Wednesday 15 July 2020

पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे CBSE बोर्ड दहावीच्या पहिल्या बॅचचे घवघवीत यश

CBSE बोर्ड दहावीच्या परीक्षेत पोदार इंटरनॅशनल स्कूलचा पहिल्याच बॅचच्या विद्यार्थ्यांचा  शंभर टक्के निकाल 


 CBSE बोर्ड मधून पोदार स्कूलचे वेदांत गोरे हिंगोली जिल्हा स्तरीय प्रथम तर भूमी बगडीया जिल्हा स्तरीय द्वितीय 

हिंगोली,  दि.  15-7-2020
येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल इयत्ता दहावीचा CBSE बोर्ड चा निकाल जाहीर झाला आहे.  


CBSE बोर्डच्या वतीने घेण्यात आलेल्या 2019-2020 या वर्षीच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.  त्यामध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल मधील प्रथमच वर्षी 
 दहा विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. तर बाकी सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.  
प्राचार्य बोलतांना म्हणाले की,' शालेय जीवनात विद्यार्थ्यांचे खरे आयुष्य घडत असते. विद्यार्थ्यांसाठी दहावीचे वर्ष शैक्षणिक जीवनातील आधारस्तंभ असतो.  दहावीच्या निकालावर विद्यार्थ्यांचे भविष्यातील स्वप्न ठरत असतात. पोदार इंटरनॅशनल स्कूल  मधील दहावीच्या प्रथम बॅचने उत्तुंग असे यश संपादन केले आहे.  त्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा. '
पोदार इंटरनॅशनल स्कूल मधून CBSE  बोर्ड दहावीच्या परीक्षेत वेदांत गोरे 96.60 टक्के घेऊन शाळेत प्रथम, तसेच त्याला  गणितामध्ये 100 पैकी 100 मार्क मिळाले.  भूमी बगडिया 96.40 टक्के घेऊन द्वितीय आली, तर रीतेश चौतरे 94.40 टक्के घेऊन तृतीय आला आहे.

पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या दहावी प्रथम बॅच मध्ये एकूण 33 विद्यार्थी होते ते सर्वजन सर्वोत्त्कृष्ट मार्क घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. त्या विद्यार्थ्यांना  प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज यांच्यासह सिद्धार्थ जमधाडे, मुकुंदराज हुंबे, एन. के. शर्मा, अमोल शेष, कपील जमधाडे यांचे मार्गदर्शन लाभले होते.
शाळेच्या पालक व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्य, शाळेचे प्राचार्य आणि शिक्षक यांनी दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील अभ्यासासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment