Monday 11 May 2020

Mother's Day

Mother's Day 


मातृदिनाचा सोहळा :
आईचा स्पर्श जगण्याला सार्थ करतो.... 

हिंगोली, दि : 10-5-2020

जगातील अनेक देशात मे महिन्याचा दुसरा रविवार मातृदिन म्हणून पाळला जातो.  या दिवशीच नाही तर दररोज मातेच सन्मान आणि गौरव केला पाहिजे. 
जागतिक मातृदिनाचा सोहळा पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्रथमच ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. त्याला शाळेतील विद्यार्थी आणि त्यांच्या मातांनी मोठया प्रमाणात प्रतिसाद दिला. 
'ममतेचा स्पर्श तुझा 
माझ्या सुख दुःखात 
मायेचा सहारा देऊन 
जगण्याला सार्थ करतो "  मायेचा स्पर्श देऊन दुःखाच्या संकटाच्या डोंगरावर यशाचा झेंडा रोवण्यासाठी आपल्या लेकरांना अपार पंखबळ देणारी आई  एक महान तपस्वी, ईश्वरासम आहे. असे प्रतिपादन प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज यांनी यावेळी केले.
या ऑनलाईन कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी आपल्या आईला विविध कामात मदत करतांना दिसतात. त्यामध्ये आईला भांडी घासतांना, रांगोळी काढतांना, गाई -गुरांना चारा पाणी देतांना अश्या विविध कामात आपल्या आईला विद्यार्थी मदत करत आहेत.
 तसेच आई सोबत योगासने, व्यायाम, संगीत आणि नृत्य यासह विविध कार्य विद्यार्थी करत आहेत. मातृदिनीच नव्हे तर दररोजच विद्यार्थी आपल्या आईला मदत करण्याचा संकल्प करतात. 
विद्यार्थी आपल्या आई बद्दलच्या प्रेम भावना शब्द आणि चित्ररूपाने प्रकट करतात.
अनुष्का वाघमारे काव्यपंक्ती मधून आईची महिमा गातांना म्हणते ' आई सारख गोड कोणी
पाहिले नाही 
जिवंत डोळ्यांनी कधी देव 
दिसेल असं वाटल नाही 
आईच देव आहे..  
आईच माझे सर्वस्व आहे. "











No comments:

Post a Comment