Saturday, 29 August 2020

मेजर ध्यान चंद यासारख्या महान खेळाडूचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यानी क्रिडा क्षेत्रात प्राविण्य मिळवावे - प्राचार्य मा.संजीवजी कुमार भारद्वाज

भारतीय राष्ट्रीय क्रिडा दिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा ओपन हाऊस पदग्रहण सोहळा  ऑनलाइन पद्धतीने साजरा :
 मेजर ध्यान चंद यासारख्या महान खेळाडूचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यानी क्रिडा क्षेत्रात प्राविण्य मिळवावे - प्राचार्य मा.संजीवजी कुमार भारद्वाज
 

हिंगोली,  दि. 29-8-2020

 

   येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये भारतीय क्रिडा दिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा ओपन हाऊस मधील पदग्रहण सोहळा  ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेचे प्राचार्य मा.संजीवजी कुमार  भारद्वाज यांनी विद्यार्थ्यांना अनुशासन आणि शिस्ती पालनाची शपथ दिली.
मा. प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज यांनी आपल्या मार्गदर्शनमय भाषणात प्रतिपादन केले की, “ मेजर  ध्यान चंद आणि सचिन तेंडुलकर यासारख्या महान खेळाडूचा आदर्श विद्यार्थ्यानी घेतला पाहिजे. हॉकी विश्वातील सर्वात महान खेळाडू म्हणून आजही मेजर ध्यानचंद यांचे नाव आदराने घेतले जाते. हॉकीचा  जादूगार अशीच त्यांची जगभरात ओळख आहे . त्या खेळाडूंनी आपल्या – आपल्या क्रिडा क्षेत्रात महान अशी कामगिरी केली त्या प्रमाणे विद्यार्थ्यानी विविध खेळात प्राविण्य मिळवले पाहिजे. आजच्या काळात शरीर फिट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी विद्यार्थ्यानी खेळत राहिले पाहिजे . ”
ऑनलाईन घेण्यात आलेल्या निवडणुकीत शाळेचा प्रमुख विद्यार्थी म्हणून वरद सूर्यवंशी आणि प्रमुख  विद्यार्थींनी शैली दमकोंडावर ह्यांनी पदग्रहण केले . तर उपप्रमुख विद्यार्थी जय कांबळे,  उपप्रमुख विद्यार्थिनी राशी साबू, क्रिडाप्रमुख विद्यार्थी सार्थ मास्ट,  सांस्कृतिक प्रमुख   विद्यार्थिनी श्रुती घुगे,  सांस्कृतिक उपप्रमुख  विद्यार्थी संकल्प मोरे, सांस्कृतिक उपप्रमुख विद्यार्थिनी  मानसी कोरडे, आरोग्य प्रमुख विद्यार्थी अभिनव पवार,  आरोग्य उपप्रमुख  पियुष रणखांब तर शिस्तप्रमुख  विद्यार्थी संस्कार सोवितकर ह्यांनी पदग्रहण केले .
ऑनलाईन पद्धतीने पदग्रहण केलेल्या सर्व उमेदवारांचे प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज आणि शाळेतील सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले.
तसेच शाळेतील शिक्षिका प्रणाली दाभाडे , ज्ञानदा रोकडे , शीतल देशपांडे आणि फौजिया शैख यांना हाऊस मिस्ट्रेस म्हणून पदग्रहण केले . पदग्रहण केलेल्या सर्व सदस्याचे प्राचार्य मा.संजीवजी कुमार भारद्वाज आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.

 

या ऑनलाइन  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पाटील आणि महेश गौरखेडे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुकुंदराज हुंबे , व्यंकट हरिदास रेड्डी, मोहिनी दिक्षित , शेख वहिद , संतोष दिपके , चंदन चौधरी आणि मुकेश डहाळे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment