Saturday 27 March 2021

विद्यार्थ्यांचा ऑनलाईन ओपन हाऊस संपन्न

विद्यार्थ्यांचा ऑनलाईन  *ओपन हाऊस*  संपन्न 

 *सीबीएसईच्या नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात एक एप्रिल  2021 पासून** 
हिंगोली, दि : 27-3-2021
येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांचा ऑनलाईन  वार्षिक परीक्षेचा *ओपन हाऊस*  संपन्न झाला. वार्षिक परीक्षेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण मार्क्स प्राप्त केले. 

कोरोनामुळे मार्च 2020 पासूनच लॉकडाऊन सुरु झाले होते आणि तेंव्हापासूनच पोदार शाळेने ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. 
पोदार शाळेतील शिक्षकांनी मोठ्या मेहनतीने आणि जिद्दीने मुलांना नियमितपणे
ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले. ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना रुची निर्माण व्हावी यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम घेण्यात आले.  गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थीना  वार्षिक परीक्षेत सर्वोत्तम मार्क्स मिळवले. 
स्वतः ची शैक्षणिक प्रगती पाहण्यासाठी विद्यार्थी  मोठ्या आनंदाने ऑनलाईन उपस्थित होते. 

संजीवकुमार भारद्वाज ( प्राचार्य )

  ‘21 व्या शतकातील आव्हानाचा सामना करण्यासाठी भारतातील विद्यार्थ्यांना कला – कौशल्याआधारीत शिक्षण देण्याच्या उद्देशाने गुणवत्तापूर्ण आणि मूल्याआधारीत शिक्षण देणे, विद्यार्थ्यांच्या आधुनिक युगातील शैक्षणिक गरजाची पूर्ती करणे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल करणे, त्यांचे जीवन संस्कारशील बनवणे. विद्यार्थ्यांना सर्वोत्तम नागरिक घडविणे ह्या  ध्येय आणि धोरणाची परिपूर्ती  करण्यासाठी शाळा सतत प्रयत्न करत आहे.  

कोरोना विषाणूच्या महामारीमुळे जगातील सर्व शैक्षणिक संस्था  बंद असतांना देखील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पोदार शाळेने हिंगोली शहरात प्रथमच व्हर्चुयल क्लासद्वारे ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे व पूर्ण क्षमतेने सुरू ठेवले. शाळेच्या अविरत व सूक्ष्म नियोजनामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा देखील उत्तुंग प्रतिसाद मिळाला आहे .
पोदार शाळेने कोरोना काळापासूनच ऑनलाईन क्लास सुरु करून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य अविरत सुरु ठेवले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळाली. ऑनलाईन क्लासमध्ये शिक्षक सर्वोत्तम पद्धतीने शिकवत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवलेले उत्तमरीत्या समजते.
शाळा प्रशासन, पालक व शिक्षकांच्या अविरत प्रयत्नचे फळ म्हणजे   हिंगोली शहरातील शाळेची भव्यदिव्य अशी वास्तु.. या शाळेतून नक्कीच सर्व गुंणसंपन्न विद्यार्थी घडतील.

ऑनलाइन क्लास सुरू करून लहान मुलांमध्ये  शिक्षणाची गोडी  निर्माण केली . पोदार शाळेने लहान मुलांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून मोठ्या आनंदाने शाळेसोबत जोडले.  शाळेत घेण्यात आलेल्या विविध ऑनलाइन कार्यक्रम व  उपक्रमास विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी देखील नेहमीच मोठा  प्रतिसाद दिला.त्याबद्दल शाळेने   विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचे मनापासून  आभार मानले. 
 
 
    दिपाली प्रशांतकुमार जोशी (पालक)
कोरोनामुळे सर्व शाळा बंद होत्या  मुलांच्या शैक्षणिक भविष्याचे कसे होणार या चितेंत असतानाच पोदार शाळेने ऑनलाईन क्लास सुरु करून विद्यार्थ्यांना शिकवायला सुरु केले त्यामुळे मुलांनासह  आम्हाला आनंद झाला.पोदार शाळेतील शिक्षक अतिशय उत्तम पद्धतीने शिकवतात त्यामुळे मुलांना सर्व संकल्पना  समजतात . शिक्षणा  बरोबरच शाळेने विविध उपक्रम  सुरु केल्यामुळे मुलांनी  अधिक आवडीने क्लास केले.  शाळेने मुलांनासोबतच पालकांसाठी विविध उपक्रम सुरु केल्यामुळे पालकही लॉकडाऊनच्या काळात शाळेच्या उपक्रमात मोठया आनंदाने सहभागी झाले .
शाळेचे प्राचार्य सजीव कुमार भारद्वाज यांच्यासह शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा यशस्वी   प्रयत्न केला. आणि आज मुलांच्या वार्षिक परीक्षेचा गुणवत्तापूर्ण  निकाल पाहून मुलांनासह आम्हालाही मोठा आनंद झाला.

No comments:

Post a Comment