Friday 8 January 2021

पोदार इंटरनॅशनल स्कूलची शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी गरुडझेप

पोदार इंटरनॅशनल स्कूलची शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी गरुडझेप
- प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज


राष्ट्रीय - आंतराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम शाळा आणि उज्ज्वल यशाची परंपरा लाभलेल्या पोदार शिक्षण समुहाचे अध्यक्ष  डॉ.पवन पोदार यांनी” पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या ”रूपाने सन 2015 मध्ये पोदार एज्यूकेशन नेटवर्कची शाखा हिंगोली येथे सुरू केली.त्या रोपट्याने अवघ्या पाच वर्षात भरारी घेऊन हिंगोली जिल्ह्याच्या विश्वात नावलौकिक मिळवला आहे . ही शाळा विद्यार्थी आणि पालकांच्या आशा –आकांक्षाच्या पूर्तीसह हिंगोली जिल्ह्यातील शैक्षणिक चळवळीत महत्वपूर्ण योगदान देतांना दिसत आहे . 
सुशिक्षित आणि सुसंकृत नागरिक घडवण्या सोबतच देशाला अभिमान वाटावा असा  नागरिक घडवण्याचे कार्य या शाळेच्या माध्यमातून करण्यात येते . जबाबदार आणि कर्तव्यदक्ष नागरिक घडवण्यासाठी शाळेच्या वतीने प्रयत्न केले जातात . विद्यार्थ्यांना सुशिक्षित करण्यासोबतच त्यांच्यामध्ये सांस्कृतिक मूल्य रुजवण्याचे कार्य या शाळेच्या माध्यमातून करण्यात येते . विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण आणि परांपरिक मूल्यांवर आधारित शिक्षण देण्याच्या हेतूने आधुनिक तंत्रज्ञान ,मूल्याधारित अभ्यासक्रम , सर्वोत्तम शिक्षक , पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांची सर्व सुरक्षा प्रमाणितबस मधून ने –आण इ. महत्वपूर्ण गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येते.  

पोदार शिक्षण समुहाचा इतिहास : 
महात्मा गांधीच्या कार्यपासून प्रेरणा घेऊन देशामध्ये स्वता:ची शैक्षणिक संस्था असावी . आपल्या स्वत:च्या संस्थेच्या माध्यमातून शाळा  स्थापना करून देशातील जनतेला शिक्षण देण्याच्या हेतूने शेठ आनंदीलाल पोदार यांनी महात्मा गांधी यांच्या उपस्थितीत सन १९२७ मध्ये पोदार शैक्षणिक समूहाची स्थापना केली . पोदार शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष डॉ. पवन पोदार यांच्या सर्वोत्तम कार्यपद्धतीमुळे पोदार समूहाने आज यशस्वी भरारी घेतली आहे . 
हिंगोली शहरातील शैक्षणिक विकासाच्या उद्देशाने आणि विद्यार्थ्यांना पारंपरिक  मूल्या बरोबरच आधुनिक शिक्षण देण्याच्या दृष्टीने निसर्गरम्य वातावरणात पोदार इंटरनॅशनल स्कूलची  2015 मध्ये सुरुवात झाली. त्यावेळी फक्त 120 विद्यार्थ्यासोबत सुरू झालेल्या या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले असूनयाशाळेत हिंगोली शहरासह जवळा बाजार, औंढा (नाग ), कळमनुरी आणि  गोरेगाव येथून आजमितीस1260विध्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहेत.या शाळेला सीबीएसईची 1130784 या क्रमांकाची मान्यता मिळाली असून शाळेने हिंगोली शहरातील एक नामांकित आणि सुप्रशिध्द म्हणून नावलौकिक मिळवल आहे . शाळा दिवसेंदिवस यशाची नवीन शिखरे पदाक्रांत करीत आहे. 


