Thursday 16 April 2020

ज्ञानाचा महामेरू आणि कुशल शिक्षक : प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज

 ज्ञानाचा महामेरू आणि कुशल शिक्षक  : प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज ...........
केळीच्या पाना पानात पाणी असते त्या प्रमाणे ज्ञानी माणसाच्या प्रत्येक शब्दात ज्ञान असते याची प्रचिती प्राचार्य सजीव कुमार भारद्वाज यांच्या व्यक्तिमत्वा मध्ये दिसून येते.
हिंगोली शहरातील शैक्षणिक विकासाच्या उद्देशाने आणि विद्यार्थ्यांना पारंपरिक  मूल्या बरोबरच आधुनिक शिक्षण देण्याच्या दृष्टीने निसर्गरम्य वातावरणात पोदार इंटरनॅशनल स्कूल ची  2015 मध्ये सुरुवात झाली.
आज या शाळेत हिंगोली शहरासह जवळा बाजार, औंढा (नाग ), कळमनुरी आणि  गोरेगाव येथून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी  येतात.  अल्पावधीतच  शाळेला प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज यांच्या मार्गदर्शना खाली CBSE ची मान्यता मिळाली.  आज या शाळेत जवळ जवळ 900 विध्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतात.

प्राचार्य सरांच्या मार्गदर्शनातून संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी दैनंदिन परिपाठाचे आयोजन करण्यात येते.  परिपाठा मध्ये महत्वपूर्ण आणि देशात चर्चत असणारे विषय घेण्यात येतात.

 त्या विषयावरच सुविचार, त्या विषयाची सखोल माहिती, श्लोक, सामान्य ज्ञान प्रश्न, विद्यार्थीचे भाषण, गणिताचे पाढे वाचन, शिक्षकांचे मार्गदर्शन त्यानंतर प्राचार्य सरांचे अनमोल असे मार्गदर्शन असते.
 या परिपाठात विदयार्थ्यांचे वाढदिवस मोठया उत्साहात साजरे करण्यात येतात.दररोजचा परिपाठ अत्यंत दर्जेदार आणि ज्ञानमय होण्यासाठी प्राचार्य सर शिक्षकांना विविध सूचना देत असतात.  त्या मुळेच शाळेचा परिपाठ नित्य नवीन आणि संस्कारक्षम होतात.  प्राचार्य सर आपल्या अनमोल अश्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण घेण्यासह  जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरीत करतात.

प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज यांच्या मार्गदर्शनातूनच शाळेत विद्यार्थ्यांसाठी  विविध कौशल्यपूर्ण उपक्रम राबण्यात येतात.त्या उपक्रमात विद्यार्थी मंत्रीमंडळ, वृक्षारोपण, निर्सगसहल, स्वच्छता अभियान, योगाभ्यास, एक राष्ट्र एक वाचन प्रकल्प, संगीत, नृत्य, क्रीडा स्पर्धा, वक्तृत्वस्पर्धा, कथास्पर्धा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय  स्तरावरील ऑलंपियाडच्या स्पर्धा,आर्ट आणि  क्राफ्ट च्या स्पर्धा या सह सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, हॉबी आणि स्पोर्ट्स मधील विविध मैदानी स्पर्धचे आयोजन, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी विविध पुरस्कार असे विविध उपक्रम प्राचार्य सरांच्या मार्गदर्श नातून राबवण्यात येतात.


 'अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया। चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः॥'
या ओवीप्रमाणे शिक्षक हे आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला शिक्षण रुपी प्रकाश दाखवतात.त्या प्रमाणे प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज विद्यार्थीसह शिक्षकांना आपल्या अतुलनीय मार्गदर्शनाने नव नवीन ज्ञान देतात. आपल्या आई - वडिलांसारखी सर्वांची काळाजी घेतात.

भारतीय पारंपरिक मूल्य आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा सुरेख संगम साधत सर्वात्तम शिक्षण देणे,  विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासह कौशल्य गुण विकसित करणारे शिक्षण देणे, विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देऊन राष्ट्र उभारण्या करीता त्यांच्या जीवनाला नव सृजनात्मक आकार देण्याच्या उद्देशाने प्राचार्य सर दिवस रात्र मेहनत घेतात.
प्राचार्य सरांच्या विविधांगी कलागुणांमुळे शाळेतील शिक्षकांची शिकवण्याची पद्धत अत्याधुनिक प्रगतशैलीने नटली आहे.  त्यामुळे मुलांच्या सुप्त कला गुणांना चालना मिळतांना दिसत आहे.  तसेच मुलांची अभ्यासातही प्रगती होतांना दिसत आहे. शाळेतील गुणवत्ता पूर्ण शिक्षण आणि नव नवीन उपक्रम या मुळे शाळेला हिंगोली शहरासह जिल्ह्यात आदर्श शाळा म्हणून नाव लौकिक मिळाला आहे.

आपल्या शैक्षणिक कार्यातील काही क्षण शिक्षकांनी आनंददायी घालवावेत यासाठी प्राचार्य सरांनी 'हैप्पी शिक्षक मुव्हमेन्ट ' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात शिक्षकांसाठी विविध खेळ - छोटे नावीन्य पुर्ण प्रकल्प  राबवून शिक्षकांना आनंददायी जीवन जगण्याचा संदेश देण्यात येतो. ह्या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षक विविध कौशल्य शिकले.
 प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज हे आपल्या पोदार इंटरनॅशनल स्कूल हिंगोली  च्या माध्यमातून सामाजिक आणि भारतीय मुल्य संवर्धनाचा  संदेश देणारे वार्षिक महोत्सव मोठ्या यशस्वीपणे साजरे करण्यासाठी कटाक्षाने प्रयत्न करतात.
जंगल बुक ते साऊंड ऑफ म्युझिक या थिमच्या माध्यमातून सामाजिक मूल्यांचे संदेश देणारे यशस्वी प्रयोगशील वार्षिक महोत्सव संपन्न करण्यास सरांचे मौलाचे सहकार्य लाभले आहे.
Ocen of knowledge या वार्षिक अंकाची सुरवात करून शाळेतील विद्यार्थीसह शिक्षकांच्या लेखन कलेला चालना मिळवून दिली.

बालमनात वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा म्हणून प्राचार्य सरांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात विज्ञान प्रोजेक्ट सादर केले होते.

प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज यांना सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशन यांच्या कडून दिला जाणारा हिंगोली जिल्हा स्तरीय सर्वात्कृष्ट प्रिंसिपल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  सर्वात्त्कृष्ट प्रिंसिपल पुरस्कार मिळाल्या बद्दल शाळेच्या पालक वर्गाने देखील प्राचार्य सरांचा मान -सन्मान केला.

कुशल संघटक : 
   प्राचार्य सरांनी शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्याशी  सुरेख सुसंवाद साधत त्यांचे कुशल संघटन निर्माण केले आहे. सरांच्या स्नेहशील आणि कर्तव्यनिष्ठ कार्यशैली मुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक आप आपले कर्तव्य आणि जबाबदारी सर्वोत्तम पद्धतीने निभावतांना दिसतात.

प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज  सरांच्या मार्गदर्शनातील काही अंश :


शिक्षण ही आजची आणि उद्याची  एकमेव अद्वितीय अशी गुंतवणूक आहे.  जीवन व्यवस्थितपणे जगण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी शिक्षण घेतले पाहिजे. याची जाणीव सर्वांनाच झाली आहे. सध्याच्या लॉक डाऊनच्या काळात शाळा बंद आहेत. पण विद्यार्थ्यांचे शिक्षण नियमित चालू ठेवण्यासाठी प्राचार्य सरांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन क्लास सुरु केले आहेत. 

या वेळी प्राचार्य सर बोलतांना म्हणाले की,  विद्यार्थ्यांनी नेहमी अभ्यासूवृत्ती ठेवावी आणि नवीन  ज्ञान मिळवाळे.  आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी स्मार्ट फोनचा वापर करावा.

