Friday 23 April 2021

विद्यार्थ्यांसाठी पुस्तके म्हणजे जीवनातील खरे मित्र होत

विद्यार्थ्यांसाठी पुस्तके म्हणजे जीवनातील खरे मित्र होत 
     



-  प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज

हिंगोली, दि :


 'विद्यार्थ्यांसाठी पुस्तके म्हणजे जीवनातील खरे मित्र होत. पुस्तके आपले मित्र, मार्गदर्शक आणि खरे गुरु असतात. ' असे प्रतिपादन प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज यांनी जागतिक ग्रंथ दिवस साजरा करतांना केले. 

  येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये ऑनलाईन पद्धतीने जागतिक ग्रंथ दिवस साजरा करण्यात आला. त्यामध्ये बोलतांना प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज म्हणाले की, ' विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अधिक अधिक पुस्तकांचे वाचन करावे. पुस्तके वाचनाने आपल्याला नवे मार्ग दिसतात. नवे विचार मिळतात आणि नव्या कल्पना मिळतात. विद्यार्थ्यांसाठी पुस्तके म्हणजे जीवनातील खरे मित्र होत. पुस्तके आपले मित्र, मार्गदर्शक आणि खरे गुरु असतात.'
  शाळेतील ऑनलाईन क्लासमध्ये  'एक दिवस एक कवी ' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कवी कुसुमाग्रज, मंगेश पाडगांवकर, नारायण सुर्वे आणि रवींद्रनाथ टागोर यासारख्या महान कवीच्या कवितांचे वाचन करण्यात आले. त्याला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आणि त्यापासून प्रेरणा घेऊन शाळेतील विद्यार्थी देखील कविता लेखन करू लागले आहेत. 
तसेच ऑनलाईन क्लासमधील ' आपले मित्र-  आपले पुस्तक ' या उपक्रमामध्ये विद्यार्थी आपल्या जवळ असलेल्या पुस्तकांचे वाचन करून त्यामधील माहिती सांगत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनाची गोडी लागत आहे. 
शाळेतील ग्रंथपाल चंद्रकांत नांगरे यांनी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन डिजिटल लायब्ररी तयार केली असून त्यामध्ये विविध विषयावरील पुस्तके ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहेत. त्याचा विद्यार्थी मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. 

 प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज यांनी पुस्तक वाचन उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना नियमितपणे पुस्तक वाचन करावे असे सांगितले. तसेच शाळेतील सर्व शिक्षक आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना पुस्तक वाचण्यासाठी प्रोत्साहित करत असतात.

No comments:

Post a Comment