Monday 8 March 2021

Women's Day

*कोरोना काळातही महिलांनी  आपले मातृत्व ,नेतृत्व, आणि कर्तृत्व सिद्ध केले -*  प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज




 *शिक्षिका आणि महिला पोलीसांचा  कर्तबगार  महिला महणून सत्कार* 
Digital News link





हिंगोली, दिनांक : 8-3-2021 

   येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये इंटरनॅशनल महिला दिवस साजरा करण्यात आला . त्यामध्ये पोदार शाळेतील शिक्षिका आणि एसपी कार्यालयातील पोलीस महिलांचा कोरोना काळातही सर्वोत्कृष्ट कार्य केल्यामुळे सन्मानीत करण्यात आले . 

  प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की , “ भारतीय संस्कृतीमध्ये मातृशक्तीला आदराचे स्थान आहे. आदर्श मातृशक्ती ही आपल्या देशाचा पाया आहे. भारतीय समाजाला घडवणारी माता ही पहिली शिक्षिका आहे. आज सर्वच क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने महिला स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करतांना दिसत  आहेत. देशाच्या शिक्षण , राजकीय , आर्थिक , संरक्षण आणि अंतराळ यासारख्या सर्वच क्षेत्रात महिलांनी खंबीर नेतृत्व सिद्ध करत आहेत .  मुलींना शिक्षण द्यावे ,  मुलींनी उच्चशिक्षित व्हावे. उच्चशिक्षणातून दृष्टीकोन व्यापक होऊन त्यांचे जीवनमान उंचावते असते . देशाच्या विकास प्रक्रियेत महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे . ”
आजच्या महिला दिनाच्या कार्यक्रमाची  #चूज टु चॅलेंज ही थीम होती. त्यामध्ये कोरोना सारख्या कठीण काळातही कठोर मेहनत घेऊन सर्वोत्कृष्टपणे शिक्षण देण्याचे महान कार्य केल्यामुळे शाळेतील सर्व महिला शिक्षिकांचा प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला . शाळेतील सफाई कर्मचारी महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला. 
 तसेच अत्यंत कठीण अश्या कोरोना काळात आपल्या कर्तव्याचे पालन करून अहोरात्र लोकांच्या कल्याणसाठी प्रयत्न करणाऱ्या  एसपी ऑफिस मधील कर्तृत्वान महिला पोलिस कर्मचार्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला . 

या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक निकेश यरमळ, प्रतीक बोरळकर आणि प्रयाग मोठघरे यांनी देशातील कर्तृत्वान महिलांवर संदेशमय गीत सादर केले . 
   तर शिक्षक किरण जोगी यांनी “आई माझी मायेचा सागर , दिला तिने जिवना आकार ”हे गीत सादर करून आईची महिमा सांगितली. 

 कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नितिन इंगोले यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले .

No comments:

Post a Comment