Sunday 27 June 2021

हेलन केलर : अंधबधिरांची माऊली

● भरारी ब्रेकींग हिंगोली ●

हेलन केलर : अंधबधिरांची माऊली 

          ( हेलन केलर यांचा जयंती दिवस )


"जीवनातील सर्व सुंदर गोष्टीचा आस्वाद घेण्याचा हक्क अपंगांही आहे, दुय्यम दर्जाच्या गोष्टीवर त्यांनी समाधान मानण्याचे कारण नही." असे ठामपणे साऱ्या विश्वाला हेलन केलर यांनी ठणकावून सांगितले होते आणि त्यांनी अंध -मुकबधिरांना  न्याय हक्क मिळवून देण्यासाठी जीवनभर प्रयत्न केले. हेलन केलर यांनी आपल्या अंधबधिर शारिरीक व्यंगावर विजय मिळवून दुसऱ्यांच्या कल्याणासाठी अहोरात्र कार्य केले. शेकडो अंध -अपंगाच्या जीवनात उज्वल, चैतन्यमय प्रकाश निर्माण केला. अमेरिकेत सर्वाधिक लोकप्रिय स्त्रीयामध्य त्यांचे नाव घेतले जाते. अंध -अपंगांना न्याय आणि समान हक्क मिळावे म्हणुन त्यांनी अपार कष्ट केले. त्यांनी स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. एक उच्च प्रतिभेची लेखिका म्हणुन त्यांनी लेखन केले.


२७ जून १८८० साली हेलन केलरचा जन्म टस्काम्बिया अलाबामा येथे झाला. हेलन बालपणी गोड आणि खेळकर मुलगी होती. पण १८८२ साली ती आजारी पडली. त्या आजारपणात तिची दृष्टी, श्रवणशक्ती आणि वाचाशक्ती देखील कायमची बंद पडली. त्या आजाराने तिचे संपूर्ण आयुष्याच बदलून गेले. एका हसत्या खेळत्या मुलीचे रूपांतर हट्टी, जिद्दी एकलकोंडी, भांडखोर आणि कुणाचेही न ऐकणाऱ्या मुलीत झाले. सारे आयुष्य अंधकारमय झाले. 


*शिकण्याची जिद्द  :* 


हेलनला शिकवले पाहिजे असे तिची आई केटी अडम्स केलर यांना मनोमन वाटत होते. म्हणुन त्यांनी आपल्या मुलीला शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध शास्त्रज्ञ अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांना पत्र लिहून मदत करण्याची याचना केली. ग्रॅहम बेल यांनी बोस्टन मधील पर्किन्स इन्स्टिटयूटशी संपर्क साधून 1887 साली अन सलिव्हन यांना हेलनला शिक्षण देण्यासाठी बोलावून घेतले.

अन सलिव्हनने अंत्यत कठीण परिस्थितीमध्य फसलेल्या हेलनला शिकवण्यासाठी जीवाचे रान केले. तिला जगण्याची नवी दिशा, नवा आत्मविश्वास दिला. सन्मानाने जगण्यासाठी प्रेरित केले. हेलनला बोलता, वाचता व लिहता यावे यासाठी अनाने विविध शैक्षणिक प्रयोग केले. बोटांनी वाचून बोलण्याची कला तिने प्रयत्नपूर्वक आत्मसात केली. ब्रेल लिपीही ती दहाव्या वर्षीच शिकली. कुठलीही गोष्ट आत्मसात करण्याचा तिचा आवाका विलक्षण होता. येणाऱ्या अनेक अडचणीवर मात करत ती टायप रायटर चालवायला शिकली.

१८८९ ते  १८९१ च्या दशकात हेलनने  घरी आणि इन्स्टिटयूटमध्ये अभ्यास करून अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर हेलन आणि अन न्यूयार्कला गेल्या. तिथे त्यांनी रॉईट ह्युमॅसन स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्या दोघी १८९६ साली केंब्रीज गेल्या. तिथे हेलनने रॅडक्लिप कॉलेज मध्ये बि.ए. ची पदवी मिळवण्याकरिता वाचनालयात आणि घरी कसून अभ्यास केला. इंग्रजी साहित्य, परदेशी भाषा आणि इतिहास या विषयाचा सखोल अभ्यास केला. १९०४ मध्ये तिने बि. ए. ची पदवी संपादन केली. बि. ए. ची पदवी संपादन करणारी अंधबधीर   मुलगी म्हणून प्रथम ठरली.

१९०६ साली मॅसॅच्युसेट्स स्टेट फॉर ब्लाइंड ची सदस्य होऊन हेलनने अंध अपंगाना चांगली वागणूक मिळावी व चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून प्रचार कार्य केले. १९०९  मध्ये त्यांनी समाजवादी पक्षात सहभाग घेतला. हेलनने स्त्रीमुक्ती, संततीनियमन, नागरी हक्क, कामगार कल्याण कार्यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.महिला आणि कामगारांच्या हक्कांसाठी तिने आपल्या लेखणीतून लढा दिला  होता.  समाजवादी तत्वज्ञावर तिचा प्रगाढ विश्वास होता. समतेच्या, मानवतेच्या वाटेवर ती आयुष्यभर चालत राहिली आणि लोकांना त्यावाटेवर चालण्यास त्यांनी प्रेरित केले. एकट्याने कार्य करण्यापेक्षा एकत्र येऊन महान कार्याची उभारणी करावी  असा तिचा जगाला मोलाचा संदेश आहे. आदर्श व्यक्तींना समोर ठेवावे. आपल्या असण्याचा शोध जाणीवपूर्वक घ्या. असे हेलन नेहमीच म्हणत असत.

१९१९ साली जागतिक पहिले महायुद्ध सुरु झाले. त्या युद्धास हेलनने तीव्र विरोध केला. युद्ध व शास्त्रावर पैशा खर्च करण्यापेक्षा शांततामय मार्गानी अंध -अपंगाच्या कल्याणासाठी खर्च करावा म्हणून ती अमेरिकेत चाललेल्या युद्ध विरोधी चळवळीत सहभागी झाली होती. 


अमेरिकन फॉउंडेशन फॉर द ओव्हर सीज ब्लाइंड च्या वतीने हेलन आणि पॉल यांनी सर्व जगभर फिरून अंध व्यक्तीच्या गरजा आणि त्यांच्या प्रश्नाबद्दल व्याख्याने दिली. अमेरिकन फॉउंडेशन 'गार्डियन अंजल ऑफ द ब्लाइंड या संस्थेने 'अंधाची माऊली 'हा बहुमान हेलन केलरला बहाल केला.१९२९ ला दुसरे महायुद्ध सुरु झाले. दुसऱ्या महायुद्धाला देखील विरोध करून शांततामय सहजीवनाच्या विचाराचा जगभर प्रसार केला. दुसऱ्या युद्धात जखमी झालेल्या शेकडो सैनिक आणि नागरिकांना जीवन जगण्याची प्रेरणा देण्यासाठी हेलन जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या अणुबॉम्ब हल्यात बेचिराख झालेल्या शहरात जाऊन तेथील सैनिक आणि नागरिकांना त्यांनी मदत केली. 


एक सर्वोत्तम लेखिका म्हणून  त्यानी  अनेक लेख लिहले आणि १२ पुस्तके लिहिली होती.  दी स्टोरी ऑफ माय लाईफ (१९०३) आणि दी वर्ल्ड आय लिव्ह इन (१९०८) अश्या प्रशिद्ध पुस्तके देखील त्यांनी लिहली आहेत. त्यामध्ये त्यांनी आपला जीवन संघर्ष वर्णन केला आहे. 

१९६० साली हेलनला ह्र्दयविकाराचा झटका आला त्यामुळे ती आजारी पडली. त्या आजारापणामुळे तीचा जगाशी संर्पक तुडत गेला आणि १९६८ मध्ये त्यांचा शांतपणे मृत्यु झाला. सर्वाशी आदर, प्रेम आणि गौरव संपादन केलेली ती एक महान आणि कर्तृत्वान स्त्री होती. जगभरातील अंध -अपंग व्यक्तीच्या जीवनात जगण्याची नवी दिशा मिळावी, त्यांना मान -सन्मान मिळावा, न्याय मिळावा. सर्वांसारखे मुक्त आणि नैसर्गिक जीवन जगता यावे यासाठी हेलने सर्व जगभर फिरून अपार कष्ट केले आणि त्यांनी अंध -अपंगाच्या जीवनात नवा दैदिप्यमान प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बालवाचकांनी हेलन केलर यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या विचारावरील पुस्तकांचे वाचन करावे. त्यांच्या संघर्षमय जीवनापासून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात येणाऱ्या संकटावर मात करावी. आपले जीवन यशस्वी करावे. 


✒चंद्रकांत गौतम नांगरे 
ग्रंथपाल 
पोदार इंटरनॅशनल स्कूल, हिंगोली

● भरारी वृत्त सेवा हिंगोली ●

Helen Adams Keller (June 27, 1880 – June 1, 1968) was an American author, disability rights advocate, political activist and lecturer. Born in West Tuscumbia, Alabama, she lost her sight and hearing after a bout of illness at the age of nineteen months. She then communicated primarily using home signsuntil the age of seven when she met her first teacher and life-long companion Anne Sullivan, who taught her language, including reading and writing; Sullivan's first lessons involved spelling words on Keller's hand to show her the names of objects around her. She also learned how to speak and to understand other people's speech using the Tadoma method. After an education at both specialist and mainstream schools, she attended Radcliffe College of Harvard University and became the first deafblindperson to earn a Bachelor of Arts degree. She worked for the American Foundation for the Blind (AFB) from 1924 until 1968, during which time she toured the United States and traveled to 35 countries around the globe advocating for those with vision loss.

Keller was a prolific author, writing 14 books and hundreds of speeches and essays on topics ranging from animals to Mahatma Gandhi.[1] Keller campaigned for those with disabilities, for women’s suffragelabor rights, and world peace. She joined the Socialist Party of America in 1909. She was a supporter of the NAACP and an original member of the American Civil Liberties Union. In 1933, when her book How I Became a Socialist was burned by Nazi youth, she wrote an open letter to the Student Body of Germany condemning censorship and prejudice.

The story of Keller and Sullivan was made famous by Keller's 1903 autobiography, The Story of My Life, and its adaptations for film and stage, The Miracle Worker. Her birthplace is now a museum[2] and sponsors an annual "Helen Keller Day". Her June 27 birthday is commemorated as Helen Keller Day in Pennsylvania and, in the centenary year of her birth, was recognized by a presidential proclamation from U.S. President Jimmy Carter.

She was inducted into the Alabama Women's Hall of Fame in 1971 and was one of twelve inaugural inductees to the Alabama Writers Hall of Fame on June 8, 2015.[3]

No comments:

Post a Comment