Tuesday 20 October 2020

'मी कोरोना योद्धा ' या विषयावर कार्यशाळा संपन्न

'मी कोरोना योद्धा  ' या विषयावर कार्यशाळा संपन्न

हिंगोली , दि : 17-10-2020

 येथील पोदार जुंबो किड्स मध्ये “मी कोरोना  योद्धा” या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रमुख म्हणून प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज हे उपस्थित होते .कार्यक्रमाची सुरुवात   स्वागत गीत सादर करून करण्यात आली. 

या कार्यक्रमात शाळेतील शिक्षिकांनी बालविद्यार्थ्यांना पपेट  शो , गोष्टी , कविता आणि विविध प्रश्न विचारून कोरोना व्हायरस बद्दल माहिती दिली . कोरोना व्हायरस पासून बचाव करण्याचे उपाय सांगीतले . तसेच रुमाल किंवा कपड्यापासून फेसमास्क बनविण्याचे प्रशिक्षण दिले . आणि छोट्या मुलांनी मोठ्या आनंदाने फेसमास्क बनवून स्वत:च्या तोंडाला बांधले .


या वेळी मुख्याध्यापिका संध्या तोमर मुलांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की “ सर्व बालकांनी आपल्या तोंडाला मास्क बांधले पाहिजेत . सॅनिटायझर किंवा डेटॉलने हात नियमित स्वच्छ धुवावेत . शक्यतो घराबाहेर जाऊ नये . असे कोरोना वरील प्रतिबंधात्मक उपाय सांगितले .

No comments:

Post a Comment