Monday 10 June 2019

स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.




हिंगोली, 
दि: 12/01/2019

     येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये स्वामी विवेकानंद आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मा.संजीवजी भारद्वाज यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्याना संदेश देताना म्हणाले की “ स्वामी विवेकानंद यांनी बालकांचे सर्वांगीण विकास व्हावा , शिक्षण पद्धतीतून विद्यार्थी आत्मनिर्भर व्हावेत आणि त्याच्यात समाजसेवा करण्याची भावना विकसित व्हावी , मन आणि बुध्दी चा विकास व्हावा अश्या शिक्षण पद्धतीची पायाभरणी केली . त्यांच्यामुळे आजची भारतीय शिक्षण पद्धती ही विद्यार्थी केन्द्रित होत आहे.

प्रमुख पाहुणे मा. प्रा. गजानन बांगर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावरआपल्या भाषणात म्हणाले की “ आज आम्ही करोडो भारतीय मिळून स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातील भारत साकार करण्याचा संकल्प केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी एक विचार घेऊन जीवन जगले पाहिजे त्या विचार वर आपले सर्व आयुष्य पणाला लावून आपले जीवन सार्थक केले पाहिजे. 
   शाळेतील विद्यार्थी वेदान्त माने याने आपल्या भाषणात म्हणाले  कीराष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांनी शिवाजी महाराज यांच्या मनात कर्तृत्वाची भावना शिकवण्यासह राजनीति शिकवली. समान न्याय देण्याची वृती आणि अन्याय करणार्‍याला कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले.  मुलींनी राजमाता यांचे गुण अंगिकारून आजच्या जीवनात आत्मनिर्भर व्हावे , स्वता:सह आपल्या माता- पित्याचे नाव उज्ज्वल करावे.
तसेच या कार्यक्रमास शाळेचे प्रशासकीय व्यवस्थापक व्येंकटेश हरीदास उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक देवेन्द्र खरटमल आणि आभार चंद्रकांत नांगरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले .


















No comments:

Post a Comment