Monday 10 June 2019

वाचनाने माणसाचे जीवन फुलते , विकसित होते



 हिंगोली,
  येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये पुस्तकांचे प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. a p
 j abdul kalam यांचा जन्म दिवस महाराष्ट्र रीडिंग दिवस म्हणून आयोजित करण्यात आला होता. त्या निमित्त पुस्तक प्रदर्शनी आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले होते
   या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मा.संजीवजी भारद्वाज यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्याना संदेश देताना म्हणाले की “ पुस्तक वाचनाने व्यक्ती समृद्ध बनते. विचारांची श्रीमंती वाढते. नवनवीन विचार स्फुरतात. कल्पनाशक्ती तरल बनते. विचार प्रवाही बनतात. लिहिण्याचा तसेच बोलण्याचा वेग वाढतो. स्मरण प्रक्रियेत प्रवाहीपणा येतो. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या पुस्तकांचे वाचन करावे. वाचनाने माणसाचे जीवन फुलते , विकसित होते त्यामुळे बालवाचकांनी वाचनाचा छंद जोपासून आपले जीवन समृद्ध करावे. 
 ग्रंथपाल चंद्रकांत नांगरे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की ,  “ तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला सतत त्या क्षेत्रातील नवेनवे ज्ञाननवी नवी माहिती आणि अद्यावत कौशल्ये आत्मसात करावी लागतील. त्यासाठी तुम्ही पुस्तक वाचन करणे अत्यंत आवश्यक आहे. एक चांगले पुस्तक अनेक पिढ्यांसाठी अमूल्य ज्ञानसाठा व संपत्ती आहे. पुस्तक वाचनाचा मुख्य उद्देश हा ज्ञान प्राप्ती असला पाहिजे. ”
 पुस्तक वाचनाचा मुख्य उद्देश हा ज्ञान प्राप्ती असला पाहिजे. वाचन म्हणजे जीवनाला विकसित करते. या उद्देशयाने स्कोलास्टिक इंडिया या संस्थेने  येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये पुस्तकांचे प्रदर्शनी आणि विक्रीचे  आयोजन करण्यात आले होते
 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयाग मोटघरे , चंद्रकांत नांगरे , आणि स्कोलास्टिक इंडिया चे प्रतींनिधी प्रीतेश सर यांनी प्रयत्न केले. 



No comments:

Post a Comment