Wednesday 5 May 2021

पोदार शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीच्या दिवसात योगासनाचे धडे


*पोदार शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीच्या दिवसात योगासनाचे धडे....* 

हिंगोली, दि. 5-5-2021

योगासने  केल्याने मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले जाते आणि त्यामुळे आपल्या  जीवनातील दिवसाचा  प्रवास उत्साही,  शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होण्यास मदत होते. असे प्रतिपादन शाळेचे प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज यांनी योगासनाच्या ऑनलाईन क्लासबद्दल बोलतांना केले. 
 
   येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये वर्षभरापासूनच ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरु आहेत पण आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. आता  सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे मुले कुठेही जाऊ शकत नाहीत आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे मुले घरीच बसून असतात. मुलांना नवी ऊर्जा, नवीन ताजे तवानेपण आणि जीवनात सुंदरमय पहाट देण्याच्या हेतूने पोदार शाळेत उन्हाळ्याच्या सुट्टीच्या दिवसातही  विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन योगासनच्या क्लासचे आयोजन करण्यात आले आहे.

योगासन प्रशिक्षक शेख वहिद यांनी योगासन करण्याच्या नियमित सरावामुळे होणारे फायदे सांगितले आहेत. ते असे 
सर्व स्तरांवर तंदुरुस्ती
वजन कमी होण्यास मदत होते. 
ताण तणावा पासून मुक्ती मिळण्यास मदत होते. 
अंर्तयामी शांतता प्राप्त होते. 
रोगप्रतिकारक शक्तीत वाढण्यास मदत होते. 
उर्जा शक्ती वाढण्यास मदत  होते. 
शरीराचा लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधार होतो. 

 योगासनामुळे फक्त शरीरासह  मनाचाही विकास होतो.सकारात्मक विचार मनामध्ये निर्माण होऊन मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. 
नियमितपणे  किमान अर्धा तास योगासनासाठी दिल्यास आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो आणि  मानसिक व शरीरिक स्वास्थ्य लाभू शकते. म्हणून विद्यार्थ्यांनी नियमित योगासने करावीत. 

पोदार शाळेत घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन योगासनच्या क्लासमध्ये विद्यार्थी मोठ्या उत्साहाने योगासन करतांना दिसत आहेत.

शाळेतील शिक्षक प्रयाग मोटघरे आणि संतोष दिपके योगासनाच्या ऑनलाईन क्लासचे आयोजन  यशस्वीपणे  करत आहेत.

No comments:

Post a Comment