Sunday 25 April 2021

पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन करणे ही आजच्या काळाची गरज आहे

🌹🌹🪴🌳🌳🌳🌴🌴🌴🪴🌹🌹पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन करणे ही आजच्या काळाची गरज आहे.  - प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज


  🌎  *(जागतिक पृथ्वी दिवस साजरा)* 🌎


हिंगोली, दिनांक :  

 येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलने ‘निसर्गासाठी वेळ’ उपक्रम सुरू करण्यात आला  आहे. या उपक्रमात विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आहेत. निसर्ग संरक्षण आणि संवर्धनासह पशू – पक्षास चारा पाणी देत आहेत .
🌱🌱🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌱🌱


आजच्या कोरोनामय विषाणूमुळे जगातील सर्व व्यवहार बंद होत आहेत. तसेच वर्षभरापासून शाळाही बंद आहेत. पण पोदार शाळेतील ऑनलाईन क्लासमध्ये विविध उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना नवीन सृजनात्मक कार्य करण्यास प्रेरणा देतात. त्यातीलच *निसर्गासाठी वेळ* हा एक उपक्रम आहे.  पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन यासह प्राणीमात्रावर प्रेम करावे , वृक्ष लागवड , वृक्ष जतन , अश्या संस्कारक्षम मूल्यांच्या रुजवण विद्यार्थ्यांमध्ये व्हावी ह्या  हेतूने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
🍉🍉🌻🌻💐💐🌿🌿🍀🍀🍉🍉
निसर्गासाठी वेळ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या घरी रोपवाटिका तयार करत आहेत. वृक्ष लागवड करत आहेत . वृक्षाला पाणी देत आहेत . वृक्ष संवर्धन आणि जतन करत आहेत . पशु पक्षाला चारा –पाणी देत आहेत .असे विविध उपक्रम विद्यार्थी करत आहेत .
🌹🌹🎄☘️🍀🌿🌲🌱🌴🪴🌳🌹🌹
*शाळेतील पर्यावरणपूरक उपक्रम* :

शाळा पर्यावरणपूरक विविध उपक्रम राबवित आहे . त्यामध्ये विद्यार्थी आपल्या वाढदिवसा निमित शाळेला वृक्ष भेट देतात . त्या वृक्षरोपची रोपवाटिका तयार करण्यात आली आहे. रोपवाटीकेतील वृक्षाची लागवड विद्यार्थी स्व:ता करतात .त्या वृक्षाच्या संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी घेतात . तसेच पर्यावरणपूरक गणपती उत्सव , होळी , रंगोत्सव , पर्यवरणावर चित्रकला स्पर्धा , प्रश्न मंजूषा , कार्यशाळा अश्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे प्रयत्न केले जातात.
🌹🌹🌹🌹🌲🌲🌲🌲🌹🌹🌹🌹
 *प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज* बोलतांना म्हणाले की, “ पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. निसर्गाकडून विद्यार्थ्यानी असंख्य गोष्टी शिकून घ्याव्यात. निसर्ग आपल्याच आनंदात जगत असतो. तसेच निसर्ग सर्वांना निरामय आणि आनंदी जीवन प्रेरणा आणि ऊर्जा देत असतो. प्रत्येक विद्यार्थ्यानी झाडे लावावीत त्या झाडाचे जतन करावे , पशू –पक्षाला चारापाणी द्यावे . प्राणीमात्रावर प्रेम करावे . नैसर्गिक विविधतेचे रक्षण करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे प्रयत्न करावेत. ”

 **मेरी प्यारी वसुंधरा 🌏🌏
नाराज ना करेंगे तुम्हे 🌎🌎
पेड पौधे लगाकर 🌲🌲
संभालेंगे हम तुम्हे**या आशयावरील वृक्षरोपन करण्याचा संदेश देणारी कविता 
शाळेतील विद्यार्थी आशुतोष तिडके यांनी लिहली आहे.
 उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षिका प्रयत्न करत आहेत.

🌹🌹🌹🌿🌿🌎🌎🌿🌿🌹🌹🌹

No comments:

Post a Comment