विज्ञान दिवसा निमित्त मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज म्हणाले की , “ 21 वे शतक हे विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे मानले जाते . नवनवीन यंत्रे, तंत्रज्ञान हे बदल सर्व विज्ञानामुळे होत आहेत . आतापर्यंत विज्ञानामध्ये झालेल्या प्रगतीमुळे मानव जातीला तसेच संपूर्ण सृष्टीला चांगला फायदा झाला आहे.  नवनवीन ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि जीवन जगण्याचे, उदरनिर्वाह करण्याचे एक प्रगतीशिल साधन मिळाले आहे . अश्या विज्ञान विषयात विद्यार्थ्यानी रुची निर्माण करून आपले भविष्य घडवावे. ”

 प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज आपल्या क्रीडा दिवस साजरा करतांना मार्गदर्शनपर मनोगतात म्हणाले की, “ विद्यार्थ्यानी शारीरिक ,मानसिक आणि बौध्दिक विकास होण्यासाठी खेळत राहावे. विद्यार्थ्यांमध्ये असलेली इच्छाशक्ती , उत्साह आणी मेहनत यामुळे शालेय जीवनात प्रगती साधता येते . त्याचप्रमाणे अंगी शिस्त लावल्यामुळे खेळामध्ये देखील प्रगती साधता येते . खेळाच्या माध्यमातून विविध नितीमूल्य जपले जातात . खेळाच्या माध्यमातूनच एकाग्रता , संघशक्ती , मैत्रीभावना यासारखे विविध भारतीय मूल्याचे जतन होते. त्यामुळे विद्यार्थ्यानी सतत खेळत राहावे.

पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये “Sound of Music” या वार्षिक स्नेहसंमेलनातून जागतिक संगीत विश्वाचे दर्शन मोठ्या जल्लो उत्साहात साजरे करण्यात आले त्यावेळी बोलतांना प्राचार्य म्हणाले की . “आपले जीवनच संगीताच्या सप्तसुरांनी व्यापले आहे. संगीतामुळे आयुष्यात नवचैतन्य संचारते. वसुंधरेच्या प्रत्येक कणाकणात संगीत सामावले आहे. आज संगीत सर्वांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षणा–क्षणावर संगीत मानवासोबत असते. संगीत तुमचे आयुष्य बदलू शकते. संगीत तुमच्या जीवनास एक नवा आकार आणि एक नवी उमेद देते. संगीत हे मांगल्याचे प्रतीक आहे . तान -तनावाच्या काळात मनुष्य संगीताचा आधार घेऊन नव्या उमेदीने जीवन जगतो. संगीतामध्ये काही नवीनच जादू असते.  संगीताच्या  तालावर मनुष्य प्रेरणादायी विचार आत्मसात करू शकतो. जीवनाच्‍या प्रत्‍येक वळणावर संगीत आपल्‍याला जगायला शिकविते. ”
प्राचार्य सर आम्हा सर्व शिक्षकांना नेहमी प्रेरणादायी मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे  सर्व शिक्षकांस कार्य करण्याची नवी उमेद मिळते. त्याच्या सहजशील आणि सृजनात्मक वागण्याच्या पद्धतीमुळे सर्व शिक्षक मनापासून कार्य करतांना दिसतात.  

प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज यानी शाळेतील विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना घरीच राहा, सुरक्षित राहा आणि निरोगी राहा चा संदेश ऑनलाईन क्लास मधून दिला आहे.  त्या सोबतच त्यांनी कोविड 19 या आजराचे रक्षक म्हूणन कार्य करणारे डॉक्टर, नर्स,  पोलीस डिपार्टमेंट, प्यारामेडिकल स्टाफ, शासन व्यवस्था आणि सामाजिक संस्था यांचे आभार व्यक्त केले आहेत.

अश्या प्रेरणादायी,  मार्गदर्शक, गुरु आणि सृजनात्मक व्यक्तिमत्वाला  पोदार इंटरनॅशनल स्कूल चे सर्व प्रशासकीय स्टाफ, शिक्षक आणि शिक्षिका यांच्या कडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा !!!! 

1 comment: