Wednesday 15 July 2020

Students council election 2020-21


''विद्यार्थ्यांनी  आपल्या जीवनात लोकशाही मूल्यांचा अंगीकार करावा''.  
    --  प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज


डिजिटल माध्यमाच्या सहाय्याने ऑनलाईन मतदानाचा प्रयोग यशस्वी.....

कोरोना व्हायरस पेंडामीक आरोग्य प्रमुख  विद्यार्थी म्हणून कौस्तुभ अवचार आणि शृष्टी झंवर यांची निवड 

हिंगोली,  दि.  15 जुलै २०२०

   येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये डिजिटल माध्यमाच्या सहाय्याने विद्यार्थी परिषद निवडणूक घेण्यात आली.
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी शाळेत येऊन शिक्षण घेऊ शकत नाहीत आणि शाळेतील कोणत्याच कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नाहीत ; पण शाळेने व्हर्च्यूअल डिजिटल माध्यमाच्या सहाय्याने ऑनलाईन मतदान करण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. त्याला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद देऊन मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला.  
प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की,  ''मतदान हा भारतीयांचा  महत्त्वाचा हक्क, अधिकार आहे'', त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे.  लोकशाही मूल्याची शिकवण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मिळावी यासाठी विद्यार्थी परिषद  निवडणूक घेण्यात आली.

शाळेतील विद्यार्थ्यांना व्हर्चूअल क्लासमध्ये भारतीय लोकशाही, निवडणूक पद्धती, मतदान आणि मतदान कसे करावे, मतमोजणी याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
ऑनलाईन मतदान प्रक्रियेत 
बॅलेट पेपर म्हणून गूगल फॉर्मचा वापर करण्यात आला होता.  गूगल फॉर्ममध्ये उमेदवारांच्या फोटोसह निवडणूक चिन्हांची यादी देण्यात आली होती.  सरळ आणि सोप्या पद्धतीने ऑनलाईन मतदान घेण्यात आले.ऑनलाईन मतदान प्रक्रियेत सहाशे विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील या ऑनलाईन निवडणूक प्रक्रियेचे कौतुक केले.
फोटोविथ मतदान सेल्फी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान करतांनाचा सेल्फी काढला.  आपल्या भारत देशात देखील ऑनलाईन निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे घेण्यात येऊ शकते हे या प्रयोगातून दिसून येते.
ऑनलाईन घेण्यात आलेल्या निवडणुकीत शाळेचा प्रमुख विद्यार्थी म्हणून वरद सूर्यवंशी आणि प्रमुख  विद्यार्थींनी शैली दमकोंडावर हे विजयी झाले. 
तर उपप्रमुख विद्यार्थी जय कांबळे,  उपप्रमुख विद्यार्थिनी राशी साबू, क्रिडाप्रमुख विद्यार्थी सार्थ मास्ट,  सांस्कृतिक प्रमुख   विद्यार्थिनी श्रुती घुगे,  सांस्कृतिक उपप्रमुख  विद्यार्थी संकल्प मोरे, सांस्कृतिक उपप्रमुख विद्यार्थिनी  मानसी कोरडे, आरोग्य प्रमुख विद्यार्थी अभिनव पवार,  आरोग्य उपप्रमुख  पियुष रणखांब तर शिस्तप्रमुख  विद्यार्थी संस्कार सोवितकर हे विजयी घोषित झाले.
ऑनलाईन मतदान प्रक्रियेत विजयी उमेदवारांचे प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज आणि शाळेतील सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले.
प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज आणि वरिष्ठ कॉर्डिनेटर मुकुंदराज हुंबे  तसेच निवडणूक समिती सदस्य व्यंकट हरिदास रेड्डी, मोहिनी दिक्षित ,  बालाजी जायभाये, नरेंद्रकुमार शर्मा, महेश गौरखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन मतदान प्रक्रिया यशस्वी पार पडली.

No comments:

Post a Comment