Thursday 20 August 2020

फिट राहा.. आनंदी राहा.... ' या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह पालकांना सहभागी होण्याचे आवाहन

'फिट राहा.. आनंदी राहा.... ' या फेसबुक लाईव्ह 
कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह पालकांना सहभागी होण्याचे आवाहन


शरीर निरोगी आणि मन प्रफुल्लित राहण्यासाठी नियमित व्यायाम करावा -प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज 
हिंगोली, दि. 20-8-2020
येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये लॉकडाऊन कालावधीत  'फिट राहा.. आनंदी राहा.... ' या फेसबुक लाईव्ह 
कार्यक्रमाचे विद्यार्थ्यांसह पालकांसाठी आयोजन करण्यात आले आहे. 

प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना म्हणाले की, 'आजच्या काळात सर्वांनीच स्वतः च्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. शरीर निरोगी आणि मन प्रफुल्लित राहण्यासाठी नियमित व्यायाम करावा. '

'फिट राहा.. आनंदी राहा.... ' हा फेसबुक लाईव्ह 
कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार दररोज  सकाळी सात ते साडेसात या वेळेत  घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शैख वहिद  हे व्यायाम,  संतोष दिपके  हे डान्सद्वारे फिट राहणे,      मनीषा पाटील ह्या  ऍरोबिक, ज्ञानदा रोकडे  ह्या झुंबा डान्स, सुमती देऊळकर  ह्या योगासन असे विविध  उपक्रम घेणार आहेत.  

एक नवीन आणि नावीन्यपुर्ण उपक्रम सुरु करून शाळेतील विद्यार्थ्यांसह पालकांना आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम संदेश आणि व्यायामाचे विविध उपक्रम फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून ऑनलाईन प्रत्यक्ष दाखवण्यात  येणार आहेत. 

या कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक निकेश यरमळ आणि चंद्रकांत नांगरे मनमोहक आणि आरोग्यदायी संगीत देण्याचे कार्य करणार आहेत.
तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहोनी दीक्षित, प्रयाग मोटघरे यांच्यासह शाळेतील शिक्षक प्रयत्न करणार आहेत.

4 comments: