान करून नाटिका सादर करण्यात आल्यामुळे एक जीवंत हुबेहूब देखावा प्रदर्शित झाला होता. नृत्य आधारित नाटिका शाळेतील नृत्य शिक्षक संतोष दिपके यांनी प्रयत्न केले.
  शाळेचे प्राचार्य संजीवजी भारद्वाज यांनी आपल्या मार्गरदर्शनपर भाषणात म्हणाले की, “ विद्यार्थ्यानी शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आपले जीवन यशस्वी करावे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातल्याच नाही तर अखील भारतातल्या प्रत्येकाचे स्फूर्तीदायी दैवत आहे.त्यांनी पारतंत्र्यातून स्वातं त्याकडे जाण्यासाठी प्रेरणा मिळावी असे आपले चरित्र घडविले आणि फार मोठा आदर्श निर्मान केला.कोणत्याही कार्याचा आरंभ लहानश्या मर्यादेत होतो आणि पुढे ते कार्य मोठ्या मर्यादेत गेलेले आढळते. ”


कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आर्यन आगलावे आणि शंतनु कदम यांनी केले तर शाळेचे शिक्षक मुकुंद हूम्बे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि शाळेतील कर्मचारी यांनी प्रयत्न केले.







No comments:

Post a Comment