Tuesday 10 August 2021

बालवाचक घडवण्यासाठी… पोदार शाळेचे सुसज्ज आणि समृद्ध ग्रंथालय

 
बालवाचक घडवण्यासाठी… पोदार शाळेचे सुसज्ज आणि समृद्ध ग्रंथालय


                                                चंद्रकांत नांगरे,
 ग्रंथपाल
                                                                                                                              पोदार इंटरनॅशनल स्कूल, हिंगोली
                                                                                                                               मोबाईल: 8421632803




 

सारांश
:
  शालेय ग्रंथालय हे संस्थेचे ह्रदय म्हणून शालेय शिक्षणाच्या गुणवंत्तावाढी मध्ये आपले महत्वपूर्ण योगदान देत असते . शिक्षण म्हणजे जीवन उन्नत करणारी प्रक्रिया होय. शाळा ही शिक्षण देणारी पवित्र संस्था आहे. शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संस्कारशील, सृजनत्मक, कौशल्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात येते. यासोबतच विद्यार्थ्यांना वाचनीय साहित्याची वाचन विषयक गोडी लावून विद्यार्थ्यांना 21व्या शतकातील सक्षम आणि ज्ञानमय नागरिक निर्माण करण्याचे कार्य शालेय ग्रंथालयाच्या माध्यमातून करण्यात येऊ शकते.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे़ जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही़असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतातत्यांच्यामते   शिक्षण ही पवित्र संस्था आहे़. शाळेत मने पवित्र होतात़. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र, ते राष्ट्रीयतेचे, मानवतेचे नी अज्ञानमय दूर करण्याचे उदात्त कार्य आहे़. शिक्षण हया साधनाचा उपयोग करून आपण आपले व्यक्तिमत्व विकसित करू शकतो. आपल्या जीवनाला नवी दिशा, नवे वळण, संस्कार आणि संकल्प देऊन आपले यशस्वी होण्याचे स्वप्न साकार करू शकतो. शिक्षणातूनच एक राष्ट्र विकसित ज्ञानमय, सक्षम आणि संस्कारशील पिढी घडवू शकतो.
 
शालेय ग्रंथालयाचे विद्यार्थी जीवनातील महत्व :
 
 आजची अर्थव्यवस्था ज्ञानाधिष्टीत होत आहे . माहिती आणि तंत्रज्ञानात अग्रेसर राष्ट्र आज विकसित होत आहेत. त्यामुळे आपल्याला  ज्ञान संकलन आणि प्रसारांची केंद्रे असलेली ग्रंथालय समृद्ध करून राष्ट्र विकासाला चालना द्यावी लागेल. तरच एक सुस्ंकृत , सुजाण , सर्जनशील , स्नेहमय राष्ट्र विकासीत होईल.त्यासाठी शालेय जीवनातच मुलांना ग्रंथ वाचनाची सवय लावून ज्ञानसंपन्न घडवण्यासाठी शालेय ग्रंथालयाची आवश्यकता आहे.
  शैक्षणिक संस्थेशी संबंधीत ग्रंथालय म्हणजे शैक्षणिक ग्रंथालय होयविद्यार्थ्यांना भावी जीवनात मानाचे आणि योग्य स्थान मिळावे म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा . विद्यार्थ्यां मध्ये असलेली वाड:मयीन आणि कलात्मक गुणाची वाढ करण्याच्या उद्देशाने शैक्षणिक ग्रंथालय स्थापन केली जातात. सामाजिक , आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, तांत्रिक, नैतिक समृद्धी एक शांत सामाजिक चळवळ म्हणून दिशा देणे, एक कृतीशील भूमिका बजावने आणि वाढणे किंवा समृद्ध राष्ट्र निर्माण करण्यासाठी पुढाकार घेऊन कार्य करणे हे शैक्षणिक ग्रंथालयाच्या माध्यमातून सहज होऊ शकते.
 
