Tuesday, 29 September 2026

Library Magazine 2026

 

‘माणूस म्हणून घडतांना… अविस्मरणीय गोड माणसं’ मासिक अंकाचे उत्साहात प्रकाशन

हिंगोली : दि. 10-09-2026

‘माणूस म्हणून घडतांना… अविस्मरणीय गोड माणसं’ या मासिक अंकाचे प्रकाशन पोदार इंटरनॅशनल स्कूल, हिंगोली येथे प्राचार्या अर्चना देशपांडे आणि उपप्राचार्य अमित माळगे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले.

चंद्रकांत नांगरे यांनी या मासिक अंकामध्ये आपल्या जीवनातील अनुभव, भेटलेली माणसं, त्यांचे व्यक्तिमत्त्व, विचार आणि त्यांच्या सहवासातून मिळालेल्या प्रेरणांना मनापासून शब्दबद्ध केले आहे. माणसांच्या चांगुलपणाची जपणूक करताना त्यांच्या आठवणींना साहित्यिक रूप देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

प्राचार्या अर्चना देशपांडे मॅडम म्हणाल्या की, “‘माणूस म्हणून घडतांना… अविस्मरणीय गोड माणसं’ हा अंक अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी आहे. चंद्रकांत नांगरे यांनी अनुभवांना शब्दरूप देत वाचकांना अंतर्मुख करणारे लेखन केले आहे. 

उपप्राचार्य अमित माळगे सर म्हणाले की,  “या मासिक अंकातून माणसांच्या आठवणी, त्यांचे गुण आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन प्रभावीपणे व्यक्त झाला आहे. चंद्रकांत नांगरे यांनी मनापासून केलेले लेखन वाचकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल. 

मासिक अंकाच्या प्रकाशनप्रसंगी प्राचार्या अर्चना देशपांडे आणि उपप्राचार्य अमित माळगे यांनी लेखक चंद्रकांत नांगरे यांच्या लेखनाचे कौतुक करून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Link :

‘माणूस म्हणून घडतांना… अविस्मरणीय गोड माणसं’ मासिक अंकाचे ऑनलाईन प्रकाशन

Click on the image to open the E-book.



No comments:

Post a Comment