Thursday 15 October 2020

विद्यार्थ्यांनी अधिक अधिक पुस्तकांचे वाचन करून ज्ञान ग्रहण करावे. - प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज

वाचन प्रेरणा दिवस ऑनलाइन पद्धतीने साजरा
विद्यार्थ्यांनी अधिक अधिक पुस्तकांचे वाचन करून ज्ञान ग्रहण करावे.  -प्राचार्य मा. संजीवजी भरद्वाज
हिंगोली, दिनांक  : 15-10-2020
येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम याची जयंती “वाचन प्रेरणा दिन ” म्हणून ऑनलाइन पद्धतीने साजरी करण्यात आली.

डॉ. कलाम याचे वाचनावर अपार प्रेम होते ते आपल्या बालवयापासून विविध पुस्तकांचे वाचन करत असत . त्यांच्या  प्रमाणे शाळेतील मुलांना आपल्या बालवयापासून वाचनाची आवड लागावी म्हणून त्यांच्या जयंती निम्मीत विद्यार्थ्यासाठी डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांचे डिजिटल ग्रंथालय सुरू करण्यात आले .  त्या डिजिटल ग्रंथालयामध्ये डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे पुस्तक अग्निपंख , टर्निग पॉईंटस, माझी जीवनयात्रा , तेजस्वी मन , आणि हम होंगे कामयाब या सारखे ई- बुक्स ठेवण्यात आले आहेत .

  यावेळी शाळेचे प्राचार्य मा. संजीवजी भरद्वाज यांनी आपल्या मार्गदर्शनपर  भाषणातून सांगीतले की, “आजच्या विद्यार्थ्यांना जवळ असणारे ज्ञान ही त्यांची फार मोठी शक्ती आहे .या शक्तीच्या सहाय्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतोच परंतु त्याचा कार्यशक्ती देखील प्रभाव पडतो. पुस्तकाचे वाचन जेवढे कराल तेवढे ज्ञान वाढत जाईल. वाचन हे ज्ञान मिळवण्याचे साधन आहे.वाचनाने जीवन समृद्ध होते. कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला सतत त्या क्षेत्रातील नवेनवे ज्ञान,नवी नवी माहिती आणि अद्यावत कौशल्ये आत्मसात करावी लागतील. त्यासाठी पुस्तकांचे वाचन करावेच लागते.  त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिक अधिक पुस्तकांचे वाचन करून ज्ञान ग्रहण करावे.  
 तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेत्तर यांनी प्रयत्न केले .

No comments:

Post a Comment