शालेय ग्रंथालयाचे उपक्रमशील उद्दिष्टे :
 शालेय ग्रंथालय हे संस्थेचे ह्रदय म्हणून शालेय शिक्षणाच्या गुणवंत्तावाढी मध्ये आपले महत्वपूर्ण योगदान देत असते. शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह त्यांच्या बौद्धीक विकासासाठी शाळेमध्ये ग्रंथालयाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. शालेय ग्रंथालयाच्या उद्देष्टाबाबत अमेरिन ग्रंथालय संघाने खालील उद्देश सांगितले आहेत. व्यक्तिगत वाढ विकासासाठी ग्रंथालयातील वाचन साहित्य आणि सेवा विद्यार्थ्यांना पुरविणे. वाचनासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, जेणे करून ते वाचनातून आनंद समाधान शोधतील आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घेण्यास सक्षम होतील. वाचनाची गोडी विकसित करण्यासाठी, समाधानकारक व्यक्तिगत तडजोड, अपेक्षित सामाजिक भूमिका संपादनासाठी ग्रंथालयाच्या माध्यमातून मुला -मुलींना संधी उपलब्ध करून देणे. पुस्तकाचा उपयोग करून नवीन माहिती ज्ञान घेण्याची सवय त्यांच्यामध्ये विकसित करणे. ग्रंथालयाचे आणि दृक श्राव्य साधनांचे विवेकशील आणि कार्यक्षम वाचक बनविण्यासाठी मुलांना मदत करणे.आजच्या युगात शालेय ग्रंथालय हे शैक्षणिक प्रणालीचा अविभाज्य अंग बनले आहे.
 
शालेय ग्रंथलायाचे सृजनशील कार्य :
शालेय ग्रंथालय ही सेवाकेंद्र म्हणून बालवाचक आणि शिक्षकांना हवे ते वाचन साहित्य पुरवत असते. शालेय ग्रंथालयातील वाचन साहित्याचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वापर करण्यासाठी ग्रंथालयाने प्रयत्नशील राहणे आवश्यक त्यासाठी शालेय ग्रंथालयाला वाचन साहित्य देव -घेव करणे, वाचकांना सल्ला देणे, वाचन साहित्य बालवाचकांच्या मागणीनुसार आरक्षित ठेवणे, बालवाचकांना सूचना देणे. वाचकांना ग्रंथलाय तालिका हाताळण्या मदत करणे, बालवाचकांना ग्रंथालयाचा परिचय करून देणे,ग्रंथप्रदर्शन करणे, ग्रंथ सप्ताह, सामान्य ज्ञान स्पर्धा,निबंध लेखन, काव्य आणि कथावाचन स्पर्धा यासारख्या विविध स्पर्धाचे आयोजन करणे. वाचन साहित्याची यादी तयार करून ती वाचकांस हाताळण्यास साहाय्य करणे. ग्रंथालयाचा वापर कसा करावा ह्याबद्दल वाचकांना माहिती देणे. पुस्तक कसे हाताळावे याबाबत सूचना देणेवाचकांनी वाचलेल्या  पुस्तकांबाबत माहिती विचारणे. बालवाचकांना नवीन प्रकाशित पुस्तकाबाबत माहिती देणे. असे विविध वाचनीय कार्य करून शालेय ग्रंथालयाने बालवाचकांना पुस्तक वाचनाची सवय वृद्धिंगत केली पाहिजे.
पोदार शाळेचा वैभवशाली इतिहास :
 21 व्या शतकातील आव्हानाचा सामना करण्यासाठी भारतातील विद्यार्थ्यांना कलाकौशल्याआधारीत शिक्षण देण्याच्या उद्देशाने गुणवत्तापूर्ण आणि मूल्याआधारीत शिक्षण देणे, विद्यार्थ्यांच्या आधुनिक युगातील शैक्षणिक गरजाची पूर्ती करणे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल करणे, त्यांचे जीवन संस्कारशील बनवणे. विद्यार्थ्यांना सर्वोत्तम नागरिक घडविणे यासाठी सर्वोत्तम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य हिंगोली शहराच्या वैभवात उज्वल यशाची परंपरा निर्माण करणारी पोदार इंटरनॅशनल स्कूल मोठ्या आत्मीयतेने करत आहे.
   राष्ट्रीय - आंतराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम शाळा आणि उज्ज्वल यशाची परंपरा लाभलेल्या पोदार शिक्षण समुहाचे अध्यक्ष  डॉ.पवन पोदार यांनीपोदार इंटरनॅशनल स्कूलच्यारूपाने सन 2016 मध्ये पोदार एज्यूकेशन नेटवर्कची शाखा हिंगोली येथे सुरू केली.त्या रोपट्याने अवघ्या पाच वर्षात भरारी घेऊन हिंगोली जिल्ह्याच्या विश्वात नावलौकिक मिळवला आहे . ही शाळा विद्यार्थी आणि पालकांच्या आशाआकांक्षाच्या पूर्तीसह हिंगोली जिल्ह्यातील शैक्षणिक चळवळीत महत्वपूर्ण योगदान देताना दिसत आहे .
  सुशिक्षित आणि सुसंकृत नागरिक घडवण्या सोबतच देशाला अभिमान वाटावा असा  नागरिक घडवण्याचे कार्य या शाळेच्या माध्यमातून करण्यात येते . जबाबदार आणि कर्तव्यदक्ष नागरिक घडवण्यासाठी शाळेच्या वतीने प्रयत्न केले जातात . विद्यार्थ्यांना सुशिक्षित करण्यासोबतच त्यांच्यामध्ये सांस्कृतिक मूल्य रुजवण्याचे कार्य या शाळेच्या माध्यमातून करण्यात येते

विद्यार्थ्यांनी अधिक अधिक पुस्तकांचे वाचन करावे
 
 
शाळेचे प्राचार्य मा. संजीवजी कुमार भारद्वाज म्हणतात की, “ आजच्या विद्यार्थ्यांना जवळ असणारे ज्ञान ही त्यांची फार मोठी शक्ती आहे .या शक्तीच्या सहाय्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतोच परंतु त्याचा कार्यशक्ती देखील प्रभाव पडतो. पुस्तकाचे वाचन जेवढे कराल तेवढे ज्ञान वाढत जाईल. वाचन हे ज्ञान मिळवण्याचे साधन आहे.वाचनाने जीवन समृद्ध होते. कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला सतत त्या क्षेत्रातील नवेनवे ज्ञान,नवी नवी माहिती आणि अद्यावत कौशल्ये आत्मसात करावी लागतील. त्यासाठी पुस्तकांचे वाचन करावेच लागते.  त्यामुळे शालेय ग्रंथालयाचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी अधिक अधिक पुस्तकांचे वाचन करावे.
                 

                                                                     

                                         प्राचार्य मा. संजीवजी कुमार भारद्वाज



 
           पोदार शाळेचे समृद्ध आणि सुसज्ज ग्रंथालय :
 
पोदार शाळेत उत्तम ग्रंथालय सेवा देणारे एक मध्यवर्ती ग्रंथालय स्थापन करण्यात आले आहे. सुसज्ज आणि ग्रंथसंपन्न असे ग्रंथालय शालेय बालवाचकांना आपल्या ग्रंथालयीनसेवा - सुविधा देण्यात आघाडीवर असते. ग्रंथालय हे शाळेचे हृदय असते. ते शाळेच्या वैभव आणि सोंदर्यात अधिक भर टाकत असते. संस्थेच्या शैक्षणिक उद्देशपूर्तीसाठी आपले वाचनविषयक कार्य करून संस्थेच्या उज्वल यशात मोलाचा सहभाग देत असते.
 21 ्या शतकातील आव्हानाचा सामना करणारे सक्षम विद्यार्थी घडवणे हा संस्थेचा उद्देश आहे. त्याच उद्देशाच्या परिपूर्तीसाठी शाळेच्या नवीन भव्यदिव्य वास्तुमध्ये समृद्ध आणि सुसज्ज ग्रंथालय स्थापन करण्यात आले आहे. या ग्रंथालयामध्ये इतिहास, विज्ञान, तंत्रज्ञान, शब्दकोश, संस्कृतीकोश, संदर्भग्रंथ तसेच कविता, निती कथा, बोधकथा,कादंबरी, नाटक आणि आत्मचरित्र या विषयावरील समृध्द आणि संपन्न असे राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झालेले तीन हजार तीनशे  ग्रंथ उपलब्ध आहेत.
 ग्रंथालयाचा मूळ उद्देश ज्ञान माहिती संग्रहण हा असतो.शाळा-महाविद्यालयांना ग्रंथालय महत्त्वाचे सक्तीचे असते. यामुळे बालवाचकांना संदर्भासहित वाचनाची सवय लागते. आजच्या स्पर्धात्मक जगात, नियमितपणे पुस्तके वाचण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना त्याचा खूप उपयोग होतो. शाळेत 3300 पेक्षा अधिक पुस्तके, सीडी. सह उत्कृष्ट ग्रंथालय सुविधा आहेत आणि 20 हून अधिक नियतकालिके उपलब्ध आहेत.
  आजच्या बदलत्या डिजिटलायझेशनच्या काळात ग्रंथालयानेही डिजिटल क्लासरूमची आणि डिजिडल लायब्ररीची उभारणी केली आहे. हायस्पीड इंटरनेटची जोडणी असणारे डिजिटल लायब्ररी आहे. व्हिडिओ ऑडिओ यांच्या द्वारे विद्यार्थ्यांना या डिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून अत्याधुनिक पद्धतीने ज्ञानस्रोत उपलब्ध करून देण्यात येतात. लायब्ररीच्या वर्गात कोणत्याही विषयावर सचित्र माहिती उपलब्ध होत असल्याने विद्यार्थीनीना विषय समजून घेणे सोपे जाते. आजच्या बदलत्या युगात स्मार्ट लायब्ररी स्थापन करून शाळेच्या स्मार्ट विद्यार्थ्यांना विविध विषयावरील ज्ञान ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येत आहे.
   समृद्ध आणि संपन्न अश्या ग्रंथसंपदेत रामायणकथा, महाभारत कथासंग्रह, निती कथा संग्रह, जातक कथा संग्रह, परीच्या छान -छान गोष्टी, पंचतंत्र कथा, तेनालीराम कथा, अकबर -बिरबल बोधकथा, अरबीयन नाईट बालकथा, हैरी पॉटर स्टोरी बुक्स, गणित विकीपीडिया, सायन्स विकीपीडिया, भूगोल विकीपीडिया, इंग्रजी शब्दकोश यासह विविध विषयावरील प्रसिद्ध असे संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत.
