Sunday 20 June 2021

Yoga Day 2021

पोदार मध्ये ऑनलाईन योगा वर्कशॉप संपन्न 

'फिट राहा हिट राहा, 
करे योग रहो निरोग '
साधी राहणी उच्च विचारसरणी '
 ' योगा वर्कशॉप मधून तज्ञाचा सुर.... 

हिंगोली, दि. 18-6-2021

फिट राहा हिट राहा, 
करे योग रहो निरोग '
साधी राहणी उच्च विचारसरणी '
 ' योगा वर्कशॉप मधून तज्ञानी विद्यार्थ्यांना सल्ला दिला. 
येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये योगा दिनानिमित्त ऑनलाईन योगा वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज, डॉ. माधुरी शास्त्री, डॉ. रक्षा बगडिया आणि प्रिती सोवितकर हे होते.

या ऑनलाईन वर्कशॉपमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना 
डॉ. माधुरी शास्त्री म्हणाल्या की,'  निसर्गोपचाराच्या  पद्धतीच्या  माध्यमातून शरीराची काळजी घेता येऊ शकते. निसर्गोपचार पद्धतीमध्ये  आजाराच्या लक्षणापेक्षा सरळ त्या आजाराचा शोध घेऊन  त्यावर उपचार केला जातात. निसर्गोपचार पध्दती आजच्या गतिशील जीवनात आपल्याला मिळालेले एक वरदान आहे. पण निसर्गोपचार पध्दतीचा साईड इफेक्ट होण्याची शक्यता नसते.
योग आणि निसर्गोपचार पद्धतीने उपचार करून आजारावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. आपल्या शरीरात आजारावर नियंत्रण मिळवून देण्याची क्षमता निसर्गाने दिलेली एक महान देणगी आहे. या पद्धतीमध्ये माती, पाणी, सूर्यप्रकाश आणि शुद्ध हवा याच्या मदतीने उपचार करण्यात येतात.'

विद्यार्थी जीवनात योगाचे महत्व यावर बोलतांना प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज, ' विद्यार्थ्यांनी नियमितपणे योग करावेत. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य संतुलित राहते. सकारत्मक आणि नव चैतन्यमय ऊर्जा प्राप्त होते. आजच्या ताण - तणावाच्या काळात सकारात्मक ऊर्जा ठेवणे आवश्यक आहे. अभ्यासाचा ताण -तणाव घेऊ नये. 'अच्छा खाओ, अच्छा पढो, अच्छा इन्सान बनो 'लवकर झोपा, शांत झोपा आणि लवकर उठा. यासह हेल्दी आहार घ्यावा तरच स्वास्थ आरोग्य राहू शकते.'

कोरोना काळातील  दैनंदिन जीवनात विद्यार्थ्यांचे दैनिक शेड्युल कसे असावे याबद्दल प्रिती सोवितकर म्हणाल्या की, ' विद्यार्थ्यांनी साधा आणि आदर्श आहार घ्यावा. आहार योग्य असेल तर पोट साफ होईल. पोट साफ असलेतर आजार होणार नाहीत. विद्यार्थ्यांनी सकाळी लवकर उठावे. सकाळी उठल्यावर 15-20 मिनिटं व्यायाम करावा. 1 किंवा 2 ग्लास पाणी लिंबू टाकून प्यावे.अभ्यास करावा. 30 मिनिटं  वॉकिंग करावी किंवा योगासने करावीत. काजू आणि बदाम खावी त्यामुळे मेमरी पॉवर वाढते. 
सकाळी 7ते 9 या वेळेत ब्रेकफास्ट घ्यावा. संध्याकाळी देखील हेल्दी आहार घ्यावा. त्यामध्ये दाल, रोटी, सब्जी आणि सलाद असावे. जेवण करतांना वारंवार पाणी पिऊ नये जेवण झाल्यावर 40 मिनिटांनी पाणी प्यावे. साधे मिल्क प्यावे किंवा हळदीयुक्त मिल्क प्यावे. अश्या पद्धतीचा दैनंदिन आदर्श आहार घ्यावा. '

योगासने करण्याच्या फायद्याबद्दल बोलतांना डॉ. रक्षा बगडिया म्हणाल्या की, '  योगासनाला प्राचीन अशी परंपरा लाभलेली आहे. पण आजच्या कोरोना काळात संर्वांनाच योगासनाचे महत्व कळले आहे. लोक मोठ्या प्रमाणात योगासने करतांना दिसत आहेत. विद्यार्थ्यांनी घरीच बैठे योगासने करावीत. अनुलोम -विलोम, प्राणायाम, सूर्यनमस्कार, यासारखे योगासने करावीत. लंबी और गहरी श्वास घेऊन सोडावी. पालकांनी आपल्या मुलांसोबत विविध प्रकारची योगासने करावीत. नियमित योगासने केल्याने शरीर स्वस्थ आणि तंदरुस्त राहते. सकारात्मक आणि उत्साही ऊर्जा प्राप्त होते. तसेच मानसिक शांतता लाभते. 
शाळेतील शिक्षक,  विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी  या ऑनलाईन योगा वोर्कशॉपचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक शेख वहिद, प्रयाग मोटघरे आणि संतोष दिपके यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment