Monday 14 September 2020

कोरोना विषाणूपासून संरक्षणासाठी विद्यार्थ्यानी स्वता:ची आणि आपल्या परिवाराच्या सुरक्षेची काळजी घ्यावी – प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज


कोरोना विषाणूपासून संरक्षणासाठी विद्यार्थ्यानी स्वता:ची आणि आपल्या परिवाराच्या  सुरक्षेची काळजी घ्यावी  – प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज
हिंदी दिवस ऑनलाईन पद्धतीने साजरा

विद्यार्थीयों की वेशभूषा 
 
विद्यार्थीयों का भाषण 


हिंगोली, दि: 14-9-2020

    येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये हिंदी दिवस ऑनलाइन साजरा करण्यात आला.

या ऑनलाईन कार्यक्रमात प्राचार्य संजीव भारद्वाज यांनी आपल्या मार्गदर्शनमय भाषणात म्हणाले की , हिंदी या भाषेने देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासात अनमोल असे योगदान दिले आहे . भारत देशात सर्वांना सोबत घेऊन जाणारी हिंदी भाषा आहे , असे सांगून हिंदी भाषेचे महत्व सांगितले. पुढे बोलतांना म्हणाले की , आपल्या देशातील कोरोना अजून पुर्णपणे गेलेला नाही . कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत . लॉकडाउन थोडेशे शिथिल झाले म्हणून विद्यार्थ्यानी निष्काळजीपणाने राहू नये . कोरोना विषाणूपासून संरक्षणासाठी विद्यार्थ्यानी स्वता:ची आणि आपल्या परिवाराची सुरक्षेची काळजी घ्यावी. शासनाने सांगितलेल्या नियमाचे पालन करावे .
 प्रमुख पाहुणे प्रा. सुरेन्द्र साहू यांनी आपल्या भाषणातून हिंदी भाषेचा गुणगौरव करतांना म्हणाले की , “ हिंदी भाषा ही भारत देशाला एकसूत्रात बांधण्याचे कार्य करते म्हणून हिंदी भाषेचा प्रसार आणि प्रचार सर्वांनी केला पाहिजे .
हिंदी शिक्षक संतोष सुरकांबळे यांनी आपल्या भाषणातून हिंदी भारताची राजभाषा असून तिचा आभिमान आम्ही बाळगला पाहिजे असा संदेश दिला.  या वेळी हिंदी दिवसा निमित्त शाळेतील विद्यार्थ्यानी संत कबीर , संत रहीम , संत मीराबाई आणि मुंशी प्रेमचंद यांची वेशभूषा परिधान करून त्यांचे विचार सांगीतले.
स्वरा कौलवर आणि वंशिका नैणवाणी  यानी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना सागीतले की “हिंदी हमारी शान है . हिंदी हमारी सन्मान है.  हिंदी भाषेच्या विकासासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे . ”
 या ऑनलाइन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर पुयड आणि अश्विनी जाधव यांनी केले .  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक देवेन्द्र खरटमळ , मुकेश डहाळे , सांस्कृतिक कार्यक्रम व्यवस्थापक संतोष दिपके यांनी प्रयत्न केले .

No comments:

Post a Comment