Sunday 13 September 2020

आजी-आजोबा हे नातवंडासाठी घरातील संस्काराचे विद्यापीठ आहेत

माझे लाडके आजी – आजोबा माझ्या जीवनातील खरे हिरो ........... चिमुकल्या नातवंडाचे उद्गार


कार्यक्रमाचा व्हिडिओ 




आजी-आजोबा हे नातवंडासाठी घरातील संस्काराचे विद्यापीठ आहेत – प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज  


हिंगोली, दिनांक : 13 Sept. 2020           

 स्पर्धेच्या युगात भावी पिढी सक्षमतेने आणि नवचैतन्याने घडावी या उद्देशाने पोदार इंटरनॅशनल स्कूल हिंगोलीची वाटचाल सुरू आहे . शिक्षणासह भारतीय संस्कृतीतील मानवी मूल्य आणि जीवनबोध विद्यार्थ्यांना शिकविल्या जातात . याचाच एक भाग म्हणून पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये आजी –आजोबा दिवस ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला . या दिवसाच्या माध्यमातून भावी पिढीचा थेट तिसर्‍या पिढीशी संवाद घडवून त्यांचे नातेबंध अधिक घट्ट बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला . यावेळी नातवंडे आपल्या लाडक्या आजी –आजोबाला खरे हिरो मानतात आणि त्याच्यापासून जीवन जगण्याची प्रेरणा घेतात .

आजी-आजोबा हे नातवंडासाठी घरातील संस्काराचे विद्यापीठ आहेत असे प्रतिपादन  प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज यांनी केले . ते पुढे बोलतांना म्हणाले की , “आजी-आजोबा हे वटवृक्षाप्रमाणे  आपल्या नातवंडांना नेहमी मायेची सावली देतात .त्यांच्या अनेक नाती-गोती विणलेली असून, नव्या-जुन्याला जोडणारे  दुवे आसतात . ते आपल्या कुटुंबाचा पाया, आधार आणि आशीर्वाद देणारे स्तंभ असतात . ”
या नितांत सुंदर कार्यक्रमाची सुरुवात भक्तीमय गीत सादर करून संगीत शिक्षक निकेश यरमल यांनी केली. कार्यक्रमाच्या सूत्रसंचलन प्रणाली दाभाडे आणि नरेंद्रकुमार शर्मा यांनी अतिशय बोधप्रद आणि जीवन मूल्यावर आधारीत प्रश्न आजी –आजोबांना विचारून सुसंवाद सुरू केला . या सुसंवादामध्ये आजी – आजोबांनी त्यांच्या लहानपणाच्या जीवनातील मनोरंजक आणि बोधप्रद आठवणी सांगितल्या . आपल्या जीवनातील आठवणीच्या आधारे आपल्या नातवंडाना विविध जीवनातील निती –नियम आणि जगण्याच्या प्रणालीची शिकवण दिली .

आजी –आजोबांनी आपल्या बालपणीच्या शाळेतील गमतीदार आठवणी काढून आपल्या नातवंडाना मानवी मूल्याची शिकवण दिली . यावेळी बोलतांना आजी –आजोबा म्हणाले की , ‘आम्ही आमच्या नातवंडाना बरोबर विविध खेळ खेळत असतो आणि त्या खेळाच्या माध्यमातून आम्हाला अत्यंत आनंद मिळतो . आजीच्या घरगुती उपचार पद्धतीवर आजीबाईंना प्रश्न वाचरून त्यांच्या अनमोल ज्ञानाची शिकवण  नातवंडाना  या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला . यावेळी अनेक आजी –आजोबांनी आपल्या घरगुती उपचार पद्धतीची कोणत्या आजारावर कोणते घरगुती गुणकारी औषध द्यावे याची माहिती दिली . आजी आजोबाचे आजच्या नातवंडाच्या  जीवनातील महत्व सागतांना नातवंडे म्हणाली की , “ आमच्यावर संस्कार करायला, संध्याकाळी श्लोक शिकवायला, झोपताना गोष्टी सांगायला, माया करायला, घरात आजी आजोबा हवेच.”
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांकृतिक समन्वयक संतोष दिपके , चंदन चौधरी , मुकेश डहाळे , चंद्र्कांत नांगरे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक यांनी प्रयत्न केले .

1 comment:

  1. Very very nice program conducted by podar international School..it is a need of today's world to teach younger ones to respect grandparents.they are peelar of our family, society .

    ReplyDelete