शैक्षणिक उपक्रम आणि स्पर्धा :                                            
शाळेत विद्यार्थ्यांसाठी  विविध कौशल्यपूर्ण उपक्रम राबण्यात येतात.त्या उपक्रमात विद्यार्थी मंत्रीमंडळ, वृक्षारोपण, निर्सगसहल, स्वच्छता अभियान, योगाभ्यास, एक राष्ट्र एक वाचन प्रकल्प, संगीत, नृत्य, क्रीडा स्पर्धा, वक्तृत्वस्पर्धा, कथास्पर्धा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय  स्तरावरील ऑलंपियाडच्या स्पर्धा, आर्ट आणि  क्राफ्टच्या स्पर्धा या सह सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, हॉबी आणि स्पोर्ट्स मधील विविध मैदानी स्पर्धचे आयोजन, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी विविध पुरस्कार असे विविध उपक्रम घेण्यात येतात. 

कोरोना काळातील ऑनलाइन शिक्षण 
शिक्षण ही आजची आणि उद्याची  एकमेव अद्वितीय अशी गुंतवणूक आहे.  जीवन व्यवस्थितपणे जगण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी शिक्षण घेतले पाहिजे. याची जाणीव सर्वांनाच झाली आहे. पण कोरोना विषाणूच्या महामारीमुळे जगातील सर्व शैक्षणिक संस्था  बंद असतांना देखील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या शाळेने हिंगोली शहरात प्रथमच व्हर्चुयल क्लासद्वारेज्ञानदानाचे कार्य अविरतपणे व पूर्ण क्षमतेने सुरू ठेवले. शाळेच्या अविरत व सूक्ष्म नियोजनामुळेविद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा देखीलउत्तुंग प्रतिसाद लाभला आहे . 


कोरोनाच्या जनजागृतीसाठी वेबिनर 
 पोदार शाळेत प्रथमच ‘कोरोना व्हायरस सध्यस्थिती ,प्रतिबंधात्मक उपाय आणि आपली जबाबदारी ”या विषयावर ऑनलाइन वेबनारचे आयोजन करण्यात आले होते. मध्ये डॉ.गोपाल कदम , डॉ. सुवर्णा मुप्कलवार , डॉ .दिपक डोनेकर , डॉ. आनंद भट्ट ,मा . पंडीत अवचार आणि प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी . घराबाहेर जाणे टाळावे. नेहमी मास्क वापरावे . नियमित व्यायाम करावा. हात स्वच्छ धुवावेत. या बरोबरच आपल्या परिवाराची काळजी कशी घ्यावी या बाबतही मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये पालकवर्गासह विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाइन उपस्थित होते.

कोरोना काळातील उपक्रम : 
कोरोनाच्या काळातील मन अस्वस्थ करणाऱ्या संघर्षमयपरिस्थितीत पोदार इंटरनॅशनल स्कूलने विद्यार्थ्यांना जीवन जगण्याची नवी प्रेरणा, नवी उमेद आणि नवे विचार मिळावेत.  तसेच संघर्षमय वातावरणातही रडत न बसता स्वतःच्या आत्मविश्वासाने संकटावर मात करण्यासाठीचित्रकला, संगीत, नृत्य, पुस्तक वाचन आणि क्रिडा यासारखे विविध सृजनशील उपक्रम सुरु केले होते. 
चित्रकला स्पर्धेमधील विद्यार्थ्यांनी कोरोनावर जन जागृती सह मानवी जीवनातील विविध भाव , संकटे, साध्य परिस्थिती व कोरोना योद्धयांचीचित्रे रेखाटलीहोती.विद्यार्थी शारीरिक व मानसिक दृष्ट्या तंदुरुस्तरहावेतत्यांचीरोगप्रतिकारक शक्ती वाढावी आणी त्यांना व्यायामाचे महत्व कळावे यासाठीफिटनेस मंत्र आणि फिट इंडिया अंतर्गत विविध शारीरिक व्यायामाच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  
पालकांसाठी शाळेने घेतलेले विविधउपक्रम : 
पोदार शाळा पालकांना आपल्या घरातील सदस्य मानते.विद्यार्थ्यांसह पालकांच्या देखील कला गुणांना वाव देण्यासाठीआजी – आजोबांच्या कथा स्पर्धा , आजीच्या बाटव्यातील घरगुती उपाय,पोदार पेरेंट्स क्रिकेट स्पर्धा,व्हॉलीबॉल स्पर्धा,मास्टर शेफ रेसिपीइत्यादी उपक्रम आयोजीत करण्यात आले. या स्पर्धेस पालकांचा उत्तुंग प्रतिसाद तर मिळालाच व प्रत्येकास आपल्या जीवनात तणावामध्ये आनंद शोधण्याच्यामोठा क्षण अनुभवता आला. 

विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या लेखन कलेला चालना मिळवून देण्यासाठी पोदर इंटरनॅशनल स्कूल ने “Ocean of knowledge” या ऑनलाइन मॅगजीन अंकाची सुरवात करून एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. 
या सोबतच शाळेने जंगल बुक ते साऊंड ऑफ म्युझिक या थिमच्या माध्यमातून सामाजिक आणि भारतीय मुल्य संवर्धनाचासंदेश देणारे वार्षिक महोत्सव मोठ्या यशस्वीपणे सर्वांच्या सहभागाने साजरे केले.

सीबीएसई ची मान्यता : 
 गुणवत्तापूर्ण , तंत्रज्ञांनयुक्त  आणि कला – कौशल्यवर आधारित शिक्षण देण्यास सुरुवात करणार्याय पोदार इंटरनॅशनल शाळेला सन 2018- 2019 मध्ये1130784 या क्रमांकाचीसीबीएसई ची मान्यता मिळाला असून शाळेने हिंगोली शहरात प्रथम सीबीएसई शाळा म्हणून शाळेला नावलौकिक मिळवला आहे. 

उज्ज्वल यश : 
सीबीएसई बोर्डच्या वतीने घेण्यात आलेल्या 2019 - 2020 या शैक्षणिकवर्षात दहावी बोर्डच्या परिक्षेतशाळेच्या पहिल्या बँचचा निकाल शंभर टक्के लागला असून यामध्ये विद्यार्थी वेदान्त गोरेहिंगोली जिल्ह्यात प्रथमआणि विद्यार्थिनी भूमी बगडीया हिने द्वितीय पटकावला आहे. 





भव्यदिव्य नव्या इमारताची स्थापना: 
हिंगोली सारख्या विकसनशील जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना बर्यारचशा शैक्षणिक सुविधा पासून वंचित राहावे लागते ही गरज लक्षात घेऊन पोदार शिक्षण समूहाने अत्यंत निसर्गरम्य वातावराणातसर्व सुविधायुक्त तंत्रज्ञानाने परिपूर्ण असी पाचमजलीभव्य इमारतउभी केली आहे . यामध्ये50 वर्ग खोल्या , प्रयोगशाळा , ग्रंथालय , अॅक्टिविटी दालन, रोबोटिक्स प्रयोगशाळा , क्रिडांगण,संगीत नृत्य, नाटक, योग आणि स्केटिंग या करिता स्वतंत्र दालन,अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोयीयुक्त लिफ्ट,अत्याधुनिक अग्निशामक व्यवस्था ,प्रत्येक क्लासमध्ये डिजिटल प्रोजेक्टर आणि विज़ुअलाइज़र. कंप्यूटर लैबआणि विशेष समुपदेशन वर्गाची निर्मिती करून विद्यार्थ्यांचा संपूर्ण विकास करण्याचा मानस केला आहे . ज्यामधूनविद्यार्थ्यांना डॉक्टर , वकील , इंजीनियर, वैज्ञानिक आणि मोठ मोठ्या कंपन्यातील उच्च पदस्थ अधिकारी होण्यासाठी पायाभूत मार्गदर्शन मिळणार आहे. 

