Sunday 28 March 2021

धुलीवंदन निमित्त रंग न लावता स्नेहाचे प्रतीक फुले एकमेकांना सप्रेम भेट म्हणून द्यावेत


धुलीवंदन निमित्त  रंग न लावता स्नेहाचे प्रतीक फुले एकमेकांना सप्रेम भेट म्हणून द्यावे.... - प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज 

हिंगोली,  

येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये पर्यावरणपूरक होळी साजरी करतांना विविध उपक्रम घेण्यात आले.

प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज म्हणाले की, ' अजूनही कोरोना गेलेला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक होळी साजरी करतांना एकमेकांना स्नेहाचे प्रतीक म्हणून फुले भेट द्यावीत आणि एकमेकांचा आदर करावा. एकमेकांना विचारमय  शुभेच्छा द्याव्यात. तसेच यावेळीस आपल्यातील सर्वोत्तम गुण विकसित करण्याची प्रतिज्ञा करावी. आपल्या मनातील नकारात्मक विचार सोडून द्यावे. '


यावेळी विद्यार्थ्यांनी   होळीवर  अतिशय सुंदर आणि मार्गदर्शनपर  चित्रे  काढले. तसेच आपल्या मैत्र - मैत्रिणींना आणि नातेवाईकांना पत्र लिहून होळीच्या शुभेच्छा देतांना होळी कशी साजरी करावी याबद्दल माहिती दिली.

होळी निमित्त शाळेत विविध उपक्रम ऑनलाईन माध्यमातून घेण्यात आले . त्यामध्ये 
पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रीटिंग कार्ड, तिसरी आणि चौथी साठी होलिका नृत्य, सहावीसाठी पर्यावरणपूरक होळी कशी साजरी करावी यावर पत्रलेखन असे  विविध उपक्रम राबवून ऑनलाईन  होळीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुकेश डहाळे आणि संतोष दिपके  यांच्यासह शाळेतील शिक्षकांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment