Monday 3 May 2021

सृजनात्मक ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आनंददायी शिक्षण*

*~सृजनात्मक ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आनंददायी शिक्षण*~   प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज 


हिंगोली, दि. 30-4-2021

'पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये सृजनात्मक ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आनंददायी शिक्षण देण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात येत आहे. ' असे प्रतिपादन शाळेचे प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज यांनी केले.

ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून  सर्वोत्तम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा पुरेपूर प्रयत्न प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज यांच्या मार्गदर्शनातून प्रत्येक शिक्षक करत आहे.

कोरोना लोकडाऊन काळात शाळा बंद असूनही व्हर्चूअल क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे.  निराश आणि संघर्षमय परिस्थिती मध्ये विद्यार्थ्यांना विविध उपक्रमच्या माध्यमातून  शिक्षण देऊन जीवनात नवी दिशा, नवी प्रेरणा आणि नवी दृष्टी  देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

फॅन्सी ड्रेस स्पर्धा :
पोदार शाळेत विद्यार्थ्यांना जगातील नवीन ड्रेस पद्धतीबद्दल माहिती व्हावी आणि लहान मुलांनाही विविध प्रकारचे नवीन ड्रेस घालायला आवडत. नवीन ड्रेस घातल्यामुळे मुळे अगदी आनंदी आणि उत्साही होतात. म्हणुन त्यांच्यासाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेतील पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये लहान मुलांनी आकर्षक आणि मनमोहक फॅन्सी ड्रेस परिधान केले होते. 


 *बालकविता आणि कथा वाचन* 

पुस्तके विद्यार्थ्यांचे मित्र असतात. 
पुस्तके वाचन केल्याने व्यक्तिमत्व विकास होते.विचार करण्याची शक्ती मिळते, नवनवीन माहिती/ज्ञान मिळते, समाजातील चालूघडामोडी समजते, संभाषण कौशल्य वाढते, अभ्यास करायला मदत होते. 
शाळेतील दुसरी आणि तिसरीच्या मुलांसाठी बालकविता आणि कथा वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत लहान मुलांनी इसापनीती, बोधकथा,  देशभक्ती, आईवरील कथा, उपदेशकथा अश्या विविध प्रकारच्या संदेशमय कथा आणि कविताचे वाचन केले.

*हेल्दी फूड हेल्दी डायट * 

हेल्दी फूड हेल्दी डायट या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वतः हेल्दी फूड थाळी तयार केली होती. त्यामध्ये फ्रुट्स आणि हेल्दी अन्न पदार्थाची आकर्षक सजावट करण्यात आली होती. 

कोरोना काळात हेल्दी फूड आणि हेल्दी डायट घेणे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. हेल्दी फूडमुळे इम्युनिटी पॉवर वाढण्यास मदत होते. 
स्वस्थ अन्न खाल्यामुळे शरीर निरोगी राहते आणि मनही ताजे तवाने राहते. शरीर मजबूत राहते म्हणून हेल्दी फूड खावे असा संदेश या स्पर्धेद्वारे  विद्यार्थ्यांना  देण्यात आला.


*रोल प्ले  : द ग्रेट इंडियन हिरो* 

रोल प्ले  : द ग्रेट इंडियन हिरो या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भारतातील महान महापुरुषांच्या वेशभूषा धारण करून त्यांच्या जीवन कार्यापासून आपल्या जीवनात प्रेरणा घेण्याचा संदेश दिला. 
शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्यांनी 
छत्रपती शिवाजी महाराज,  महात्मा फुले,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मदर टेरेसा या सारख्या महान महापुरुषांच्या वेशभूषा धारण केल्या होत्या.

*कोरोना काळात घ्यावयाची काळजी*

भारत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोरोना पासून संरक्षण करणे आवश्यक झाले आहे. खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल किंवा हात धरायलाच हवा. 
जेणेकरून जंतूसंसर्ग टाळता येतो. खाण्या-पिण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे. साबण आणि पाण्याने २० सेकंद हात धुवायला हवेत.भरपूर पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे. एकतर उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे पाणी भरपूर प्यावे.सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक जाणं टाळा. प्रवास करायचाच असेल तर पुरेशी काळजी घ्या. शक्यतो घरातच राहण्यास प्राधान्य द्या. इतरांशी शारीरिक संपर्क येऊ नये .घराबाहेर पडताना नाक, तोंड झाकणारा सेफ्टी मास्क वापरा करावा . 
सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी असल्यास डॉक्टरच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. अशी काळजी घ्यावी यावर सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी  भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


*चित्रकला - अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडविण्याचे रहश्य*

चित्रकला या विषया मुळे अष्टपैलू व्यक्तीमत्व घडतेच सोबतच आपला सर्वांगीण विकासही घडतो. असा एकही विषय नाही कि ज्याला चित्र कलेची साथ नाही. चित्रकला या विषया मुळे आपल्याला अभ्यासात आलेला कंटाळा/ नैराश्य दूर होते, अभ्यात एकाग्रता वाढते, एकाच जागी भरपूर वेळ बसून कार्य करण्याची क्षमता वाढते येवढेच नाही तर चित्रकला या विषयामुळे स्मरण शक्ती व कल्पना शक्ती यांचा देखील विकास होतो तसेच चित्रकला विषयामुळे हस्ताक्षरही सुंदर होते. यांचा परिणाम मनावर होतो त्यामुळे मन आनंदित आहते. चित्रकला स्पर्धेच्या विविध ऍक्टिव्हिटी विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्या होत्या.

तसेच निसर्ग संरक्षण आणि संवर्धन, विविध फनी  ऍक्टिव्हिटी,   शैक्षणिक प्रकल्प आणि उपक्रम या सारखे विविध उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक प्रयत्नशील असतात.

No comments:

Post a Comment