  महात्मा ज्योतिबा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, मिसाईल मॅन डॉ. अब्दुल कलाम, इंदिरा गांधी आणि मदर टेरेसा यासारख्या असंख्य भारतीय महान महापुरुषांचे चरित्रात्मक पुस्तके उपलब्ध आहेत. महान क्रांतिकारक शहीद भगत सिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस आणि मंगल पांडे यासह भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे चरित्रात्मक ग्रंथ उपलब्ध आहेत. राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विचारवंताचे चरित्रात्मक समृद्ध ग्रंथ उपलब्ध आहेत.
  संस्कारक्षम, साहित्य, मनोरंजन आणि माहितीपूर्ण असे विविध मासिक आणि नियतकालीक मुलांना वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतातचालुघडामोडी आणि Mpsc, Upsc यासारख्या विविध स्पर्धापरीक्षेसाठी उपयुक्त असणारे चाणक्य मंडळ, स्पर्धापरीक्षा, प्रतियोगिता दर्पण, युनिक बुलेटिन आणि यशाचा मार्ग असे विविध दर्जेदार मासिक मुलांना ज्ञान घेण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतात.तसेच बालवाचकांच्या आवडीचे चंपक आणि किशोर यासारखे वाचनीय मासिक बालवाचकांना वाचण्यासाठी लायब्ररीच्या क्लासमध्ये आवर्जून देण्यात येते आणि बालवाचक ते मासिक वाचून मनोरंजनासह ज्ञानप्राप्त करून घेतात.
  बालवाचकांना वर्तमानपत्र वाचनाची सवय लागावी. मुलांनी दररोज वर्तमानपत्र वाचावे.जगातील दैनंदिन चालुघडामोडीचे आणि सामान्य ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी मुलांना वर्तमानपत्र वाचण्याचे महत्व आणि फायदे सांगून वर्तमानपत्र वाचण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते. शाळेच्या ग्रंथालयात दै. लोकमत, दै. सकाळ, दै. देशोन्नती, दै. पुढारी, दै. मराठवाडा केसरी, दै. श्रमिक एकजूट, दै. लोकमत टाइम्स यासारखे लोकप्रिय आणि प्रसिद्ध वर्तमानपत्र वाचण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येतात. जग, भारत, महाराष्ट्र, भारतातील राज्य याचे विविध विषयावरील माहितीपूर्ण नकाशे उपलब्ध करून देण्यात येतात.
    आजच्या आधुनिक युगातील संगणक क्रांतीमुळे वाचनीय साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. वाचकही इलेक्ट्रॉनिक वाचन साहित्याचा मोठ्या प्रमाणत उपयोग करत आहेत.हे लक्षात घेऊन शाळेच्या ग्रंथालयाने डिजिटल लायब्ररी सुरु केली आहेडिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून बालवाचकांना पिडीएफच्या स्वरूपात -बुक्स, - मासिक, -नियतकालीक नियमितपणे उपलब्ध करून देण्यात येतात. आजच्या आधुनिक युगातील सहज आणि सुलभरीतीने मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असलेल्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही बालवाचकांना वाचनीय साहित्य पूरविण्याचे कार्य करण्यात येते. त्यासाठी ग्रंथालयाने बालवाचकांसाठी pislibhingoli.blog तयार केला असून या ब्लॉगवर नव -नवीन बोधकथा, कविता, विविध विषयावरील लेख, बालकविता,छान छान गोष्टी, सामान्य ज्ञान यासह डिजिटल लायब्ररी, सिबीएसई डिजिटल लायब्ररी यासह -बुक्स, -जर्नल्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच स्कूल लायब्ररी या नावाने फेसबुक पेज स्थापन करुन लायब्ररी बद्दल आणि विविध विषयावर महत्वपूर्ण लेख, न्युजपेपरमधील महत्वपूर्ण माहिती, सामान्यज्ञान, शाळेच्या कार्यक्रमाच्या बातम्या, उपक्रम आणि त्याचे फोटो स्कूल लायब्ररी फेसबुक पेजवर अपडेट करण्यात येतात. त्यामध्यमातून मुलांना आणि समाजाला अद्ययावत ज्ञान आणि चालूघडामोडीची माहिती देण्यात येते.
 
पोदार शालेय ग्रंथालयाचे उपक्रम :
 
  शिक्षण मानवी आणि आर्थिक विकासाची एक महत्वाची गुंतवणूक आहे. शाळेमध्ये मध्ये ग्रंथालय स्थापन करून विद्यार्थ्यांना बौद्धीक विकासासाठी ग्रंथालयाच्या माध्यमातून सतत प्रयत्न केले जातात.बालवाचकांना विविध विषयावरील समृद्ध ग्रंथ वाचण्यासाठी दिले जातात. वाचलेल्या पुस्तकांबद्दल माहिती विचारण्यात येते. बालवाचकांनी वाचलेल्या पुस्तकांवर सारांशत्मक माहिती लिहण्यास सांगण्यात येते. मुले ती माहिती एका पेजवर लिहून ग्रंथालयाकडे जमा करतात. ग्रंथालयाच्या माध्यमातून बालवाचकांनी लिहलेल्या सारांश शाळेच्या सॉफ्टबोर्ड आणि शाळेच्या ब्लॉगवर प्रसिद्ध करण्यात येता असतो.
विद्यार्थ्यांना ग्रंथालय तास, रिकाम्या वेळेत, मधल्या सुट्टीत ग्रंथालयाचा वापर करण्याची संधी देण्यात येते. त्यामुळे ग्रंथालयात विद्यार्थ्यांना ग्रंथ हाताळण्याची, ग्रंथाच्या सहवासात राहण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांच्या मनात ग्रंथाबाबत आपुलकी निर्माण होते. ग्रंथाशी त्याचे मित्रत्वाचे नाते तयार होण्यास मदत होते. त्यातूनच विद्यार्थ्यांना ग्रंथ वाचनाची आवड निर्माण होते. शालेय ग्रंथालयातून विद्यार्थ्यांना आपल्या आवडीची ग्रंथ घरी वाचण्यासाठी देण्यात येतात. शालेय विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आणि वाचन आवड वृद्धिंगत करण्यासाठी शालेय ग्रंथालयातून ग्रंथ देव -घेव करण्यात येते. हे एक महत्वपूर्ण असे शैक्षणिक कार्य आहे.शालेय ग्रंथालयाच्या माध्यमातून बालवाचक आणि शिक्षकांना ग्रंथालयीन संदर्भसेवा देण्यात येते.
 पुस्तक प्रदर्शन आणि विक्री, वाचन प्रेरणा दिवस, ग्रंथदिवस, ग्रंथपाल दिवस यासह सामान्य ज्ञान, कविता, बोधकथा, पुस्तक वाचन आणि वाचलेल्या पुस्तकांवर सारांश लेखन यासारखे उपक्रम ग्रंथालया द्वारे घेण्यात येतात. आजच्या कोरोना काळातही डिजिटल लायब्ररी सुरु करून विद्यार्थ्यांसाठी हजारो - पुस्तके ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
 एक कवी एक दिवस या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना मराठी हिंदी कवी आणि कविता बद्दल माहिती देण्यात येत असते. विविध विषयावरील महत्वपूर्ण आणि अभ्यासनीय लेखाचे वाचन लायब्ररी क्लासमध्ये करण्यात येते. तसेच वृतपत्रमधील ज्ञानमय आणि सकारात्मक बातम्या मुले मोठ्याने वाचतात. बोधकथा, नीतिकथा यासह थोर मोठ्यांचे आत्मचरित्रच्या पुस्तकांचे वाचन ऑनलाईन लायब्ररी क्लासमध्ये करण्यात येते. तसेच शाळेच्या मुलांना सामान्य ज्ञान वृद्धिंगत व्हावेयासाठी विविध विषयावरील सामान्य ज्ञान प्रश्न देण्यात येतात त्यावर ऑनलाईन टेस्ट घेण्यात येते. शाळेच्या ग्रंथालयाच्या माध्यमातून राष्ट्रीय सायन्स डे, वाचन प्रेरणा दिवस, स्वातंत्र्य दिन आणि कोरोना याविषयावर ऑनलाईन सामान्यज्ञान स्पर्धा घेऊन त्या स्पर्धेचे प्रमाणपत्र ऑनलाईनच देण्यात आल्यामुळे मुलांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंद दिसत होता. वृतपत्र कात्रण, विविध विषयावरील नवीन माहिती,सकारात्मक आणि प्रेरणादायी माहिती, वृतपत्रातील कविताचे कात्रण, शाळेत होणारे विविध उपक्रम आणि कार्यक्रमाच्या बातम्याचे कात्रण आणि त्याबाबत सविस्तर माहिती लायब्ररीच्या डिजिटल ब्लॉग आणि फेसबुकपेज वर देण्यात येते.
 ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या ग्रंथातून आपले राष्ट्र , राष्ट्रीय मूल्ये, संस्कृती, विचारधारा आणि जीवन प्रणाली यांचे दर्शन घडते. राष्ट्रीय संस्कृती, सामाजिक मूल्य आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यासाठी ग्रंथ वाचन करणे आवश्यक आहे.
 
बालवाचक घडवावे
 आजच्या गतिमान जीवनशैलीत मुलांमध्ये वाचनाविषयीची आणि साहित्याची गोडी निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी शालेय ग्रंथालय आणि पालकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. शाळेच्या दैनंदिन परिपाठमध्ये शिक्षकांनी मुलांना एक कविता, एक कथा, पुस्तकातील काही भाग किंवा महापुरुषचे जीवनचरित्र वाचून दाखवायाला सांगावे. शाळेतील शिक्षकांनी देखील मुलांना वाचन करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.
 
वाचन आणि व्यक्तीमत्व विकास
शाळा हे वाचन संस्कृती विकसित करणारे केंद्रे आहेत. येथे वाचनाचे धडे देण्यात येतात.शालेय ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक अधिक पुस्तके वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे. ग्रंथ वाचनाच्या माध्यमातून महान व्यक्तीमत्व घडणाऱ्या आणि मानवाला जागृत करणाऱ्या महानुभवांची उदाहरण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद यासारखे महामानव अखंड ग्रंथ वाचन करत असत. स्वामी विवेकानंद हे वाचनाचे फार मोठे भोक्ते होते. ते ग्रंथालयातून रोज एक पुस्तक आणून वाचत असत आणि दुसऱ्या दिवशी ते पुस्तक वापस करून नवीन पुस्तक वाचण्यासाठी आणत असत.
 
वाचायचे कशाला ?
 
