Saturday 16 May 2020

लॉकडाऊन कालावधीत विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा, नवी उमेद आणि आत्मविश्वास देण्याच्या हेतूने चित्रकला स्पर्धेचे आयोजन.

चित्रकला स्पर्धेतून कोरोनावर जन  जागृती

Drawing competition news








कोरोनाच्या मगरमिठीत सापडलेल्या जगाचे चित्रातून रेखाटले प्रतिबिंब 

लॉकडाऊन कालावधीत विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा, नवी उमेद आणि आत्मविश्वास देण्याच्या हेतूने चित्रकला स्पर्धेचे आयोजन.
हिंगोली,  दि : 15 -5- 2020

येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या चित्रकला स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी कोरोनावर जनजागृती चा संदेश दिला.  
कोरोना विषाणूने संपूर्ण जगात चिंतेचे आणि भयावह वातावरण निर्माण झाले आहे.  कोरोना विषाणूचा प्रसार वाढू नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकार कडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. तसेच जन जागृती मोठ्या प्रमाणात केली जात आहे.  

कोरोनावर जन जागृती करण्याच्या हेतूने आणि लॉक डाऊन कालावधीत शाळेतील विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा, ऊर्जा आणि नवी उमेद देण्याच्या उद्देशाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये विद्यार्थ्यांनी कोरोनावर जन जागृती सह मानवी जीवनातील विविध भाव - भावनांवर चित्र रेखाटले आहेत. 
असे प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज यांनी प्रतिपादन केले.
 ते  पुढे बोलतांना म्हणाले की, चित्रकला हा विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि आत्मीयतेचा  विषय आहे.  शाळेत आर्ट गॅलरी स्थापन करून विद्यार्थ्यांनी काढलेल्या अप्रतिम आणि सुंदर चित्र त्यामध्ये लावण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चित्रकलेच्या  गुणांना चालना मिळेल.
 विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रातून कोरोनावर जन जागृती  संदेश दिला.  त्यामध्ये 
घरीच राहा, सुरक्षित राहा. 
मास्कचा वापर करा. 
संतुलित आहार घ्या. 
प्रशासनाला सहकार्य करा. 
सामाजिक अंतर पाळा. 
डॉक्टर, नर्स आणि पोलीस यांना सहकार्य करा. 
कोरोना योध्याचा सन्मान करा. 
असे विविध सामाजिक  संदेश देण्यात आले होते.
 कोरोनावर जन जागुर्ती करणाऱ्या चित्रासह निसर्गरम्य वातावरणा तील खेडे गांवचे सुंदर चित्र काढून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश दिला.
ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत पहिली  ते तिसरी या प्रथम गटातून    रिषभ अग्रवाल,सोहम खैरनार
आराध्य शिवाल
हे विजयी झाले.
 चौथी ते सहावी या द्वितीय गटातून ऋतुजा गडदे,  सैशा गुंडेवार आणि लक्ष हेडा हे विजयी झाले.
सातवी ते दहावी या तृतीय गटातून प्रथमेश पातुरकर, कौस्तुभ अवचार, पलक बांडे हे विद्यार्थी विजयी झाले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलाशिक्षक मुकेश डहाळे यांच्या सह शाळेतील सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.


No comments:

Post a Comment