Saturday 20 March 2021

Annual Day class 1st & 2nd

सर्वांनीच  जीवनात नेहमी उत्स्फूर्त , टवटवीत,  हसत आणि  आनंदी राहावे 






                   - प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज

हिंगोली , दि: 20-3-2021 

येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये ‘बिल्स बास्केट’ या ऑनलाइन वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते . “ इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस ” चे औचित्य साधत मुलांनी जीवनात आनंदी राहावे यासाठी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते . 

   प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की , ‘सर्वांनीच  जीवनात नेहमी उत्स्फूर्त , टवटवीत,  हसत आणि  आनंदी राहावे . आजपासून आपण आनंदी राहण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे . आपल्या चेहर्‍यावर नेहमी आनंदी भाव ठेवावेत . समाधानी राहावे . समाधान नेहमी आपल्याला सकरात्मक विचार करायला शिकवते . आपल्यामध्ये असलेल्या क्षमता ओळखाव्यात. स्वत:वर विश्वास ठेवावा . आपले कार्य कार्यक्षमतेने, मेहनतीने आणि आनंदाने करावे .

बिल्स बास्केट’ या ऑनलाइन वार्षिक महोत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले . त्यामध्ये वर्ग पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता . मोठ्या आनंदाने विद्यार्थी आपले नृत्य सादर करत होते . प्रत्येक विद्यार्थी आपले कलाकौशल्य मोठ्या उत्साहात सादर  करत होते . मोठ्या आनंदाने आपले नृत्य कौशल्य दाखवत होते . त्यामधून त्यांना एक नवी ऊर्जा , नवी शक्ती आणि नवा आनंद मिळत होता . हे सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना एक आनंदाची नवी पर्वणी होती. 
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानदा रोकडे आणि फौजिया शैख यांनी केले . तर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन संतोष दिपके,  शीतल देशपांडे , प्रिती जोगी , अश्विनी जाधव यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले .

No comments:

Post a Comment