Monday 24 August 2020

गणेश उत्सवानिमित्त शाळेतील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी विविध स्पर्धांचे ऑनलाइन आयोजन

गणेश उत्सवानिमित्त शाळेतील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी विविध स्पर्धांचे  ऑनलाइन आयोजन 


 


हिंगोली , दिनांक : 
२५  ऑगस्ट २०२०
“ कोरोना वायरसच्या लॉकडाउनमुळे गेल्या पाच – सहा महिन्यापासून विद्यार्थी घरात बसून आहेत ; परंतु पोदार शाळा मुलांना विविध उपक्रम आणि स्पर्धेच्या माध्यमातून आनंददायी शिक्षणासह जीवनमूल्य देण्याचे कार्य करीत  आहे . मुलेही मोठ्या उत्साहाने विविध स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या जीवनात नव–नवीन चैतन्यमय विचार घेत आहेत . या गणेश उत्सवानिमित्त शाळेतील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी विविध स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे, त्यामध्ये ते मोठ्या आनंदाने सहभाग घेत आहेत .  असे प्रतिपादन प्राचार्य संजीवकुमार भारद्वाज यांनी  गणपती उत्सवानिमित्त घेतलेल्या ऑनलाईन क्लासमध्ये  केले .
   येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये गणेश उत्सवानिमित्त शाळेतील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी विविध स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे . त्यामध्ये पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती साकारण्याची स्पर्धा , तिसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी गणपती  सजावट करण्याची स्पर्धा , पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणेश श्लोक किंवा भजन म्हणण्याची स्पर्धा तर पालक वर्गासाठी मोदक बनवून त्याची सजावट करण्याच्या स्पर्धेचे तसेच गणेश आरती घेते वेळेस आपल्या संपूर्ण कुटुंबाचा सेल्फी काढून तो शाळेला पाठवणे अशा विविध स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. या सर्व स्पर्धेत सहभाग घेण्याची अंतिम दिनांक 29 ऑगस्ट 2020 असून या विविध स्पर्धेला विद्यार्थ्यासह पालकवर्ग मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत .
 

विद्यार्थ्यांना कलाशिक्षक मुकेश डहाळे यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कशा  बनवाव्यात याविषयी मार्गदर्शन केले . ते बोलतांना म्हणाले की, ‘ गणेश मूर्ती ही मातीची किंवा वर्तमान पेपरांपासून बनवावी. गणेश मूर्तीला चकचक्कीत किंवा रासायनिक रंग देऊ नका त्या एेवजी पाण्यात सहज विरघळणारे जलरंग द्यावेत त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही .

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी हे  प्रयत्न करत आहेत .

No comments:

Post a Comment