Sunday 16 August 2020

झंडा उंचा रहे हमारा.

झंडा उंचा रहे हमारा.... 


कोरोना संक्रमणाच्या काळात डिजिटल माध्यमाद्वारे स्वातंत्र्यदिन साजरा 
(सॅनिटायझर, मास्क लावून आणि  सामाजिक अंतर राखत स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण )


विद्यार्थ्यांनी सकारात्मकता अंगीकारून कोरोनाने निर्माण केलेल्या परिस्थितीचा सामना करावा.... प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज 


हिंगोली, दि. 15-8-2020

येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन डिजिटल माध्यमाद्वारे साजरा करण्यात आला. 
यावेळी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज म्हणाले की,  ' कोरोना आजाराने सर्व विश्वात आपत्तकालीन स्थिती निर्माण केली आहे.  शैक्षणिक व्यवस्थेसह  सर्व व्यवहार पद्धतीमध्ये बदल झाले आहेत.  लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास  बाळगावा.  सकारात्मक विचार करावेत आणि येणाऱ्या संकटमय परिस्थितीवर मात करून विजयी व्हावे.  तसेच विद्यार्थ्यांनी जीवनभर भारतीय राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान करावा. '

शाळेतील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. पण प्रत्यक्ष कार्यक्रमात विद्यार्थ्यांची उणीव जाणवत होती.  

स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये चित्रकला, नृत्य, गायन आणि कोरोना व्हायरसवर सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

नृत्याच्या माध्यमातून कोविड योद्धाचा गौरव करण्यात आला.  तर सामान्य ज्ञान स्पर्धेच्या माध्यमातून कोरोना व्हायरसवर विद्यार्थ्यंमध्ये जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रम साजरा करण्यासाठी हरिदास रेड्डी, मुकुंदराज हुंबे, मोहोनी दीक्षित, कल्याणी देशमुख, संतोष दिपके,  शेख वहीद, किरण जोगी,मुकेश डहाळे,  निकेश यरमळ आणि प्रयाग मोटघरे यांच्यासह शाळेतील शिक्षक यांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment