Tuesday 14 April 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार आत्मसात करावेत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार आत्मसात करावेत. 

कोरोना व्हायरस च्या लॉकडाऊन कालावधीत आपण सर्वांनी घरीच सुरक्षित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन करावे.

हिंगोली,  दि :14-4-2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार आत्मसात करावेत असे प्रतिपादन शाळेचे प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज यानी केले.
येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल च्या वतीने डिजिटल माध्यमाच्या साह्यायाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

पुढे बोलतांना प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज म्हणाले की, ' डॉ.   बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक दृष्टीकोन प्रगल्भ आणि आधुनिक होते .  शिक्षणाच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव ही मानवी मूल्य स्वीकारलेला स्वाभिमानी आधुनिक समाज निर्माण करण्याचे त्यांचे ध्येय होते. कोरोना व्हायरसच्या 
लॉकडाऊन कालावधीत आपण सर्वांनी घरीच सुरक्षित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन करावे. '

कोरोना व्हायरस लॉकडाऊन कालावधी सुरु असल्यामुळे सर्व शाळा, महाविद्यालय आणि ऑफिस बंद आहेत. त्यामुळे पोदार शाळेच्या माध्यमातून प्रथमच डिजिटल माध्यमाचा वापर करून भिम  जयंती साजरी करण्यात आली. 


गूगल हँगआऊट च्या द्वारे शाळेतील सर्व शिक्षक ऑनलाईन कॉन्फरन्स मध्ये सहभागी झाले होते.  

ऑनलाईन पद्धतीने शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रेरणादायी गीत सादर केले.  
तसेच शाळेतील शिक्षक देवेंद्र खरटमल यानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन आणि शैक्षणिक कार्यावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला.
I
या ऑनलाईन भिम जयंतीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी अनुष्का वाघमारे हिने केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment