Sunday 18 October 2020

कोरोना व्हायरस सध्यस्थिती ,प्रतिबंधात्मक उपाय आणि आपली जबाबदारी ”या विषयावर वेबनारचे आयोजन


कोरोना व्हायरस सध्यस्थिती ,प्रतिबंधात्मक उपाय आणि आपली जबाबदारी ”या विषयावर वेबनारचे आयोजन
'कोरोनामुळे निर्माण झालेल्या बदलत्या जीवनशैलीत 
स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्यावी ' कोरोना जनजागृती वरील वेबीनार मधून सूर... 

हिंगोली: दिनांक: 

 येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये “कोरोना व्हायरस सध्यस्थिती ,प्रतिबंधात्मक उपाय आणि आपली जबाबदारी ”या विषयावर वेबनारचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते त्यास पालकवर्गासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेबनार मध्ये डॉ.गोपाल कदम , डॉ. सुवर्णा मुप्कलवार , डॉ .दिपक डोनेकर , डॉ. आनंद भट्ट (सहाय्यक संचालक,शारीरिक शिक्षण आदर्श महाविद्यालय , हिंगोली), मा . पंडीत अवचार (राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक ) आणि प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सलेहा शैख यांनी केले. 

डॉ. गोपाल कदम हे कोरोना आजारावरील प्रतिबंधात्मक उपाय यावर बोलतांना म्हणाले की, ' कोरोना विषाणूने सर्व जगात चिंतेचे आणि अस्वस्थचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोना रुग्ण वाढत आहेत पण आता कोरोनामुक्त रिकव्हरी रेट देखील वाढत आहे. तरी सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे, नेहमी बाहेर जाताना  मास्क वापरावे. हात स्वछ धुवावेत. नियमित व्यायाम करावा. आनंदी राहावे. सर्वांशी आपलुकीच्या नात्याने राहावे. स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्यावी.
मुलांच्या बदलत्या जीवन शैली वर बोलतांना डॉ. दिपक डोणेकर म्हणाले की, 'कोरोना काळातील बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव मुलानंवर देखील पडला आहे. मुलेच्या जीवनशैलीतील खाण्या -पिण्याच्या, खेळण्या आणि झोपण्याच्या वेळा बदलेल्या जाणवतात.त्यामुळे मुले आता चीड -चीड करत आहेत.  मुले शाळेत जाताना आणि घरी येतांना मोठ्या आनंदात असत पण आता तीच मुले ऑनलाईन क्लासमध्ये लॅपटॉप किंवा स्मार्ट फोनवर शिक्षण घेतांना दिसतात.

डॉ. आनंद भट्ट म्हणाले की, कोरोना काळात मुलांनी नियमित व्यायाम करावा. व्यायामाने शरीर तंदुरूस्त राहते. मन ताजेतवाने राहते. झोप चांगली येते.व्यायामाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.  व्यायाम हा नियमितपणे केला पाहिजे.


कोरोनाकाळातील शिक्षण पद्धतीवर बोलतांना मा. पंडीत अवचार सर म्हणाले की, 'संपूर्ण जगातच मुलांच्या शिक्षण पद्धतीवर कोरोना व्हायरसमुळे मोठा बदल झालेला दिसतो. ऑनलाईन शिक्षण सुरु झाले आहे. त्यामध्ये मुलांच्या शैक्षणिक भविष्यासाठी मोबाईल आवश्यक बनला आहे.
तसेच प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज शिक्षण पद्धतीवर बोलतांना म्हणाले की, 'आजची शिक्षण व्यवस्था बदलली आहे. पोदार स्कूलने मार्चपासूनच ऑनलाईन क्लासेस सुरु केले आहेत. त्यास विद्यार्थी आणि  पालकांनी मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यांचे नेहमीच सहकार्य लाभत आहे. शाळेत होणारे विविध उपक्रम ऑनलाईन माध्यमातून मुलांसाठी घेण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थी नव -नवीन ज्ञान आणि उपक्रम शिकून घेण्यास उत्साही दिसतात.
डॉ. सुवर्णा मुप्कलवार यांनी कोरोना काळात सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास सांगितले.

 कला शिक्षक मुकेश डहाळे यांनी कोरोना व्हायरस पासून आपला बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शन करणार्‍या चित्रमय संदेशाचा बोर्ड बनवला होता. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे व्यवस्थापक व्यंकट हरीदास रेड्डी , मोहिनी दिक्षित, आनंद देऊळकर, शैख वहिद, प्रयाग मोटघरे आणि आकाश खोलगाडे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गांनी प्रयत्न केले

No comments:

Post a Comment