 वाचनाची विद्यार्थ्यांच्या विकासात महत्वाची भूमिका असते. वाचनाचा मनावर विचारावर परिणाम घडत असतो आणि पर्यायाने त्याचे कृतीमध्ये रूपांतर होऊन विद्यार्थी संस्कारशील बनतात. वाचन विद्यार्थ्यांच्या मनाचे टॉनिक आहे. ते त्यांच्या मनाला कार्यप्रवृत करते. वाचन हे जीवनाला आकार देत असते. वाचन मनाला प्रोत्साहन देते. नव - नवीन कल्पना देते. शहाणपण देतेसदाचारी वागण्याचे बळ देते. संकटातही खचून जाता संघर्ष करण्याचे साहस ग्रंथ देतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. . पी. जे. अब्दुल कलाम होत. डॉ. कलाम म्हणतात,'ग्रंथ सदैव माझे मित्र आहेत. गेल्या पन्नास वर्षाहून काळ ग्रंथांनी मला स्वप्न दिली. स्वप्नांमधून जीवितध्येय गवसली. ग्रंथांनी मला ध्येयपूर्तीसाठी आत्मविश्वासाने सज्ज होण्यास साहाय्य केले. अपयशाच्या प्रसंगी ग्रंथानीच मला ध्येर्य दिले. उत्तम ग्रंथ माझ्या लेखी ते देवदूत होते. एरवीही ते माझ्या काळजाला हळुवार स्पर्श करतात. म्हणूनच मी माझ्या तरुण मित्रांना सांगतो. ग्रंथांशी मैत्री जोडा. ग्रंथ तुमचे उत्तम मित्र असतात.' म्हणूनच म्हटले जाते की ग्रंथ हे आपले सदैव मित्र, गुरु आणि मार्गदर्शक असतात. ग्रंथातुनच आपल्याला जीवनातील प्रकाशवाटा दिसतात. ग्रंथ वाचनातून मन स्वतंत्र विचार करायला प्रवृत्त बनते.ताण -तणावापासून सुटका होते. ग्रंथ वाचनाने विचार आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होऊ शकते. वाचनाने मनुष्य सर्वगुणसंपन्न बनतो म्हणून शालेय विद्यार्थ्यांनी दररोज किमान एक तास तरी ग्रंथ वाचन केले पाहिजे.
 
बालवाचक घडवण्यासाठी
 
शालेय ग्रंथालयाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांना त्याच्या आवडीचे पुस्तक वाचनासाठी दिले पाहिजे. मुलांनी काय वाचले हे लिहिण्यासाठी त्यांना एक स्वतंत्र वही करायला सांगावी आणि त्यामध्ये पुस्तकाविषयी माहिती लिहायला सांगावे. सर्वोउत्तम नोंदी ठेवणाऱ्या मुलांना प्रोत्साहन देण्यात यावेशाळेमध्ये बालवाचकांचे वाचक संमेलन तसेच साहित्य संमेलन घेण्यात यावे. घ्यावे. उत्तम वाचक म्हणून मुलांना 'उत्तम वाचक 'प्रमाणपत्र शालेय ग्रंथालयाने दिले पाहिजे. या बालवाचकांसाठी शाळांमध्येलेखक तुमच्या भेटीलाआणि एक दिवस एक कवी हया उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे. मुलांना शाळेकडून जी पारितोषिके दिली जातात ती ग्रंथरूपात दिली पाहिजेत.

  शालेय ग्रंथालयासह पालकांनी मुलांना वाचन करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. यासाठी पालकांनी मुलांसोबत बसून पुस्तक वाचन करावे. मुलांना त्याच्या आवडीची पुस्तके खरेदी करून द्यावी आणि त्यांना वाचण्यासाठी सांगावे. मुलांनी वाचलेल्या पुस्तकांविषयी माहिती विचारावी. मुलांना कथा, कविता आणि अन्य वाचनीय साहित्याबद्दल माहिती द्यावी ते वाचन करण्यासाठी प्रोत्साहित करावे. मुलांनी वाचलेल्या कथा आणि कविता सर्वांसमोर बोलण्यासाठी सांगावे म्हणजे मुलांना वाचण्याची अधिक गोडी निर्माण होईल.  आजच्या अत्याधुनिक काळात बालकांना ग्रंथवाचनाची प्रेरणा देण्याची खरी गरज आहे. त्यासाठी शाळेच्या ग्रंथालय, शिक्षक यांच्यासह पालकांनी बालवाचक घडवण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. 

 

No comments:

Post a Comment