Saturday 27 June 2020

व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांच्या सकारात्मक प्रतिक्रिया

व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या  शिक्षणास प्रारंभ ......

 

  व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांच्या सकारात्मक प्रतिक्रिया....

    

शिक्षणाचा  मुख्य उद्देश अभ्यासक्रमातील विषयासह मुलांच्या विचारक्षमता आणि जीवन कौशल्य विकसित करणे आहे..... 

 


प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज

 

प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज व्हर्च्युअल क्लासबद्दल बोलतांना म्हणाले की , महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये , म्हणून ऑनलाईन क्लासेस सुरू केले आहेत . मुलांच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीचा विचार करून शाळेत ऑनलाईन क्लास घेण्यात येत आहेत मुलांच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने मानसतज्ज्ञाद्वारे मार्गदर्शन देण्यात येत आहे . शाळेच्या परिसराची सॅनिटायझरने फवारणी केलली असून नियमित सॅनिटायझरचा वापर शाळेमध्ये होत आहे . शाळेत ठीक - ठिकाणी सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध केली आहे .

  मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी पालक आणि शिक्षक यांच्यात  ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावर पालकांनी सकारात्मक मतप्रदर्शन केले . पालक आणि विद्यार्थी यांनी व्हर्च्युअल क्लासची निकड लक्षात घेऊन उत्साहाने प्रतिसाद दिला व तेवढ्याच उत्साहाने विद्यार्थ्यानी व्हर्च्युअल क्लासमध्ये सहभाग घेऊन आपले ज्ञान दृद्धिंगत  केले . जो पर्यन्त ही परिस्थिती सुधारणार नाही  तो पर्यन्त आम्ही ही प्रक्रिया सुरळीत ठेवणार आहोत.

 








 

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षित... 

              

 - माधवीताई पाटील (जि.प.सदस्या)

ऑनलाईन क्लासमध्ये मुले मोठ्या उत्साहाने आणि नवचैतन्याने सहभागी होतात. अभ्यासाबद्दल नवीन संकल्पना आणि सिद्धांत शिकतात. मुलांच्या मनात पडणारे प्रश्न त्यांच्या शिक्षकांना विचारतात. त्यामुळे अभ्यासाबद्दल मुलांच्या मनात गोडी निर्माण होते.  हे सर्व पाहून आम्ही पालक खूप आनंदी आहोत.  म्हूणन म्हणावेसे वाटते की,  व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शिक्षणामुळे मुलांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षित होत आहे.

 

 

व्हर्च्युअल क्लासच्या शिक्षणातून मुले अभ्यासात मग्न..... 

                 

  - पंडीत अवचार  (जि.प.शिक्षक )

 

 कोरोना व्हायरसने निर्माण झालेल्या भयानक परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून व्हर्चूअल क्लास सुरु केले हे कौतुकास्पद आहे.   विशेषतः दहावीचे विद्यार्थ्यी आपत्ती काळातही अभ्यासापासून दुरावले नाहीत.  त्यांना नियमित अभ्यास विषयक माहिती मिळत आहे .  अध्यापन व त्यानंतर त्या घटकावर प्रश्नोत्तरेचर्चाठराविक कालावधीनंतर टेस्ट यामुळे विद्यार्थ्यांना या व्हर्च्युअल क्लासचा मोठा उपयोग होताना दिसत आहे.

 

 

व्हर्च्यअल क्लासमुळे मुलांचे लक्ष कोरोनावरून अभ्यासाकडे वळले

                

   -पंकज दुबे (पालक )

   कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आपत्तीजनक स्थिती आणि  शाळा बंद झाल्यामुळे मुलांच्या मानसिक आणि शैक्षणिक विकासावर परिणाम होऊ शकतो या चिंतेने  पालक ग्रस्त होते; पण पोदार स्कूल ने सुरु केलेल्या  व्हर्च्युअल क्लासमुळे मुलांचे लक्ष कोरोनावरून अभ्यासाकडे वळले.

 

 

 

 

व्हर्च्युअल क्लासमधून अभ्यास  विषयाच्या संकल्पना सोप्या पद्धतीने मांडणी.... 



- नितीनकुमार घुगे (पालक)

 

व्हर्च्यअल क्लासमधून अभ्यास विषयाच्या संकल्पना सोप्या पद्धतीने उदाहरणासह विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात येतात. त्यामुळे मुलांना अभ्यासात गोडी निर्माण होतांना दिसत आहे.  व्हर्च्युअल क्लास मुलांच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरत आहेत.

 

 

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया : 

 

 

आम्ही खूप खूप अभ्यास करू आणि शाळेचे नाव उज्ज्वल करू 

 -

राजवर्धन माने (सहावीचा विद्यार्थी)

 

कोरोना मुळे जगात अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे.  शाळा बंद आहेत. आम्ही शाळेत जाऊ शकत नाही.  त्यामुळे शिक्षणाची चिंता लागली होती पण या भयानक परिस्थितीमध्ये शाळेने व्हर्च्यूअल क्लास सुरु केल्यामुळे  आम्ही खूप आनंदी झालो.  सरांनी शिकवलेल्या अभ्यासक्रमाचा आम्ही खूप खूप अभ्यास करू आणि शाळेचे नाव उज्ज्वल करू.

 

 

 

दहावीच्या विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल क्लासचे शिक्षण अत्यंत मोलाचे ठरत आहे.... 

   

  -- वेदांत माने (दहावीचा विद्यार्थी)

 

मी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.  दहावीचे वर्ष आयुष्यातील टर्निंग पॉईंट असते.  पण 

कोरोना व्हायरसने निर्माण केलेल्या महाभयंकर परिस्थिती अभ्यासाची चिंता लागली होती.  पण पोदार स्कूलने व्हर्च्युअल क्लासमुळे आम्ही घरूनच शिक्षण घेऊ लागलो.   दहावीच्या विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल क्लासचे शिक्षण अत्यंत मोलाचे आणि मार्गदर्शक ठरत आहे.

 


 व्हर्च्युअल क्लासने  डिजिटल शिक्षण घेण्याची संधी निर्माण केली आहे.... 

   

 पलक जैस्वाल (आठवीची विद्यार्थिनी)

आजच्या काळात व्हर्च्युअल क्लासने  डिजिटल शिक्षण घेण्याची संधी निर्माण केली आहे.

लॉकडाऊन कालावधीपासूनच शाळेने सुरु केलेल्या व्हर्च्युअल क्लासमध्ये  आम्ही मोबाईल,  कॉम्पुटरचा  शिक्षणासाठी वापर करत आहोत.   शाळेत घेतले जाणारे तास आमच्या मोबाईलवरून घेतले जातात या संकल्पनेने आम्ही भारावून गेलो आहोत.

 

 

    

2 comments:

  1. Virtuallearning brought the students in routine life.even during this pandemic kids feel secure after seeing their teachers ,friends.teacher and students interact with each other very nicely.school adminstration doing great efforts but I feel that if we want virtual learning more effective parents keen observation must be needed..PIS is the best school in HINGOLI having very Cooperative staff and nice teachers.

    ReplyDelete
  2. Virtuallearning brought the students in routine life.even during this pandemic kids feel secure after seeing their teachers ,friends.teacher and students interact with each other very nicely.school adminstration doing great efforts but I feel that if we want virtual learning more effective parents keen observation must be needed..PIS is the best school in HINGOLI having very Cooperative staff and nice teachers.

    ReplyDelete