शाळेची ध्येय आणि धोरण :
प्रामाणिकपणा, सचोटी आणि सेवाभावाचा त्याग हे मूल्य पोदार शाळेचे आधारस्तंभ आहेत . विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि सर्वोत्तम शिक्षण मिळावे हे शाळेचे  ध्येय आहे . शाळेतील शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक , सामाजिक आणि भावनिक वाढीसोबतच त्यांच्या सुप्तकला गुणांच्या वाढी प्रयत्न करत असतात . 

मूल्याधारीत गुणवत्तापूर्णसर्वोत्तम शिक्षक :
21 व्या शतकातील  आव्हानाचा सामना करण्यासाठी भारतातील विद्यार्थ्यांना कला – कौशल्याआधारीत  शिक्षण देण्याच्या उद्देशानेगुणवत्तापूर्ण आणि मूल्याआधारीत शिक्षण देणे, विद्यार्थ्यांच्या आधुनिक युगातील शैक्षणिक गरजाची पूर्ती करणे , विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल करणे , त्यांचे जीवन संस्कारशील बनवणे . विद्यार्थ्यांना सर्वोत्तम नागरिक घडविणे या सर्वांची जिम्मेदारी शिक्षकावर आहे. म्हणून शिक्षक आनंदी व सर्व गुणसंपन्न असणे गरजेचे आहे . म्हणून शिक्षकांसाठी'हैप्पी मुव्हमेन्ट ' या उपक्रमाद्वारे शिक्षकांसाठी विविध खेळ - छोटे नावीन्य पुर्ण प्रकल्प ,  घरगुती कार्यक्रम , वाढदिवसाचे साजरीकरण इत्यादी मधून आनंददायी जीवन जगण्याचा संदेश देण्यात येतो.शिक्षकांना सर्वगुण संपन्न बनवण्यासाठीटि.एल. ए. या उपक्रमाच्या माध्यमातून पोदार एज्युकेशन नेटवर्कच्या माध्यमातून वर्षभरात विविध प्रकाची शैक्षणिक प्रक्षिशणे  देण्यात येतात . तसेच सीबीएसई ,दिक्षा पोर्टल, इतर विविध शैक्षणिक संस्थाच्या प्रक्षिशणामध्ये भाग घेऊन शिक्षकांनी आपआपल्या विषयाचे अत्याधुनिक प्रगतशील शैलीने शिकवण्याचे तंत्रज्ञान वेळोवेळी अवगत केले आहे . ज्यामुळे विद्यार्थ्यांना उच्चदर्जाचे शिक्षण मिळत आहे . 


विद्यार्थी सुरक्षितेला प्राधान्य : 
शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात येते. यामध्येशाळेच्या सर्व बसमध्ये मुलांना शाळेत ने –आण करण्यासाठी महिला कर्मचार्यांचीनियुक्ती ,सीसीटीवी कैमरा, प्रथमोपचार पेटी, अग्निशामक यंत्रणा आणिबसची गती सीमाफक्त 30 किमी प्रति तास मर्यादितठेवण्यात आली आहे.
हिंगोलीच्या शैक्षणिक क्षेत्रात पोदार इंटरनॅशनल स्कूलने यशस्वी गरुड झेप घेण्यात विद्यार्थी,पालक आणि शिक्षकांचे महत्वपूर्ण योगदान लाभले आहे. शाळेत होणाऱ्या विविध सांस्कृतीक उपक्रमाला वर्तमान पत्रातून प्रसिद्धी देऊन शाळेचे नाव उज्ज्वल करण्यात हिंगोलीतील पत्रकार बंधूचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. असेच सर्वांचे अनमोल सहकार्याने लाभून शाळेची यशस्वी वाटचाल व्हावी.या माध्यमातून मी शाळेचा प्रमुख म्हणून सर्व पालक ,पत्रकारबंधु , आमचे सर्व हितचिंतक, सहकारी,प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे जोडल्या गेलेल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो.  
-प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज

No comments:

Post a Comment