Tuesday 11 August 2020

श्रीकृष्ण जन्मअष्टमी साजरी.

श्रीकृष्ण जन्मअष्टमी  साजरी.

हिंगोली.  दि: 11-8 -2020

 येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्मअष्टमी मोठ्या उत्साहात ऑनलाईन साजरी करण्यात आली.  या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य संजीव भारद्वाज हे होते. 

 मा. प्राचार्य संजीव भारद्वाज विद्यार्थ्यांना दिलेल्या मार्गदर्शन भाषणात म्हणाले की ,  “ भारत हा प्राचीन संस्कृती – परंपरा लाभलेला देश आहे. आपल्या देशात श्रीकृष्ण भगवान सर्वांचाच लाडका असून त्यातही बाल गोपालांचा अत्यंत लाडका मित्र , सवंगडी आणि मार्गदर्शक गुरु आहे . श्रीकृष्ण यांची महानता , दयाशीलता , मानवता आणि सर्व प्राणीमात्रावर असणारी त्यांची करुणा आंगीकरून विद्यार्थ्यानी आपले जीवन यशस्वी करावे.
  शाळेच्या पहिली ते दुसरी च्या विद्यार्थ्यानी ऑनलाईनच राधा – श्रीकृष्ण यांच्या रूपातील वेशभूषा परिधान करून सर्वांना श्रीकृष्ण जन्मअष्टमी च्या शुभेच्या दिल्या. तसेच शाळेतील सर्वच विद्यार्थ्यानी ऑनलाईन क्लासद्वारे  श्रीकृष्णच्या गीतावर सुंदर असे सामुदायिक नृत्य सादर करून श्रीकृष्ण जन्मअष्टमी मोठ्या आनंददायक , प्रसन्नमाय वातावरणात साजरी करण्यात आली.

या ऑनलाईन कार्यक्रमात कृष्णजन्माष्टमी  निमित्त कृष्ण जन्माची कथा, नटखटपणामध्ये सुंदर माखण चोरीचे दृश्य ,कृष्ण रासलीला आणि  कालिया मर्दन मध्ये कालिया नागाचे मर्दन अश्या छोटया छोट्या नाटिकेच्या माध्यमातून विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी वेशभूषा आणि पोशाख परिधान करून मुलांच्या ऑनलाईन नाटिकेत सहभाग घेतला.

  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका मोहिनी दीक्षित, सुमती रत्नपारखी, आनंद देऊळकर, हरिदास रेड्डी यांच्यासह सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.

2 comments: